एक्सपीरियन बनला भारतामधील पहिला क्रेडीट ब्यूरो, व्हॉट्सॲपवर मोफत क्रेडीट स्कोअर मिळणार

Experian India Logo

Neeraj Dhawan, Managing Director, Experian India

  • तुमच्या एक्सपीरियन क्रेडीट स्कोअरला झटपट, सुलभ आणि सुरक्षित उपलब्धतता  
  • क्रेडीट अपडेटवर नियमितपणे देखरेख तसेच तुमची क्रेडीट प्रोफाईलसंबंधी होणारी फसवणूक शोधून काढणार 

मुंबई10 नोव्हेंबर 2022 (GPN): एक्सपीरियन इंडिया, ही अग्रगण्य डेटा एनालिटिक्स आणि डिसीजनिंग कंपनी असून पहिला क्रेडीट ब्यूरो आहे, ज्याला क्रेडीट इन्फॉर्मेशन कंपनीज (रेग्युलेशन) ऐक्ट, 2005 अंतर्गत परवाना प्राप्त आहे. त्यांच्या वतीने भारतीय ग्राहकांकरिता व्हॉट्सॲपवर मोफत क्रेडीट स्कोअर तपास सेवेची घोषणा करण्यात आली. आता ग्राहकांना त्यांचा एक्सपीरियन क्रेडीट रिपोर्ट नियमितपणे तपासता येणार आहे. तसेच सुलभतेने क्रेडीट प्रोफाईलवर देखरेख ठेवणे शक्य होईल.

या उपक्रमाद्वारे झटपट, सुरक्षित आणि सुलभ पद्धतीने प्रत्येकाकरिता कुठेही, कधीही एक्सपीरियन क्रेडीट रिपोर्टची उपलब्धतता सादर करण्यात आली. ग्राहकांना त्यांचा एक्सपीरियन क्रेडीट रिपोर्ट तपासता येईल, कोणत्याही अनियमिततेचा ट्रॅक ठेवता येणार आहे, झटपट फसवणूक शोधता येईल आणि त्यांचा क्रेडीट स्कोअर पुन्हा उभारणे शक्य होईल, तसेच त्यांच्या क्रेडीट प्रोफाईलवर नियंत्रण मिळवणं शक्य होणार आहे. भारतात जगाच्या तुलनेत व्हॉट्सॲप वापरकर्त्यांची संख्या सर्वाधिक – 487.5 मिलियन वापरकर्ते आहेत. व्हॉट्सॲप मेसेजिंग सर्व्हिस ही भारतीय ग्राहकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे.

एक्सपीरियन इंडियाचे कंट्री मॅनेजर, नीरज धवन म्हणाले: “चांगल्या कारणासाठी डेटा वापरणे या एक्सपीरियनच्या अभियानातील हा महत्त्वपूर्ण मापदंड आहे. ग्राहकांना क्रेडीटसंबंधी माहिती सहज उपलब्ध झाली पाहिजे आणि भारताची क्रेडीट परिसंस्था सशक्त उभारलेली असावी असं आम्हाला वाटते. प्रत्येक ग्राहकाला चांगला आणि किफायतशीर क्रेडीट एक्सेस असावा असा विश्वास आम्हाला एक्सपीरियनमध्ये वाटतो. त्यांना व्हॉट्सॲपवर मोफत क्रेडीट स्कोअर तपासता आल्याने भारतीय ग्राहकांना सुनिश्चित वेळेत क्रेडीटसंबंधी माहिती मिळेल, त्यांना माहितीपूर्ण क्रेडीट निर्णय घेण्यास साह्य मिळेल, चांगल्या वित्तीय सवयी लागतील, आणि चांगला क्रेडीट स्कोअर राखण्याच्या फायद्याची मजा घेता येईल – ज्यामुळे त्यांचं वित्तीय आरोग्य सुधारण्यात सबलीकरण होईल आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन घडेल.”

काही सोप्या स्टेप्स पाळून ग्राहकांना व्हॉट्सॲपवर मोफत क्रेडीट स्कोअर तपासणे शक्य होईल –

  • एक्सपीरियन भारतच्या व्हॉटस्अॅप क्रमांक +91-9920035444 वर ‘Hey’ पाठवा किंवा https://wa.me/message/LBKHANJQNOUKF1 ला भेट द्या.
  • OR Scan Barcode
  • काही मूलभूत माहिती शेअर करा, जसं की तुमचं नाव, ई-मेल आयडी आणि फोन क्रमांक
  • झटपट व्हॉट्सॲपवर एक्सपीरियन क्रेडीट स्कोअर मिळवा
  • एक्सपीरियन क्रेडीट रिपोर्टच्या पासवर्ड-संरक्षित प्रतीची विनंती पाठवा, जी तुमच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठविण्यात येईल (समाप्त)

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "एक्सपीरियन बनला भारतामधील पहिला क्रेडीट ब्यूरो, व्हॉट्सॲपवर मोफत क्रेडीट स्कोअर मिळणार"

Leave a comment

Your email address will not be published.


*