एगॉन लाइफ इन्शुरन्स सादर करत आहे आयगॅरंटी मॅक्स सेव्हिंग्ज योजनेच्या माध्यमातून परवडण्याजोगे बचत उत्पादन नवीन स्वरूपात– 500 रुपये प्रतिमहिना* रकमेपासून सुरू होणारे बचत तसेच विमा उत्पादन
- आयुर्विमा संरक्षणासह खात्रीशीर करमुक्त मोबदला पुरवणारी योजना
- वार्षिक हप्त्याच्या किमान 11 पट आयुर्विमा संरक्षण– पारंपरिक वित्तीय उत्पादनांमध्ये न मिळणारा अतिरिक्त लाभ
- बचतीमध्ये स्थिर वाढ शक्य होते- पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांचे आर्थिक धक्क्यांपासून संरक्षण
मुंबई, 8 डिसेंबर, 2022 (GPN): एगॉन लाइफ इन्शुरन्स या डिजिटल भारताच्या पहिल्या आयुर्विमा कंपनीने आयगॅरंटी मॅक्स सेव्हिंग्ज ही योजना सुरू केली आहे. हे नवीन उत्पादन उच्च मोबदला आणि आयुर्विमा संरक्षण असा दुहेरी लाभ पुरवते, तसेच कुटुंबांना त्यांची मध्यम ते दीर्घकालीन बचत उद्दिष्टे परवडण्याजोग्या खर्चात पूर्ण करण्याची क्षमता देते.
तुमच्या मुलांचे शिक्षण किंवा लग्न असू दे, तुमची निवृत्तीनंतरची तरतूद असू दे, तुम्ही ही उद्दिष्टे अगदी 500 रुपये प्रतिमहिना (17 रुपये/दिवस) एवढ्या कमी हप्त्यात पूर्ण करू शकता.
हे उत्पादन केवळ एक बटन क्लिक करून खरेदी केले जाऊ शकते- यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही* तसेच कंपनीच्या शाखेला भेट देण्याचीही गरज नाही. अधिक योगदान दिल्यास, मोबदला अधिक मिळेल आणि हा मोबदला करमुक्त आहे*.
एगॉन लाइफचे एमडी, आणि सीईओ सतीश्वर बी, या उत्पादनाबद्दल म्हणाले, “हे खूपच स्पर्धात्मक आणि परवडण्याजोगे उत्पादन आहे. त्याचा हप्ता प्रति महिना केवळ 500 रुपये आहे.”
“तुमचे बचत उद्दिष्ट काहीही असो, ते पूर्ण होईल याची खातरजमा ही योजना करते. समजा तुम्ही 30 वर्षांचे असाल आणि तुम्हाला 3 वर्षांचे मूल असेल. जर तुम्ही दहा वर्षांसाठी दर महिन्याला अगदी 3,000 रुपये बाजूला टाकले, तरी तुम्हाला मूल 18 वर्षांचे होईल आणि त्याच्या उच्चशिक्षणाला सुरुवात होणार असेल, तेव्हा सुमारे 6.5 लाख रुपये करमुक्त मिळतील. तुमचा अकाली मृत्यू झाल्यास, तुमच्या कुटुंबियांना किमान 5 लाख रुपये एकरकमी देण्याची हमी यात आहे. अशा प्रकारची खात्रीशीर ग्वाही अन्य कोणतेही बचत उत्पादन देत नाही.”
अर्थात हे एवढेच नाही. हे उत्पादन वेगवेगळी उद्दिष्टे आणि तुमच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांतील गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेवढे लवचिक आहे. तुम्ही 40 वर्षांचे असाल आणि निवृत्तीच्या तरतुदीबाबत विचार सुरू केला असाल, तर तुम्हाला पुढील दहा वर्षे महिन्याला केवळ 10,000 रुपयांची बचत करायची आहे. तुम्ही 60 वर्षांचे व्हाल तेव्हा तुम्हाला सुमारे 29.47 लाख रुपये एकरकमी मिळतील आणि ते करमुक्त असतील. तुमच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याची सुरुवात या निधीसह तुम्ही करू शकाल. तुमचा अकाली मृत्यू झाल्यास तुमच्या जवळच्या व्यक्तींना किमान 22.8 लाख रुपये एकरकमी मिळतील याची हमी यात आहे. अशा रितीने, दुर्दैवी घटना झाली तरीही निवृत्तीनिर्वाह निधी तर तयार होईलच.”
