डेटा-सायन्स क्षेत्रात २०२६ पर्यंत ११ दशलक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा

upGrad Logo

अपग्रॅड एमबीए क्षेत्रामध्ये ५६७% पर्यंत सर्वोच्च सीटीसी वाढ.

मुंबई, ३ जानेवारी २०२३ (GPN): आशियातील सर्वात मोठी उच्च एडटेक कंपनी अपग्रॅड ची यशस्वी वाटचाल या वर्षीही चालूच राहिली. अपग्रॅड मधून साल २०२२ च्या केवळ एका वर्षात १०,००० हून अधिक व्यक्तींनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठ भागीदारांसह त्यांचे ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी प्राप्त केली. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर (२०२२) च्या दरम्यान एमबीए च्या क्षेत्रामध्ये ५६७% ची सर्वोच्च सीटीसी (कंपनीकडून वर्षभरात एका कर्मचाऱ्यावर केला जाणारा खर्च-कॉस्ट टु कंपनी: CTC) वाढ कंपनी ने पाहिली. अपग्रॅडच्या डेटा लॅब नुसार, (उद्योग आणि कंपनी विशिष्ट डेटा, अहवाल आणि इनसाइटस् तयार करणारी एक कंपनीची अंतर्गत शाखा) कर्मचाऱ्यांची भर्ती करणाऱ्यांमध्ये या वर्षी एमबीए हे सर्वाधिक आवडते क्षेत्र राहिले आणि त्यानंतर अनुक्रमे डेटा सायन्स, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स (AI) आणि डिजिटल मार्केटिंग यांना प्राधान्य मिळाले. डेटास्किलड व्यावसायिक आणि ज्यायोग्य व्यावसायिक व नेतृत्व कौशल्य प्रदर्शित करू शकतात अशा व्यक्तींच्या वाढत्या मागणीचा कल पाहिला गेला. अनुक्रमे बंगळूर, दिल्ली आणि मुंबई भर्तीसाठी अग्रस्थानी आहेत, तर हैदराबाद, पुणे आणि चेन्नई हे त्यानंतरचे लोकप्रिय हायरिंग ठिकाणांपैकी आहेत.

फाल्गुन कोमपल्ली, सह-संस्थापक, अपग्रॅड म्हणाले, “आम्ही अभ्यासक्रम तयार करण्यापूर्वी उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आणि शिक्षण तज्ज्ञांबरोबर मिळून त्या विशिष्ट क्षेत्रात सखोल संशोधन आणि बाजार विश्लेषण करतो. यामुळे आमच्यासाठी नोकरी व्यवसायांचा काय कल आहे याचे मूल्यांकन करणे आणि त्यानुसार प्रकल्प तयार करणे सोपे होते व जे आमच्या विद्यार्थ्यांना अचूक प्रशिक्षण देऊन सक्षम करतात. ही आमची सर्वात मोठी ताकद आहे. अजून एक फरक करणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमचे मार्गदर्शक जे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवतात. विद्यार्थ्यांनी त्यांच्या असाइनमेंट आणि परीक्षा वेळेवर पूर्ण केल्या पाहिजेत यासाठी त्यांना वारंवार आठवण व सूचना करीत असतात. आमचे लक्ष नेहमीच उत्तम करियर बनण्यावर केंद्रित असते त्यामुळे ही वार्षिक आकडेवारी आम्हाला अजून जास्त मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित करते.”

अपग्रॅड रिक्रूटचे सह-संस्थापक आणि प्लेसमेंट प्रमुख म्हणाले, “गेल्या काही वर्षांमध्ये, अधिक नवनवीन कौशल्य शिकलेल्यांना वाढती मागणी आहे. अशा कुशल व्यक्तींना संधी देण्यास कंपनया अधिक उत्सुक आहेत कारण अशा कर्मचाऱ्यांमध्ये विशिष्ट क्षेत्राशी संबंधित शिक्षण आणि कॉर्पोरेट एक्सपोजर दोन्हिंचा अनोखा मेळ असतो. एखाद्या नवीन कर्मचाऱ्यापेक्षा निश्चितच त्यांना उत्पादनक्षम होण्यासाठी लक्षणीयरीत्या कमी वेळ लागतो आणि म्हणूनच ते अधिक चांगला गुंतवणूक परतावा देतात व खर्चावर नियंत्रणही ठेवतात. डेटा सायंटिस्ट, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स (AI) विशेषज्ञ किंवा डेटा अॅनालिटिक्स च्या वाढत्या मागणीसह अनुभवी व्यावसायिकांना नियुक्त करण्याच्या आव्हानास उद्योगाला सामोरे जावे लागणार आहे,”

अपग्रॅड ने एमबीए च्या क्षेत्रामध्ये १२०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट ची सोय केली, या व्यतिरिक्त, उद्योग क्षेत्राच्या अंदाजानुसार, डेटा सायन्स संबंधित नोकरी ही जगभरातील सर्वाधिक मागणी असलेल्या टेक नोकऱ्यांपैकी एक आहे आणि हे तिसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक पगार देणारे क्षेत्र असल्याचा सुद्धा अंदाज आहे. या क्षेत्रात २०२६ पर्यंत ११ दशलक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "डेटा-सायन्स क्षेत्रात २०२६ पर्यंत ११ दशलक्ष नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा"

Leave a comment

Your email address will not be published.


*