बँक ऑफ बडोदाने देशभरात चार मिड-कॉर्पोरेट क्लस्टर ऑफिसिस उघडलेली आहेत

Bank of Baroda (BoB) Logo

प्रत्येक मिड-कॉर्पोरेट क्लस्टर ऑफिस विशेष शाखांचा संच सांभाळेल

बँक मिड-कॉर्पोरेट विभागात आपली उपस्थिती वाढविण्यासाठी केंद्रित दृष्टीकोनाचे अनुसरण करीत आहे

मुंबई, 13 ऑक्टोबर, 2022 (GPN): भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने  मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या चार विभागांमध्ये चार मिड-कॉर्पोरेट क्लस्टर ऑफिसिस उघडली असल्याची आज घोषणा केली आहे. या क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रित करण्याच्या बँकेच्या धोरणानुसार, प्रत्येक मिड-कॉर्पोरेट क्लस्टर ऑफिस केवळ मध्यम आकाराच्या कॉर्पोरेट्सला सेवा देणाऱ्या प्रत्येक विभागातील विशेष शाखांच्या संचाची देखरेख करेल.

धोरणात्मक पाऊल उचलत बँकेने नुकतेच आपल्या कॉर्पोरेट बँकिंग मॉडेलची पुनर्रचना केली आहे. कॉर्पोरेट बँकिंग व्हर्टिकल द्वारे दोन घटकांमध्ये विभागले गेलेले आहे – मोठे कॉर्पोरेट्स आणि मिड-कॉर्पोरेट्स – जेणेकरून दोन्ही ग्राहक विभागांना परिणामकारक सेवा देता येईल. मिड-कॉर्पोरेट व्हर्टिकल सेवा अंतर्गत कंपन्यांना 250 कोटी रुपयांपर्यंत क्रेडिट सुविधा उपलब्ध करता येणार, तर त्याहून पुढचा व्यवसायानां मोठे कॉर्पोरेट व्हर्टिकल सुविधा देणार.

बँक ऑफ बडोदाचे कार्यपालक निदेशक देबदत्त चांद, म्हणाले की, “पतपुरवठ्याच्या वाढीला गती देण्याबरोबरच आर्थिक क्रियाकलापांना वेग येत असल्याने, आमचा विश्वास आहे की ही एक महत्त्वपूर्ण संधी मिड-कॉर्पोरेट ऑफिस मध्ये आहे. मध्यम आकाराच्या कंपन्यांतर्फे पतच्या मागणीत वाढ झालेली आहे; त्याच बरोबर हा क्षेत्र मोठ्या प्रमाणात व्यवसायिक शक्यता आहे. टिकाऊ पद्धतीने दर्जेदार मिड-कॉर्पोरेट लोन देण्यावर आमचा भर आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये आमचा मिड-कॉर्पोरेट पोर्टफोलिओ दोन अंकी(double digit) स्वरूपात वाढविण्याचे उद्दीष्ट ठेवून ही सुरवात करत आहोत.”

ह्या कार्यवाही (ऑपरेटिंग मॉडेल) आणि शाखा नेटवर्क द्वारे बैंक आपली परिचालन स्थिति मजबूत करेल जेणेकरून मध्यम आकाराच्या कॉर्पोरेट्सशी व्यवसाय वाढविता येईल आणि देशभरात समर्पित शाखा उघडण्याची योजना आहेत. उपायांची सर्वसमावेशक श्रेणी उपलब्ध करून देणे आणि अग्रिम निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत वेगवान कार्यवाहीसाठी वेळ सुनिश्चित करण्याचे काम या शाखा करतील. ग्राहकांना सेवा देण्यासाठी बँक 300 हून जास्त खास रिलेशनशिप मॅनेजर्स (आरएम्स) आणि क्रेडिट अॅनॅलिस्ट्स यांची नेमणूक करणार आहे.Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "बँक ऑफ बडोदाने देशभरात चार मिड-कॉर्पोरेट क्लस्टर ऑफिसिस उघडलेली आहेत"

Leave a comment

Your email address will not be published.


*