मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटल्स मध्ये मुंबईतील स्पेशॅलिटी सर्जिकल आँकोलॉजीच्या सहयोगाने सुरू करत आहे ‘वॉकहार्ट कॅन्सर केअर सेंटर’

मुंबई, 15 ऑक्टोबर, 2022 (GPN): मुंबई सेंट्रलच्या वॉकहार्ट हॉस्पिटल्सने मुंबईतील स्पेशॅलिटी सर्जिकल आँकोलॉजीच्या सहयोगाने मुंबईत कॅन्सर केअर सेंटर सुरू केले आहे. भारतातील कॅन्सरच्या रुग्णांची वाढती संख्या बघता, रुग्णालयात दर्जेदार व प्रतिबंधात्मक उपचार देण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक इंद्रियाच्या दृष्टीने विचार करणे हा, जटील निर्णय घेण्यासाठी तसेच प्रत्येक आव्हानात्मक शस्त्रक्रिया अधिक सुरक्षितता व कार्यक्षमतेसह पार पाडण्यासाठी, उपयुक्त मार्ग आहे.

भारतातील नोंद झालेल्या कॅन्सर रुग्णांची संख्या यावर्षी 19 ते 20 लाख एवढी असावी असा अंदाज आहे, तर प्रत्यक्षात नोंद झालेल्या रुग्णांहून 1.5 ते 3 पटींनी अधिक कॅन्सर रुग्ण असावेत, असे फिक्की व ईवाय यांच्या अभ्यासातून पुढे आले आहे. पुरुषांमध्ये सर्वाधिक आढळणारे कॅन्सरचे प्रकार मुखाच्या पोकळीतील (16.2%) कॅन्सर व फुप्फुसांचा कॅन्सर (8%) हे आहेत. त्याखालोखाल जठर (6.3%), कोलोरेक्टल (6.3%) आणि अन्ननलिका (6.2%) यांच्या कॅन्सरचे रुग्ण आढळतात. कॅन्सरग्रस्त पुरुषांपैकी 43 टक्क्यांमध्ये वारंवार तंबाखू सेवन हे कारण दिसून येते हे निरीक्षण महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच जीवनशैलीत बदल केल्यास कॅन्सरचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होऊ शकेल हे स्पष्ट आहे. उर्वरित 57% रुग्णांमध्ये अन्य सर्व प्रकारचे कॅन्सर आढळून आले आहेत. स्त्रियांमध्ये स्तनांचा (26.3%) आणि गर्भाशयमुखाचा (सर्वायकल) (18.3%) कॅन्सर सर्वाधिक प्रमाणात आढळतो. त्या खालोखाल अंडाशय (6.7%), मुखातील पोकळी (4.6%) आणि कोलोरेक्टल (3.7%) कॅन्सरचे प्रमाण आढळते. कॅन्सरने होणाऱ्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक प्रमाण स्तनांचा कॅन्सर, सर्वायकल कॅन्सर, मुखाचा कॅन्सर व फुप्फुसांच्या कॅन्सरचे आहे.

लॉन्च बद्दल बोलताना मुंबईतील डॉ संकेत मेहता, सल्लागार ऑन्को- सर्जन, स्पेशालिटी सर्जिकल ऑन्कोलॉजी सांगतात, “कॅन्सर ही उपचारांसाठी सर्वांत आव्हानात्मक वैद्यकीय अवस्था आहे. कॅन्सर केअरमधील जटीलता वाढत असल्यामुळे आणि त्याचबरोबर आव्हानात्मक शस्त्रक्रियेच्या स्थिती हाताळण्याच्या क्षमता व सुविधाही विस्तृतपणे वाढत असल्यामुळे, सर्जन्सची उत्क्रांती विशिष्ट कॅन्सरच्या तज्ज्ञांमध्ये होऊ लागली आहे आणि रुग्णांसाठी प्रगत उपचार उपलब्ध होत आहेत. मिनिमली इन्वेजिव शस्त्रक्रिया व रोबोटिक शस्त्रक्रियांसारखी नवीन शस्त्रक्रिया तंत्रे पारंपरिक पद्दतींची जागा घेऊ लागली आहेत, निर्णय घेण्याचे नवीन आकृतीबंध उत्क्रांत होत आहेत, आणि यामध्ये सर्जन्स व अन्य क्रॉस-स्पेशॅलिटींमध्ये लक्षणीय समन्वयाची आवश्यकता निर्माण होत आहे. हेच लक्षात घेऊन विशिष्ट इंद्रियांवर उपचार करण्याच्या दृष्टीने  आपली कौशल्ये एकाग्र करणाऱ्या (ऑर्गन-स्पेसिफिक) उच्चप्रशिक्षित कॅन्सर सर्जन्सनी स्पेशॅलिटी सर्जिकल आँकोलॉजी (SSO) हा समूह तयार केला आहे.”

