एज्युव्हेट समिट २०२२ मध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्कच्या अंमलबजावणीवर शिक्षणतज्ज्ञांचा वादविवाद

हा कार्यक्रम, लेट्स एज्युव्हेट द्वारे आयोजित करण्यात आला होता.

मुंबई: भारतभरातील ३००+ हून अधिक शाळांना नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपाय प्रदान करणाऱ्या एडटेक स्टार्ट अप असलेल्या लेट्स एज्युव्हेटने, अलीकडेच मुंबईत ‘एज्युव्हेट समिट २०२२’ आयोजित केली होती. या शिखर परिषदेचा एक भाग म्हणून, इतर मान्यवरांसह मुंबईतील प्राचार्य आणि शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले होते.

या शिखर परिषदेदरम्यान, ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी’ या विषयावर चर्चा करण्यासाठी पॅनल चर्चा आयोजित करण्यात आली होती. पॅनलच्या उपस्थित सदस्यांनी, अनेक विषयांवर चर्चा केली, ज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० ची मार्गदर्शक तत्त्वे, त्याची संपूर्ण भारतात अंमलबजावणी, शाळा त्यांच्या अध्यापनशास्त्रात कशाप्रकारे नवनवीन संशोधन करत आहेत आणि ते धोरणांशी कसे जुळवून घेत आहेत, या बाबी समाविष्ट होत्या. पॅनलच्या सदस्यांमध्ये सुश्री ऋचा कुमार – शैक्षणिक संचालिका, संस्कृती वर्ल्ड स्कूल; सुश्री सीमा जेनसन – उपसंचालक, एमएनआर ग्रुप ऑफ स्कूल्स; डॉ. प्रतिभा मिश्रा – प्राचार्य, पानबाई इंटरनॅशनल स्कूल; डॉ. सीमा नेगी – संचालक प्राचार्य, संजीवनी वर्ल्ड स्कूल; डॉ. स्टॅनी फेलिक्स पिंटो – शिक्षणतज्ज्ञ; कु. निकिता कोठारी – मुख्याध्यापिका, अरुणोदय पब्लिक स्कूल; कु. सीमा शेख – मुख्याध्यापिका, प्रज्ञा बोधिनी हायस्कूल आणि कु. अनुपमा दीदी – टीईडीएक्स स्पीकर आणि शिक्षणतज्ज्ञ, यांचा समावेश होता.

या शिखर परिषदेमध्ये, ‘होलिस्टिक रिपोर्ट कार्ड’च्या अंमलबजावणीवर पॅनल चर्चा आणि लेट्स एज्युव्हेट मॅन्डेटवर सादरीकरण यांचा समावेश होता.

कार्यक्रमातील उपक्रमांच्या समारोपानंतर, लेट्स एज्युव्हेटचे सह-संस्थापक अनिकेत पालव म्हणाले, “आम्हाला या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आणि शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षणतज्ञ तसेच क्षेत्रातील तज्ञ यांच्यात ही बैठक घडवून आणण्यात अभिमान वाटत आहे. या कार्यक्रमादरम्यान विचार आणि सूचनांची देवाणघेवाण, निश्चितच मनोरंजक आणि अभ्यासपूर्ण होती. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ही बाब जाणून घेणे उत्साहवर्धक होते की, या सत्रांमुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून चांगले कसे शिकता येईल, हे समजून घेण्यात मदत झाली. आम्ही देशभरात अशा आणखी शिखर परिषदा आयोजित करण्यास उत्सुक आहोत.”

लेट्स एज्युव्हेट बद्दल

लेट्स एज्युव्हेट ही एक अशी एडटेक स्टार्टअप आहे, जिची सह-स्थापना अनिकेत पालव यांनी केली आहे. ही, एकात्मिक अभ्यासक्रम (एनईपी मार्गदर्शक तत्त्वांनुसार), विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक शिक्षण किट, केंद्रीकृत ईआरपी प्रणाली, ऑनलाइन वर्गांसाठी एक व्यासपीठ, ई-पुस्तके आणि परस्परसंवादी पुस्तके, शिक्षकांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षण, धडे योजना आणि अध्यापन संसाधने, मूल्यांकन समर्थनासह तयार प्रश्न बँक, डिजिटल क्लासरूम – स्मार्ट टीव्ही आणि टॅब, विपणन आणि प्रवेश समर्थन, देशभरातील के१२ शाळांना बधारहित अंमलबजावणी प्रक्रिया, यांचा समावेश असलेल्या सेवांची श्रेणी प्रदान करते.

लेट्स एज्युव्हेटने, २०२० मध्ये तिच्या कामास सुरुवात केली आणि तिचे मजबूत शैक्षणिक आणि गैर-शैक्षणिक उपाय, ३००+ सार्वजनिक आणि खाजगी शाळांद्वारे वापरले जातात आणि त्यांचा आतापर्यंत ५०,०००+ विद्यार्थ्यांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. लेट्स एज्युव्हेटने २५० विद्यार्थ्यांपासून ते ३०,०००+ विद्यार्थ्यांपर्यंत, भारतातील आघाडीची के१२ शाळा शृंखला असलेल्या ऑर्किड्स-द इंटरनॅशनल स्कूल, यांना मोठ्या प्रमाणात शाश्वत विस्तार प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ओआयएसच्या व्यतिरिक्त, लेट्स एज्युव्हेटने अवघ्या एका दशकात भारतातील ८ राज्यांमध्ये आपली उपस्थिती वाढवली आहे आणि त्यांना डिजिटल आणि ऑपरेशनल सहाय्य प्रदान केले आहे.

लेट्स एज्युव्हेटचे मुख्य गीत आहे, “निर्माण करा, शिक्षित करा, नवीन करा”.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "एज्युव्हेट समिट २०२२ मध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्कच्या अंमलबजावणीवर शिक्षणतज्ज्ञांचा वादविवाद"

Leave a comment

Your email address will not be published.


*