
(L-R), डॉ मोहित कुकरेजा, आर्थ्रिस्कोपिक आणि स्पोर्ट मेडिसिन, डॉ प्रशांत कांबळे, हँड अँड एल्बो सर्जन आणि सुश्री मेघना काटे, रुग्ण, डॉ वीरेंद्र चोहान, सेंटर हेड,वोक्हार्ट हॉस्पिटल,मुंबई सेंट्रल.
मुंबई, 22 नोव्हेंबर 2022 (GPN):- मेघना काटे (२८ वर्षे) या राष्ट्रीय स्तरावरील मुष्टीयुद्धपटू आहेत. त्यांना डाव्या मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जवळपास 3 महिन्यांपूर्वी त्यांनी रागाने भिंतीवर बुक्का मारला होता, ज्यामुळे त्यांच्या डाव्या मनगटाला इजा पोहोचली होती. मेघना यांच्या जखमी मनगटाचा एम.आर.आय (Magnetic Resonance Imaging) केला असता त्यांना झालेली दुखापत ही दुर्मिळ स्वरुपाची असून, मनगटाच्या सांध्याला इजा झाली असल्याचे दिसून आले होते. जायबंदी झाल्यानंतर मेघना यांनी पुढचे 3 महिने वेदनाशमन औषधे, फिजिओथेरपी आणि प्लास्टरच्या सहाय्याने वेदनेवर मात करण्याचा प्रयत्न केला. या तीन महिन्याच्या काळात मेघना यांना दार उघडणे, कपडे, भांडी किंवा चेहरा धुणे, जेवण बनविणे या यासारख्या गोष्टीही करता येत नव्हत्या. मेघना यांचे बाळ लहान असून त्याची काळजी घेणं किंवा दैनंदीन गोष्टी पार पाडणं हे देखील मेघना यांना जमत नव्हतं. मेघना यांनी काही रुग्णालयात जाऊन उपचार घेतले होते, मात्र तिथल्या उपचारांनी त्यांना म्हणावा तसा आराम पडला नव्हता. ज्यामुळे त्यांनी मुंबई सेंट्रल इथे असलेल्या वोक्हार्ट हॉस्पीटलमध्ये जाण्याचं ठरवलं होतं.
मेघना यांच्यावर वोक्हार्ट रुग्णालयाच्या डॉ.मोहित कुकरेजा यांनी उपचार केले. कुकरेजा हे वोक्हार्ट रुग्णालयाचे सल्लागार अस्थि शल्यविशारद आणि क्रीडा औषधी आणि आर्थोस्कोपी तज्ज्ञ आहेत. कुकरेजा यांनी मेघना यांना झालेल्या दुखापतीबद्दल सांगताना म्हटले की ‘मेघना काटे या मुष्टीयुद्धपटू असून त्या एका दुर्मिळ प्रकारच्या अशा मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे माझ्याकडे आल्या होत्या. त्यांना 3 महिन्यांपूर्वी डाव्या मनगटाला इजा पोहोचली होती, ज्यामुळे त्यांना मनगटाची हालचाल करताना बऱ्याच वेदना सहन कराव्या लागत होत्या. यावर तातडीचा उपाय म्हणून आम्ही त्यांच्या मनगटावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. मेघना यांच्या मनगटाच्या सांध्याला जिथे इजा पोहोचली होती त्या भागा जवळ ओस्टीओटोमी ( हाडाचा लहानसा तुकडा कापणे) प्रक्रिया पार पाडण्यात आली. शस्त्रक्रियेच्या नंतरच्या पहिल्या दिवसापासूनच मेघना यांना मनगटाची बरीच हालचाल करता येऊ लागली होती. आता आमचे उद्दीष्ट्य हे मेघना यांच्याकडून व्यायाम करून घेणं आणि त्यांच्या मनगटाला पूर्वीप्रमाणे मजबुती प्रदान करणे हे आहे जेणेकरून त्या पुढच्या 4-6 महिन्यात पुन्हा मुष्टीयुद्धासाठी सज्ज झाल्या असतील.
डॉ.प्रशांत कांबळे हे मुंबई सेंट्रल स्थित वोक्हार्ट हॉस्पीटलमध्ये हात आणि मनगट शल्यविशारद आहेत. त्यांनी मेघना यांच्या “मेघना यांच्यावरील शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या निखळलेल्या सांध्याचे स्नायूबंध स्थिर ठेवत ओस्टीओटोमी ( हाडाचा लहानसा तुकडा कापणे) ची प्रक्रिया पार पाडण्यात आली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर अवघ्या 8 तासांत मेघना यांना मनगटापासून कोपरापर्यंत हालताल करता येऊ लागली. जवळपास 3 महिने मेघना यांना मनगटाची हालचाल इतक्या सहजतेने आणि वेदनेशिवाय करता आली नव्हती. सध्या रुग्ण फिजिओथेरपी घेत असून त्या वेगाने पूर्ववत होत आहेत.”
मेघना काटे म्हणाल्या की, “एक मुष्टीयुद्धपटू असल्याने मनगट हलवता न येणं ही माझ्यासाठी चिंतेची बाब बनली होती. मना मनगटाची अजिबात हालचाल करता येत नव्हती. मी रोज ज्या गोष्टी सहजतेने करायचे , त्या देखील मला करता येत नव्हत्या. माझं अडीच वर्षांचे बाळ असून मला दुखापततीमुळे त्याचं काहीच करता येत नव्हतं. 3 महिने आम्ही विविध डॉक्टरांकडे गेलो होतो, आशा हीच होती की मला वेदनेपासून मुक्तता मिळेल. आमच्या एका नातेवाईकांनी आम्हाला डॉ. मोहित कुकरेजा यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला होता. त्यांना भेटल्यानंतर मला नेमकी दुखापत काय झाली आहे ते कळालं आणि आम्ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ज्या दिवशी शस्त्रक्रिया झाली त्याच दिवशीपासून मला मनगट हलवता येऊ लागलं होतं आणि माझ्या 90 टक्के वेदना गायब झाल्या होत्या. या दुखापतीतून सावरून पुन्हा मुष्टीयुद्धासाठी सज्ज होण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करत आहे.”Ends
Be the first to comment on "राष्ट्रीय पातळीवरील मुष्टीयुद्धपटूचे मनगट झाले बळकट, मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पीटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश.3 महिने वेदनेशी झुंजणाऱ्या मेघना काटेंची त्रासातून मुक्ती "