डॉ. संकेत मेहता पुढे वॉकहार्ट हॉस्पिटलशी झालेल्या सहयोगाबद्दल सांगतात, “ऑर्गन-स्पेसिफिक कॅन्सर सर्जन्सची एक तज्ज्ञ टीम, उच्च दर्जाची संरचना, पूरक वैद्यकीय सेवा, आयसीयू बॅक-अप, अत्याधुनिक शस्त्रक्रिया दालने, भुलीची उपकरणे, शस्त्रक्रियेची साधने व उपकरणे यांच्या सहाय्याने, जटील कॅन्सर शस्त्रक्रिया पार पाडेल. यात स्पेशॅलिटी सर्जिकल आँकोलॉजी व वॉकहार्ट हॉस्पिटल यांच्यातील समन्वयातून दर्जेदार कॅन्सर केअरचे केंद्र आकार घेईल.”

वॉकहार्ट हॉस्पिटल्सचे महाराष्ट्र विभागाचे CEO डॉ. पराग रिंदानी सांगतात, “स्पेशॅलिटी सर्जिकल आँकोलॉजीच्या (SSO) सहयोगाने समाजाला क्रांतीकारी कॅन्सर केअर उपचार देणार असल्याचा आम्हाला अभिमान आहे. कॅन्सरवर उपचार ही जटील प्रक्रिया आहे, कदाचित सर्व आजारांमध्ये कॅन्सरवरील उपचार सर्वांत गुंतागुंतीचे आहेत. उपचारांची योजना निश्चित करताना व तिची अंमलबजावणी करताना अनेक परिवर्तनीय घटकांचा विचार करणे आवश्यक असते. कॅन्सरचा प्रकार, कॅन्सरचा परिणाम झालेला अवयव, आजाराची तीव्रता, परिणाम झालेल्या अवयवाचे आरोग्य, आजाराचा टप्पा, आजाराचे मेटास्टॅटिक (आजार कुठून कुठपर्यंत पसरला आहे), रुग्णाचे वय, रुग्णाचे शारीरिक आरोग्य, अन्य सहव्याधी, सहकार्य, उपचार परवडण्याजोगे असणे, किमोथेरपी किंवा रेडिओथेरपीची भूमिका, त्यांचा निष्पत्तीशी संबंध असे अनेक घटक विचारात घ्यावे लागतात. ऑर्गन-स्पेसिफिक कॅन्सर उपचार हे विविध शाखांत मनापासून काम करणाऱ्या डॉक्टरांद्वारे दिले जातील आणि यातून उच्च दर्जाचे उपचार देऊन रुग्णाला त्याचे आरोग्य पुन्हा प्राप्त करण्याची सर्वोत्तम संधी दिली जाईल.”

वॉकहार्ट कॅन्सर केअर सेंटरचा भर सध्या भारतात उपलब्ध असलेल्या कॅन्सर केअर सुविधांमधील तफावत दूर करून कॅन्सर रुग्णांना सर्वांगीण, नवोन्मेषकारी व मूल्याधारित उपचार देण्यावर असेल.-Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटल्स मध्ये मुंबईतील स्पेशॅलिटी सर्जिकल आँकोलॉजीच्या सहयोगाने सुरू करत आहे ‘वॉकहार्ट कॅन्सर केअर सेंटर’"

Leave a comment

Your email address will not be published.


*