बँक ऑफ बडोदा द्वारे स्वच्छता पखवाडा 2023 साजरा करण्यात आला

L-R Lalit Tyagi, ED; PV Rathi, CGM; Venugopal N, GM and Manish Kaura, Zonal Head – Mumbai, Bank of Baroda at Swachhata Pakhwada

कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून जुहू समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियानाचे आयोजन

पंधरवड्यात चालणारा हा उपक्रम स्वच्छ आणि हरित भारताप्रती बँकेची वचनबद्धता दर्शवितो

मुंबई, 28 जानेवारी, 2023 (GPN): बँक ऑफ बडोदा (बँक), ही भारतातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक देशभरातील त्यांच्या कार्यालयांमध्ये आणि शाखांमध्ये “स्वच्छता पखवाडा” (स्वच्छ भारतासाठी पंधरवडा) साजरा करत आहे. ही मोहीम 16 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. बँक स्वच्छता व स्वच्छता राखण्याचे महत्त्व आणि एकेरी वापराचे प्लास्टिक टाळण्याच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी बँकेच्या वतीने सक्रिय भूमिका घेण्यात आली आहे.

या निमित्ताने, आज बँकेच्या वतीने जुहू समुद्रकिनाऱ्यावर 100 कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. बँकेने स्वच्छता, आरोग्य आणि साफसफाईच्या महत्त्वाविषयी जनजागृती तसेच एकेरी प्लास्टिक वापराला प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने विविध शाळांमध्ये प्रश्नमंजुषा, रंगकाम आणि निबंध स्पर्धांच्या मालिका आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

स्वच्छता पखवाडा हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभागांशी संलग्न होऊन स्वच्छतेच्या पद्धतींवर लक्ष केंद्रित करणे आहे.
पंधरवड्यादरम्यान, बँक ऑफ बडोदा पर्यावरणाचे रक्षण करताना आणि स्वच्छ आणि हरित भारतावर प्रभाव पाडत शाश्वत जीवनाप्रती बांधिलकीचा एक भाग म्हणून मुंबईतील कॉर्पोरेट कार्यालयासह 100 हून अधिक ठिकाणी विविध उपक्रम राबवत आहे.

– बँक सरकारी रुग्णालये/सार्वजनिक वाहतूक स्थानके/रेल्वे स्थानके/समुद्र किनारे इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत आहे.
– एकेरी वापराच्या प्लास्टिकच्या वापराला परावृत्त करण्यासाठी व स्वच्छता आणि स्वच्छता राखण्याच्या महत्त्वाचा संदेश देण्यासाठी कर्मचारी जनजागृती वॉकथॉन आयोजित करत आहेत.
– रस्त्यावरील विक्रेते/रिक्षाचालक/रस्त्यावरील सफाई कामगार/वाहतूक पोलिस/असंघटित मजूर आणि दलित इत्यादींसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.

ह्या प्रसंगी बोलताना श्री ललित त्यागी, कार्यकारी संचालक, बँक ऑफ बडोदा म्हणाले, “एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणून, बँक शाश्वत विकासासाठी, हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी तसेच स्वच्छ भारतासाठी सकारात्मक परिणाम करण्यासाठी वचनबद्ध आहे. स्वच्छता पखवाडा उपक्रमाचा एक भाग असल्‍याने आम्‍ही ज्या समुदायाचे सदस्‍य आहोत आणि जिथून आम्हाला सामर्थ्य मिळाले आहे, अशा समाजाच्या हितासाठी योगदान देण्याची संधी मिळेल.”

अंतर्गत मंजुरीसाठी पेपरलेस ऑफिस, संपूर्ण संस्थेमध्ये कागदाचा वापर लक्षणीयरीत्या कमी करणे, मुंबईतील कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये निर्जल युरिनल बसवणे आणि इन्स्टॉलेशन यांसारखे विविध हरित उपक्रम राबवून बँक अधिक हरित आणि अधिक टिकाऊ ग्रहासाठी वचनबद्ध आहे आणि योगदान देत आहे.

मुंबईत, ‘स्वच्छता पखवाडा’ पंधरवड्यादरम्यान, बँक ऑफ बडोदा स्टाफ सदस्यांच्या सक्रिय सहभागाने जुहू बीचवर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे आणि स्वच्छता, आरोग्य, स्वच्छतेचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सिंगल यूज प्लस्टिकच्या वापरला परावृत्त करण्यासाठी वॉकथॉन आयोजीत केली आहे.
==============================================================

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "बँक ऑफ बडोदा द्वारे स्वच्छता पखवाडा 2023 साजरा करण्यात आला"

Leave a comment

Your email address will not be published.


*