अपोलोचा ‘कनेक्टेड केयर प्रोग्रॅम’ लाँच

Dr. Sangeetha Reddy, Joint Managing Director, Apollo Hospitals

देशांतर्गत विकसित केलेली स्वयंचलित, जलद प्रतिसाद देणारी रुग्ण देखरेख यंत्रणा

नवी मुंबई, १२ ऑक्टोबर, २०२२ (GPN):- अपोलो या भारतातील सर्वात मोठ्या व्हर्टिकली इंटिग्रेटेड आरोग्यसेवा प्लॅटफॉर्मने आज देशांतर्गत विकसित केलेली स्वयंचलित, जलद प्रतिसाद देणारी रुग्ण देखरेख यंत्रणा विकसित केल्याचे जाहीर केले. ही यंत्रणा रुग्णावर देखरेख करण्यासाठी खास तयार करण्यात आली असून रुग्णाची तब्येत अनपेक्षितरीत्या ढासळल्यास ही यंत्रणा स्वतःहून तातडीने तज्ज्ञांच्या टीमला सावध करेल. यामुळे वेळीच योग्य तज्ज्ञांना हस्तक्षेप करता येईल आणि पर्यायाने रुग्णाची स्थिती चांगल्या प्रकारे हाताळता येईल.

डॉ. संगीता रेड्डी, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, अपोलो हॉस्पिटल म्हणाल्या, ‘‘अपोलोने कायमच आपल्या रुग्णांना सर्वोत्तम आणि सुसंगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. ही देशांतर्गत डिझाइन करण्यात आलेली स्वयंचलित, जलद प्रतिसाद देणारी यंत्रणा हे त्याच दिशेने टाकलेले पाऊल आहे. रिमोट हेल्थ केअर क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि सर्वोत्तम वैद्यकीय गुणवत्तेच्या मदतीने केवळ अपोलो अशाप्रकारची यंत्रणा भारतात तयार करू शकते. ग्राहकापर्यंत ही यंत्रणा पोहोचवताना आणि त्यांना वेगाने बरे करण्यास मदत करताना मला आनंद होत आहे.’’

अपोलोची तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार हेल्थनेट ग्लोबलने हा अत्याधुनिक, रिमोट आणि सातत्यपूर्ण मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म तयार केला असून त्याचे आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि वेयरेबल्समध्ये रुपांतर केले आहे, जे रुग्णाची सर्व माहिती पोहोचवते आणि ती केयर प्रोव्हायडर्सना ३ वेगवेगळ्या पातळीवर उपलब्ध करून देते. यामुळे कोणतीही महत्त्वाची घटना चुकत नाही व रुग्णाची सुरक्षितता राखली जाते.

या प्लॅटफॉर्मच्या मदतीने नर्सेस, प्रीमेट टीम्स, डॉक्टर्सना तसेच प्रादेशिक कमांड सेंटरवरून रुग्णाच्या तब्येतीवर लक्ष ठेवता येते. यातील एआयच्या मदतीने दिला जाणारा धोक्याचा इशारा तसेच अलर्ट सिस्टीममुळे वेळीच हस्तक्षेप करून योग्य काळजी घेता येते. मॉनिटरिंग सिस्टीम प्लॅटफॉर्म अपोलोच्या प्रदीर्घ आणि सर्वसमावेशक रिमोट- हेल्थ प्रोग्रॅमच्या मदतीने प्रशिक्षित करण्यात आला असून चेन्नई व हैद्राबादमध्ये त्याची प्रत्यक्ष चाचणी घेतली आहे. चाचणीच्या दोन महिन्यांत दोन्ही केंद्रांनी ही यंत्रणा प्रभावी नर्सिंग केयर पुरवण्यात आणि अनपेक्षित गुंतागुंतीमध्ये घट होण्यात लाभदायक ठरल्याचे सांगितले. ही यंत्रणा हार्डवेयर, आधुनिक सॉफ्टवेयरचे मिश्रण असून ती रुग्णाच्या मॉनिटरिंग यंत्रणेत समाविष्ट करण्यात आली आहे. उच्चशिक्षित आरोग्य तज्ज्ञांच्या कौशल्याची तसेच जलद प्रतिसादाची जोड देऊन ही यंत्रणा आणखी सफाईदार करण्यात आली आहे. सध्या अपोलो ही यंत्रणा आपल्या सर्व हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध करून देत असून त्यासाठी पुढील तीन वर्षांत १२ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "अपोलोचा ‘कनेक्टेड केयर प्रोग्रॅम’ लाँच"

Leave a comment

Your email address will not be published.


*