कंपनी आता भारतातील 2.5 टन प्रवर्गाताली पहिल्या इलेक्ट्रिक पिकअप ट्रकचे उत्पादन सुरू करणार
मुंबई,14 डिसेंबर 2022 (GPN): एका या पिनॅकल इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादन व तंत्रज्ञान कंपनीने आपल्या 2.5 टन जीव्हीएम इलेक्ट्रिक हलक्या वजनाच्या व्यावसायिक वाहनासाठी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टकडून (सीआयआरटी) सीएमव्हीआर प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टचे (सीआयआरटी) संचालक श्री. केव्हीआरके प्रसाद यांच्या हस्ते, कंपनीच्या संशोधन, डिझाइन व होमोलोगेशन टीमला, केंद्रीय मोटर वाहन नियम (सीएमव्हीआर) प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यामुळे एका मोबिलिटी 2.5 टन जीव्हीएम प्रवर्गातील इलेक्ट्रिक पिकअप ट्रक भारतीय बाजारपेठेमध्ये आणणारी पहिली कंपनी ठरली आहे. अन्य वाहन उत्पादकांच्या आधी एकाने हे साध्य केले आहे. एकाने सर्व आवश्यक कार्यात्मकता व सुरक्षितता चाचण्या तसेच मंजुऱ्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आणि केंद्रीय मोटर वाहन नियम (सीएमव्हीआर) प्रमाणपत्र प्राप्त केले. येत्या काही महिन्यांत कंपनीद्वारे उत्पादनाच्या ट्रायल्स व विक्री सुरू होण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची पायरी आहे. कंपनी येत्या महिन्यांत भारतातील पुणे (महाराष्ट्र) येथे ईएलसीव्हीचे उत्पादन सुरू करेल असे अपेक्षित आहे आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला निवडक ग्राहकांपर्यंत हे उत्पादन पोहोचवण्याचे कंपनीचे नियोजन आहे.
पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्सची उपकंपनी एकाचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता यावेळी म्हणाले, “आमच्या ई-एलसीव्हीचे होमोलोगेशन पूर्ण होणे हे आमच्या टीमने अत्यंत अल्पकाळात प्राप्त केलेले खऱ्या अर्थाने महत्त्वपूर्ण यश आहे. यामुळे भारतीय व जागतिक बाजारपेठांसाठी एका योग्य उत्पादनाची निर्मिती भारतात अगदी शुन्यातून करण्याप्रती आमची बांधिलकी अधिक भक्कम झाली आहे. एकाच्या ई-एलसीव्हीबाबत आणि ग्राहकांना यामुळे होणाऱ्या अनन्यसाधारण मूल्यवर्धनाबाबत आम्ही रोमांचित आहोत आणि ग्राहकांकडून आमच्या खूप अपेक्षाही आहेत. वाहन बाळगण्याचा किमान खर्च,अद्वितीय रचना आणि वापर अनुभव यांच्या माध्यमातून आमचे उत्पादन दुर्गम भागापर्यंतच्या डिलिव्हरी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल आणि आपल्या देशाच्या शून्य-उत्सर्जन वाहनांच्या दिशेने चाललेल्या प्रवासाला गती देईल असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो.”
यात भर घालत एकाचे अध्यक्ष श्री. बी. अनिल बालिगा म्हणाले, “विक्रमी वेळात हा पल्ला गाठण्यासाठी आमच्या टीमने घेतलेल्या प्रचंड मेहनतीचा आणि दाखवलेल्या नवोन्मेषाचा आम्हाला खूप अभिमान आहे. येत्या पाच वर्षांत हा विभाग 100,000 या संख्येच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता आहे. जानेवारी’23च्या अखेरीपर्यंत पहिला लॉट काही निवडक ग्राहकांपर्यंत प्रारंभिक प्रतिसादासाठी तसेच कामगिरीच्या ट्रॅकिंगसाठी पोहोचवण्याचे आमचे नियोजन आहे आणि पुढील दोनेक महिन्यांत आम्ही उत्पादनाचे प्रमाण वाढवू. ई-एलसीव्हीच्या विक्रीवर 2023च्या मध्यापासून लक्ष केंद्रित केले जाईल. हे एक पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ उत्पादन असून, अत्याधुनिक स्मार्ट आटोपशीर कारखान्यांत त्याचे उत्पादन होणार आहे.”
एका ही पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेड या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव सीटिंग, इंटिरिअर्स व स्पेशॅलिटी वाहन कंपनीची उपकंपनी आहे आणि भारत सरकारच्या ऑटो पीएलआय धोरणाखालील चॅम्पियन ओईएम योजना व ईव्ही सुटे भाग उत्पादन योजनेअंतर्गत मान्यता प्राप्त केलेली एकमेव व्यावसायिक वाहन उत्पादक आहे.
एका डिझाइन तत्त्व नवीन पद्धतीने लागू करत आहे आणि शेअर करण्याजोग्या तंत्रज्ञानांचा विकास करून इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांचे उत्पादन करत आहे. सर्वोत्तम टीसीओ (टोटल कॉस्ट ऑफ ओनरशिप) सोल्युशन्स देऊन आणि शाश्वत परिसंस्थेची व्याप्ती वाढवून ईव्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यात कंपनी हातभार लावत आहे. एका इलेक्ट्रिक वाहने, फ्युएल सेल इलेक्ट्रिक वाहने आणि पर्यायी इंधन वाहने यांच्या संपूर्ण श्रेणीचे डिझाइन, उत्पादन व पुरवठा करणार आहे. ब्रॅण्ड भविष्यकाळात सुटे भाग जुळणी व उत्पादन तसेच ईव्ही कर्षण प्रणाली, ईव्ही ऊर्जा साठवण प्रणाली यांचाही विकास करणार आहे.Ends
Be the first to comment on "एकाच्या ई-एलसीव्हीला प्राप्त झाले सीएमव्हीआर प्रमाणपत्र व मान्यता"