
[From L to R]
श्री रोहित मिस्त्री, प्रमुख- व्यवसाय विकास आणि विपणन, एलआयसी म्युच्युअल फंड; श्री नित्यानंद प्रभू, कार्यकारी संचालक आणि व्यवसाय प्रमुख, एलआयसी म्युच्युअल फंड; श्री टी.एस. रामकृष्णन,व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी-एलआयसी म्युच्युअल फंड निधी, श्री संजय नारायण, महाव्यवस्थापक – रिटेल अॅसेट्स वर्टिकल, युनियन बँक ऑफ इंडिया; श्री ए. राधाकृष्णन,उपमहाव्यवस्थापक,टीपीपीडी, युनियन बँक ऑफ इंडिया.)
युनियन बँक ऑफ इंडिया तृतीय पक्ष उत्पन्नात चांगली कामगिरी करत आहे, आणि आपल्या ग्राहकांना विशेष उत्पादने देण्यासाठी विमा आणि म्युच्युअल फंड भागीदारांसोबत जवळून काम करत आहे.
याप्रसंगी बोलताना, युनियन बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक श्री संजय नारायण म्हणाले, “युनियन बँक ऑफ इंडियामध्ये, आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादने देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.एलआयसीसोबतचा आमचा टाय-अप जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे जो विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील आमच्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरेल.”
एलआयसी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री टी.एस. रामकृष्णन म्हणाले, “आमची म्युच्युअल फंड उत्पादने ऑफर करण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियासोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. युनियन बँक ऑफ इंडिया आणि एलआयसी म्युच्युअल फंड यांची देशभरात, विशेषत: ग्रामीण आणि निमशहरी भागात विस्तृत पोहोच आहे, ज्यामुळे आम्हाला मोठ्या संख्येने गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचता येईल.”
Be the first to comment on "युनियन बँक ऑफ इंडियाने एलआयसी म्युच्युअल फंडाशी केला करार"