
Narayana Health – SRCC Children’s Hospital Logo
मुंबई, 22 नोव्हेंबर 2022 (GPN):- सध्याच्या युगात हृदय, फुफ्फुसे, मेंदू, मूत्रपिंड आणि इतर अवयवांशी निगडीत विकार आणि रोगांचे प्रमाण खूप वाढले आहे आणि प्रौढत्वाची सुरुवात होतानाच हे रोग झाल्याचे आढळून येते. याची प्राथमिक कारणे म्हणजे जीवनशैलीचे खराब व्यवस्थापन आणि आरोग्याच्या प्राथमिक समस्यांकडे होणारे दुर्लक्ष. त्यामुळे मुलांना निरोगी भविष्य देण्यासाठी त्यांच्या ‘आज’वर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
मुलाचे संगोपन हे कोणत्याही पालकांसाठी महत्त्वाचे असते आणि त्यात मानसिक आणि शारीरिक वाढीशी संबंधित अनेक गोष्टी व त्यांची मोजमापे समाविष्ट असतात. या गोष्टींचे मोजमाप केल्याने पुढची पावले काय उचलावीत याबाबत पालकांना मार्गदर्शन मिळते. शाळा आणि इतर संस्थांमध्ये मुलांचा आय क्यू (इंटेलिजन्स कोशंट, बुद्ध्यांक) आणि ईक्यू (एमोशनल कोशंट) यांची मोजणी नियमितपणे करण्यात येते. दुर्दैवाने, भारतात, विशेषतः लहान मुलांचा हेल्थ कोशंट तपासण्याची पद्धत भारतात पहिल्यापासूनच नाहीये. भारतात लहान मुलांच्या हेल्थकेअरमधील अग्रणी नारायण हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल, मुंबई येथे आम्ही लहान मुलांसाठी असा मूल्यांकन-आधारित हेल्थ काँटाइन्ट नक्की केला आहे, ज्याचा उपयोग पालकांना आणि संगोपनकर्त्यांना मुलांमधील ज्ञात आणि अज्ञात आरोग्यविषयक तक्रारींचे निवारण करण्यासाठी होऊ शकतो.
माता-पितांना देखील कधी-कधी आपल्या मुलातील बारीक सारिक आरोग्यविषयक समस्या, काही लक्षणे दिसेपर्यंत ध्यानात येत नाहीत. या हेल्थ काँटाइन्ट मध्ये सहभागी झाल्याने पालकांना आपल्या मुलांची आरोग्य स्थिती समजण्याची संधी मिळेल.
भारतात लहान मुलांच्या हेल्थकेअरमधील अग्रणी, नारायण हेल्थ (मुंबई)चा पाठिंबा असलेल्या एसआरसीसी(SRCC) चिल्ड्रन्स हॉस्पिटलने हा हेल्थ काँटाइन्ट विकसित केला आहे, जेणे करून मुलांच्या पालकांना आणि संगोपनकर्त्यांना मुलांमधील ज्ञात आणि अज्ञात आरोग्यविषयक तक्रारींचे निवारण करण्यास मदत होऊ शकेल.
“नोव युवर चाइल्ड्स हेल्थ काँटाइन्ट”च्या लॉन्चच्या प्रसंगी नारायण हेल्थचा पाठिंबा असलेल्या एसआरसीसी(SRCC) चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. सूनू उदानी म्हणाले, “हो, अर्थातच वेगवेगळ्या वयातील मुलांची गरज वेगवेगळी असते. तीन महिन्याच्या मुलाला ज्या गोष्टींची गरज असते, ती तीन वर्षांच्या मुलाच्या गरजेपेक्षा अर्थातच वेगळी असते. त्यामुळे, हा हेल्थ काँटाइन्ट खरोखर सगळ्या सीमा ओलांडून पालकांना त्यांच्या मुलाच्या आरोग्याबाबत वेगवेगळ्या वयात काही धोका असल्यास तो शोधून काढतो. पालक केवळ पाच मिनिटात ही प्रश्नावली भरून सबमीट करू शकतात.”
या हेल्थ काँटाइन्ट मधल्या प्रश्नावलीत, खालील स्कोरिंग प्रणालीवर आधारित मुलाचा हेल्थ कोशंट नक्की करण्यासाठी आरोग्य, स्वच्छता, महत्त्वाचे टप्पे आणि जीवनशैली या बाबींचा समावेश करून घेण्यात आला आहे.
10 पेक्षा कमी: मूल निरोगी असल्याचे निदर्शक आहे.
10 ते 20: मुलाचे आरोग्य काळजी करण्याजोगे नसले, तरी खूप चांगले मात्र नाही.
20 ते 30: मुलाचा हा हेल्थ स्कोअर ते मूल ‘निरोगी नसल्याचे’ सुचवितो आणि त्यामुळे बालरोगतज्ज्ञाचा सल्ला घेणे हितावह असते.
30 पेक्षा जास्त: मुलाचे आरोग्य खराब असल्याचे सुचवतो. त्याला तत्काळ बालरोग तज्ज्ञाच्या सल्ल्याची आणि उपचारांची गरज आहे.
जर एखाद्या मुलाला आकडी येत असेल, तर एखाद्या पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टला तत्काळ दाखवणे हितावह आहे.
प्रतिबंधात्मक पावले उचण्याचे महत्त्व पुन्हा पुन्हा सांगत नारायण हेल्थचा पाठिंबा असलेल्या एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार – पेडियाट्रिक मेडिसीन, डॉ. महेश बाळसेकर म्हणाले, “लहान मुलांमध्ये क्युरेटिव्ह (उपचारात्मक) पावले उचलण्यापेक्षा प्रतिबंधात्मक पावले उचलण्यावर भर देण्याची गरज आहे. यामध्ये प्रारंभिक निदान आणि उपचाराच्या माध्यमातून रोगांचा प्रतिबंध करण्याचा तसेच निरोगी जीवनशैलीला प्राधान्य देण्याचा समावेश आहे.”
या हॉस्पिटलने मुंबईतील विविध शाळांमधून 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. ह्या मुलांनी जीवनातील त्यांच्या ध्येयाबद्दल आपापले विचार सांगितले. निरोगी आणि तंदुरुस्त भविष्यासाठी आरोग्याची काळजी घेणे कसे महत्त्वाचे आहे, हे डॉ. उदानी आणि डॉ. बाळसेकर यांनी मुलांना समजावून सांगितले. एका जगलरने जबरदस्त संतुलनाचे प्रदर्शन करत खेळ करून मुलांना रिझवले, त्यातून मुलांना संतुलनाचे जीवनातील महत्त्व समजावण्याचा प्रयत्न होता. विविध हातवारे आणि युक्त्या करून तो जगलर मुलांना जादूच्या दुनियेत घेऊन गेला.
Be the first to comment on "नारायण हेल्थचा पाठिंबा असलेल्या एसआरसीसी (SRCC) चिल्ड्रन्स हॉस्पिटल (मुंबई)ने मुलांच्या निरोगी भवितव्यासाठी लॉन्च केले “ नोव युवर चाइल्ड्स हेल्थ काँटाइन्ट (HQ)”"