मुंबई, 30 डिसेंबर 2022 (GPN): प्रतिबंधात्मक लसीकरणाला चालना देण्यासाठी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’तर्फे कोविड -19 लसी किंवा वर्धक मात्रा (बूस्टर शॉट) आणि ह्युमन पॅपिलोमाव्हायरस व्हॅक्सीन किंवा न्यूमोकोकल व्हॅक्सीन यांसारख्या इतर लसी घेतल्या आहेत त्यांना विमा प्रीमियमवर 2.5 टक्के सूट* देण्यात येते आहे. लसीकरण करण्यात आलेले ग्राहक विम्याची नव्याने खरेदी करत आहेत किंवा त्यांच्या विद्यमान रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसीचे नूतनीकरण करत आहेत त्या ग्राहकांना या प्रस्तावाचा लाभ घेता येईल. रिलायन्स जनरल इन्शुरन्स ही कोविड -19 लसीकरणावर सूट देणार्या पहिल्या काही सर्वसामान्य विमा कंपन्यांपैकी एक आहे.
सध्या वायव्येकडून सुरू असलेली शीतलहरींची लाट, कोविड-19 चे सतत उदभवणारे धोके, कोविड-19 व इतर विषाणूंसारख्या प्रकरणांमध्ये अलीकडे झालेली वाढ यासारख्या घटना लक्षात घेऊन, कंपनीचे उद्दिष्ट हे आपल्या ग्राहकांना प्रतिबंधित उपाय म्हणून लसीकरण करून घेण्याच्या अनुषंगाने प्रोत्साहित करण्याचे आहे. ज्या ग्राहकांनी अगोदरच लसीचे डोस किंवा वर्धक मात्रा दोन्ही घेतले आहेत; त्यांना सवलत देऊन, रिलायन्स जनरल इन्शुरन्सला ग्राहक आरोग्य आणि तंदुरुस्ती चांगले राहावे ही आशा आहे. लसीकरण पूर्ण झालेले ग्राहक जे एकतर नवीन विमा विकत घेण्याच्या किंवा त्यांच्या हेल्थ इन्फिनिटी विमा पॉलिसीचे नूतनीकरण करण्याच्या प्रक्रियेत आहेत, त्यांना पॉलिसी खरेदी/नूतनीकरणा दरम्यान लागू होणाऱ्या इतर सवलतींशिवाय या सवलतीचाही लाभ मिळू शकतो**.
रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसी अमर्याद लाभ देऊ करते; ₹5 कोटींपर्यंतची उच्च विमा रक्कम, मोअरग्लोबल कव्हर, मॅटर्निटी कव्हर, ओपीडी कव्हर, विम्याची अमर्यादित रक्कम पुनर्संचयित करणे आणि पंधरा अधिक उपयुक्त अॅड-ऑन फायदे आणि अनेक सवलती यासारख्या उत्कृष्ट वैशिष्ट्यांचा यामध्ये समावेश आहे. ग्राहक आर्थिकदृष्ट्या सशक्त राहावे याकरिता भारतातील पहिले क्रेडिट स्कोअर आधारित प्रीमियमवर सवलत देखील देण्यात येते आहे.
रिलायन्स जनरल इन्शुरन्सबद्दल
रिलायन्स जनरल इन्शुरन्स ही रिलायन्स कॅपिटलची उपकंपनी, भारतातील आघाडीच्या सामान्य विमा कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी मोटार विमा, आरोग्य विमा, प्रवास विमा, आणि गृह विमा यासह उत्पादनांचा सर्वसमावेशक गुलदस्त्यातील उत्पादन पर्याय देऊ करते. ही कंपनी प्रत्येक ग्राहकाच्या संरक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक गरजेनुरूप उपाय उपलब्ध करून देते. रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे 8500+ रुग्णालयांचे संपर्कजाळे वाढते आहे. किरकोळ, कॉर्पोरेट्स आणि एसएमई क्लायंटना त्यांची उत्पादने आणि सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भारतातील 75,000 हून अधिक मध्यस्थांचे आणि 131 शाखा कार्यालयांचे मजबूत संपर्कजाळे देखील आहे.
Be the first to comment on "कोविड-19 लसीकरण झालेल्या ग्राहकांकरिता रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसीसह प्रीमियमवर 2.5% ची सूट"