“आमच्या इंट्युइटिव्ह (अंत:प्रेरणाधारित) आणि पेपरलेस प्रवासामुळे हे उत्पादन खरेदीसाठी खूपच सोपे व सुलभ झाले आहे. आयुर्विमा परवडण्याजोगा, सुलभ व सर्वांना उपलब्ध करून देऊन प्रत्येक घर आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचे एगॉन लाइफचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने आयगॅरंटी मॅक्स सेव्हिंग्ज हे महत्त्वाचे पाऊल आहे.”
या उत्पादनामध्ये अनेक ग्राहकांना पूरक अशा सुविधा आहेत:
- तुम्ही तुमच्या बचत उद्दिष्टांनुसार 5-20 वर्षांमधील हवी ती पॉलिसी मुदत निवडू शकता.
- मोबदल्याची हमी, परवडण्याजोगा हप्ता निवडण्याची लवचिकता, तुम्ही निवडलेल्या वारंवारतेने मोबदला मिळणे आणि तुमच्या आयुष्यातील उद्दिष्टांनुसार लाभ प्राप्त करण्याची सुविधा यांमुळे हे उत्पादन अनन्यसाधारण झाले आहे.
- या योजनेचा किमान प्रवेश कालावधी तीन महिने आहे, तर कमाल कालावधी 50 वर्षे (नियमित पैसे भरल्यास 45 वर्षे) आहे.
- आयुर्विमा संरक्षण तसेच खात्रीशीर मोबदला पुरवण्यासोबतच, एगॉन लाइफ आयगॅरंटी मॅक्स सेव्हिंग्ज हे उत्पादन अॅक्सिडेण्टल डेथ (अपघाती मृत्यू ) व क्रिटिकल इलनेस (गंभीर आजारपण) या रायडर्समधून एकाची निवड करण्याचे अतिरिक्त ऐच्छिक संरक्षणही देऊ करते. या रायडर्समुळे आयुष्यातील अनिश्चिततांपासून तुमचे संरक्षण होते आणि आर्थिक बोजा कमी करण्यासाठी अतिरिक्त निधी प्राप्त होतो.
- हमी देण्यात आलेल्या पायाभूत रकमेशिवाय, ही योजना खात्रीशीर अतिरिक्त रक्कम व लॉयल्टी अॅडिशन्सही देऊ करते, त्यामुळे पॉलिसीची मुदत समाप्त होताना एकत्रितरित्या हे खात्रीशीर परिपक्वता लाभ धारकाला प्राप्त होतात.
- योजनेच्या संपूर्ण मुदतीत धारकाला आयुर्विमा संरक्षण पुरवले जाते. पॉलिसीधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याचे लाभ कुटुंबियांना दिले जातात.
- ही योजना हप्ता भरण्याचे विविध पर्याय देऊ करते, ते पुढीलप्रमाणे
- रेग्युलर पे- पॉलिसी मुदतीदरम्यान हप्ता भरणे
- लिमिटेड पे – पॉलिसी मुदतीच्या तुलनेत कमी कालावधीमध्ये निश्चित काळात हप्ता भरणे
- सिंगल पे – सुरुवातीला एकरकमी हप्ता भरणे
रेग्युलर व लिमिटे पे प्रकारांत हप्ता भरण्याचे तीन पर्याय उपलब्ध आहेत- मासिक (500 रुपयांपासून सुरू), सहामाही (3000 रुपयांपासून सुरू), आणि वार्षिक (6,000 रुपयांपासून सुरू).Ends
Be the first to comment on "एगॉन लाइफ इन्शुरन्स सादर करत आहे आयगॅरंटी मॅक्स सेव्हिंग्ज योजनेच्या माध्यमातून परवडण्याजोगे बचत उत्पादन नवीन स्वरूपात- 500 रुपये प्रतिमहिना* रकमेपासून सुरू होणारे बचत तसेच विमा उत्पादन"