ब्लू डार्टच्या तिसऱ्या तिमाहीची विक्री ₹1,337 कोटी ~ 6.6% वाढ; ईबीआयटीडीए मार्जिन 12.3%

Blue Dart Express Limited

मुंबई28 जानेवारी, 2023 (GPN) दक्षिण आशियातील  प्रीमिअर एक्स्प्रेस हवाईएकात्मिक वाहतूक  व वितरण कंपनी असलेल्या ब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेडतर्फे 31 डिसेंबर, 2022 रोजी समाप्त झालेल्या तिमीहीचे आर्थिक निकाल मुंबईतील संचालक मंडळाच्या बैठकीत जाहीर केले.

31 डिसेंबर, 2022 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी कंपनीने ₹86.93 कोटी करोत्तर नफ्याची नोंद केली (आधीच्या वर्षी याच तिमाहीसाठी ₹122.18 कोटी इतका करोत्तर नफा नोंदविला होता). 31 डिसेंबर 2022 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीचे उत्पन्न ₹1,337 कोटी इतके नोंदविण्यात आले. ही गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेने 6.6% वाढ आहे. या तिमाहीसाठी ईबीआयटीडीए ₹164.53 कोटी इतका नोंदविण्यात आला तर ईबीआयटीडीए मार्जिन 12.3% होते.

कामगिरीतील ठळक मुद्दे आर्थिक वर्ष 22-23 ची तिमाही विआर्थिक वर्ष 21-22 ची तिमाही

  स्वतंत्र एकत्रित
  Q3 22-23 Q3 21-22 Q3 22-23 Q3 21-22
परिचालनातून मिळविलेले उत्पन्न (₹कोटी) 1,337.08 1,254.75 1,337.08 1,254.75
ईबीआयटीडीए (₹ कोटी) 164.53 211.68 237.00 288.03
ईबीआयटीडीए मार्जिन 12.3% 16.9% 17.7% 23.0%
ईबीटी (₹ कोटी) 118.94 163.21 121.48 165.38
ईएटी (₹ कोटी) 86.93 122.18 88.66 123.42
ईपीएस (पूर्ण ₹) 36.64 51.49 37.36 52.01

 कामगिरीतील ठळक मुद्दे : 9M FY22-23 वि. 9M FY21-22

  स्वतंत्र एकत्रित
  9M 22-23 9M 21-22 9M 22-23 9M 21-22
परिचालनातून प्राप्त उत्पन्न (₹ Cr) 3,955.67 3,243.11 3,955.67 3,244.58
ईबीआयटीडीए (₹ कोटी) 540.37 469.86 761.63 699.22
ईबीआयटीडीए मार्जिन 13.7% 14.5% 19.3% 21.6%
ईबीटी (₹ कोटी) 404.28 322.40 411.57 329.04
ईएटी (₹ कोटी) 296.11 241.03 301.09 245.24
ईपीएस (पूर्ण ₹) 124.80 101.58 126.89 103.35

या तिमाहीतील एकत्रित उत्पन्न 1,337 कोटी इतके  होते. गेल्या वर्षातील तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेने ही 6.6% वाढ आहे. या तिमाहीचा ईबीआयटीडीए 237 कोटी आहे. नऊ महिन्यांचे एकत्रित उत्पन्न 3,956 कोटी असून गेल्या वर्षीच्या तुलनेने ही 22% वाढ आहे. ईबीआयटीडीए 762 कोटी इतका नोंदविण्यात आला. नऊ महिन्यांच्या कालावाधीचे एकत्रित ईबीआयटीडीए मार्जिन 19.25% इतके नोंदविले. 

या तिमाहीमध्ये भू-राजकीय परिस्थिती कायम अस्थिर होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती व परदेशी चलनामध्ये तीव्र उतार-चढाव झाले. त्यामुळे उच्च चलनवाढ इकोसिस्टिम तयार झाली. एटीएफच्या चढ्या किमती, परकीय चलनातील अस्थिरता आणि किमान  वेतनामधील वाढ यामुळे खर्च वाढलेला राहिला. त्याचप्रमाणे कंपनीतर्फे वाढीव व्हॉल्यूम व सुधारित सेवा दर्जा हाताळण्यासाठी हवाई व जमिनीवरील पॅकेज हाताळणी क्षमता वाढविण्यासाठी काम करण्यात येत आहे.

ब्लू डार्टचे मैनेजिंग डायरेक्टर बॅलफर मॅनुअलम्हणतात, आम्ही नव्या आव्हानांसह प्रवास सुरू करण्यासपोहोचक्षमता विस्तारून उत्तम सेवा प्रदान करण्यास आणि वाहतुकीची किमान वेळ साध्य करण्यास उत्सुक आहोत. भारतातील दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील (टियर आणि II) शहरात विस्तारीकरण करण्यावर ब्लू डार्ट भर देत आहे. आमची भारतभरात 700 रिटेल स्टोअर्स (डीएचएलसह) आहेत. या स्टोअर्सच्या माध्यमातून ग्राहकांना किमान वेळेत सेवा देण्यात येते आणि देशातील जास्तीत जास्त पिन कोड्सपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येतो. या व्यतिरिक्त नजीकच्या भविष्यात 100 नवी स्टोअर्स सुरू करून आमचे माध्यम अस्तित्व विस्तारणार आहोत.

कंपनीतर्फे उद्योगक्षेत्रांना उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या वैविध्यपूर्ण उफाययोजनांमध्ये उत्कृष्टता साध्य करण्यात येते. असामान्य सेवा दर्जा हा ब्लू डार्टचा गाभा आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांच्या सर्व लॉजिस्टिक्स आवश्यकतांसाठी अखंडित वन-स्टॉप सोल्यूशन प्रदान करण्यासाठी ऑटोमेशन व तंत्रज्ञानाचा वापर हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी समाप्त झालेल्या नऊ महिन्यांच्या कालखंडात आम्ही एकूण 880,370 टन वजनाच्या 24.56 कोटी शिपमेंट्स इष्टस्थळी पोहोचविल्या.

ब्लू डार्टमध्ये तंत्रज्ञान हे महत्त्वाचे अंग आहे आणि महासाथीने या आघाडीवरील इनोव्हेशन वेगान घडले आहे. डीपीडीएचएल ग्रुपचा एक भाग म्हणून ‘स्ट्रॅटजी – 2025 – डिजिटल  जगात उत्कृष्टता प्रदान करणे’ हा कंपनीसाठी एक महत्त्वाचा पैलू आहे आणि आमच्या रिव्हर्स शिपमेंट प्रोग्रॅमप्रमाणे किमान वेळेत सेवा पातळीचा वेग वाढविण्यास व ती साध्य करण्यास मदत करण्यासाठी किमान वेळेत काम पूर्ण करण्यास विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "ब्लू डार्टच्या तिसऱ्या तिमाहीची विक्री ₹1,337 कोटी ~ 6.6% वाढ; ईबीआयटीडीए मार्जिन 12.3%"

Leave a comment

Your email address will not be published.


*