‘इंडेक्सटॅप प्रीमियर लीग चार्ट’ मध्ये रेमंड रियल्टीने मिळवले पहिले स्थान

Raymond Limited Logo

Raymond Realty Logo

रेमंड रियल्टीने २४५ कोटी रुपये अशी तीन पट वृद्धी विक्रीमध्ये साध्य केली

ठाणे, १५ नोव्हेंबर २०२२ (GPN): एफएमसीजीपासून टेक्स्टाईलपर्यंत प्रत्येक उद्योगक्षेत्रात आघाडीवर असलेला, भारतातील सर्वात मोठा उद्योगसमूह रेमंड ग्रुपमधील रेमंड रियल्टीने इंडेक्सटॅप प्रीमियर लीग चार्टमध्ये ठाणे भागात पहिले स्थान पटकावले आहे. रेमंड ग्रुपचे प्रमुख रियल इस्टेट प्रोजेक्ट्स द ऍड्रेस बाय जीएसमध्ये २०१ कोटी रुपयांची ७८ आणि टेनएक्स हॅबिटॅटमध्ये १४७ कोटी रुपयांची १२४ युनिट्स विकली गेली आहेत, त्यामुळे या प्रोजेक्ट्सना ठाणे शहर भागात पहिले व दुसरे स्थान मिळाले आहे. हल्लीच्या आकडेवारीनुसार, रेमंड रियल्टीच्या प्रोजेक्ट्समध्ये एकूण ३४८ कोटी रुपयांची २०२ युनिट्स विकली गेली आहेत.

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये प्रोजेक्ट टेनएक्समध्ये एकूण १२० बुकिंग्स झाली आहेत. सप्टेंबर २०२२ पर्यंत टेनएक्समध्ये लॉन्च करण्यात आलेल्या एकूण युनिट्सपैकी ८५% म्हणजे २१८६ युनिट्स (बुकिंग मूल्य २२१० कोटी रुपये) बुक केली गेली आहेत. याच कालावधीत रेमंड रियल्टीचा प्रीमियम निवासी प्रोजेक्ट द ऍड्रेस बाय जीएसमध्ये ८३४ कोटी रुपयांची (बुकिंग मूल्य) युनिट्स विकली गेली आहेत. सप्टेंबर २०२२ पर्यंत या प्रोजेक्टमध्ये ६८ बुकिंग्स झाल्या आहेत.  त्यामुळे एकूण बुकिंग्सची संख्या ३४९ पर्यंत वाढली आहे.  

रेमंड रियल्टीने विक्रीमध्ये नोंदवलेल्या मजबूत वृद्धीला अनुरूप असेच हे यश आहे.गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत यावर्षी रेमंड रियल्टीने ८१ कोटी रुपये ते २४५ कोटी रुपये अशी तीन पट वृद्धी विक्रीमध्ये साध्य केली आहे.  रियल्टी सेगमेंटचे त्रैमासिक ईबीआयटीडीए मार्जिन २५.८% होते.

श्री.गौतम हरी सिंघानिया, चेअरमन-मॅनेजिंग डायरेक्टर, रेमंड लिमिटेड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले,  “बाजारपेठांमध्ये लिक्विडीटी प्रवाह वाढल्यामुळे घरांच्या मागणीत बरीच तेजी आल्याचे आम्हाला दिसून आले आहे. वेगाने पूर्ण होत असलेले बांधकाम आणि वचने वेळेत पूर्ण करत असल्याने ग्राहकांचा रेमंड रियल्टीवरील विश्वास वाढत आहे, आधुनिक काळातील घर खरेदीदारांच्या बदलत्या, वाढत्या मागण्या पूर्ण करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.”

रेमंड रियल्टीने अवघ्या तीन वर्षात ठाणे क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाचे रियल इस्टेट डेव्हलपर ही ओळख निर्माण केली आहे. सर्वात चांगल्या ठिकाणी, सर्वात चांगल्या किमतीला, सर्वात चांगली उत्पादने बनवण्याचे प्रभावी व्यवसाय धोरण राबवत असल्याचे हे फलित आहे. रियल इस्टेट क्षेत्रात, खासकरून घर विभागात, कोविडनंतर मागणी आणि पुरवठा या दोन्ही गोष्टी खूप वेगाने पूर्वपदावर आल्या. भारतीय रिझर्व्ह बँकेने अनेक दर वाढवले पण तरी भविष्यातील उत्पन्नाबाबत विश्वास आणि कोविडमुळे, सुरक्षेच्या कारणास्तव, स्वतःचे घर असावे ही जाणीव झाल्याने, भारतीय महानगरांमध्ये संपत्ती विक्रीत चांगलीच तेजी आली आणि गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवण्यात चांगलीच मदत झाली आहे.Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "‘इंडेक्सटॅप प्रीमियर लीग चार्ट’ मध्ये रेमंड रियल्टीने मिळवले पहिले स्थान"

Leave a comment

Your email address will not be published.


*