सणांच्या कालावधीसाठी एयू शॉपिंग धमाकामध्ये अनेक सवलती आणि ऑफर्स

AU Small Finance Bank Limited (AU Bank)
  • एयू डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सचा वापर करून केलेल्या खरेदीवर जिंका आयफोन १४ आणि गिफ्ट व्हाऊचर्स
  • पेमेंट आणि गुंतवणूक सेवांवर एयू०१०१ अॅपवर विविध प्रकारच्या ऑफर्स
  • विविध रिटेल कर्जांवर प्रोसेसिंग शुल्कावर सवलती
  • स्विगी, बिग बास्केट, झोमॅटो, जिओमार्ट, क्लिअर ट्रिप अशा प्लॅटफॉर्म्सवर आकर्षक ऑफर्स

मुंबई, 3 ऑक्टोबर 2022 (GPN): एयू स्मॉल फायनान्स  बँक या भारतातील सर्वांत मोठ्या स्मॉल फायनान्स बँकेने देशभरातील आगामी सणांच्या कालावधीसाठी एयू शॉपिंग धमाकाच्या चौथ्या आवृत्तीच्या अनावरणाची घोषणा केली आहे. हा एक पाच आठवड्यांचा शॉपिंग कार्निव्हल असेल. त्यात एयू बँकेच्या ग्राहकांना विविध प्रकारच्या सवलती, पुरस्कार आणि ऑफर्स बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून केलेल्या खरेदीवर दिल्या जातील. एयू शॉपिंग धमाका नवरात्रीच्या पवित्र सणाच्या निमित्ताने (२६ सप्टेंबर) सुरू झाला असून तो ३० ऑक्टोबर २०२२ पर्यंत म्हणजे दिवाळीनंतर संपेल.

सणांचा कालावधी अनेकदा अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवरून मोठ्या प्रमाणावर सवलती आणि ऑफर्सनी भरलेला असतो. एयू बँकेने एयू शॉपिंग धमाका त्यांच्या ग्राहकांना खरेदी करण्यासाठी एयू बँक डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डसवर रिवॉर्डस् आणि सवलती देण्यासाठी सुरू केला आहे.

या ऑफर्स इलेक्ट्रॉनिक्स, ट्रॅव्हल, डायनिंग, हेल्थ अँड वेलनेस आणि लाइफस्टाइल खरेदींमध्ये उपलब्ध आहेत. बँकेने ऑफर्सची घोषणा केलेले काही मोठे ब्रँड्स स्विगी, झोमॅटो, बिग बास्केट, क्लिअरट्रिप, यात्रा, मेकमायट्रिप, विजय सेल्स, बुकमायशो, फार्मईझी, जिओमार्ट इत्यादी आहेत. बँकेच्या ग्राहकांना एयू शॉपिंग धमाकासोबत दर आठवड्याला नव्याने आलेला आयफोन १४ आणि ५००० रूपयांचे अॅमेझॉन गिफ्ट व्हाऊचर्स जिंकण्याचीही संधी मिळेल.

एयू शॉपिंग धमाकादरम्यान बँकेने विविध कर्ज उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स घोषित केल्या आहेत. ग्राहक वाहन कर्जांच्या आणि गृह कर्जांच्या प्रक्रिया शुल्कावर प्रत्येकी ५० आणि २५ टक्क्यांच्या सवलती मिळवू शकतात. त्याशिवाय बँकेने गोल्ड लोनच्या प्रक्रिया शुल्कावर २ लाख रूपयांच्या रकमेपर्यंत प्रक्रिया शुल्क माफ करण्याचीही घोषणा केली आहे.

बँकेने एयू०१०१ या आपल्या डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्मवरील सेवांचा वापर करण्यासाठी ऑफर्स घोषित केल्या आहेत. बँकेच्या ग्राहकांना ट्रॅव्हल बुकिंग, बिल पेमेंट आणि यूपीआय पेमेंट्ससाठी अॅपचा वापर करून ३००० रूपयांची बचत करता येईल.

एयू शॉपिंग धमाकाच्या चौथ्या आवृत्तीच्या अनावरणाच्या निमित्ताने एयू बँकेचे कार्यकारी संचालक श्रीउत्तम टिबरेवाल म्हणाले की, “सणांचा कालावधी उत्सव आणि खरेदीसाठी मानला जातो. एयू शॉपिंग धमाकाच्या मागील तीन आवृत्त्यांमध्ये आम्हाला लोक या कालावधीत खरेदी करत असताना विविध सवलती आणि ऑफर्सचा विचार करत असल्याचे स्पष्ट दिसले. यावर्षी आम्ही आमच्या ग्राहकांना सणांचा पुरेपूर आनंद घेण्यास मदत करण्यासाठी विविध रिवॉर्डस् आणि ऑफर्स समाविष्ट करून एक उत्तम डील देत आहोत. आमचे ब्रँड भागीदारही सवलती आणि फायदे आमच्या ग्राहकांना देण्यासाठी सज्ज आहेत. एयू शॉपिंग धमाकासोबत आम्ही आमच्या ग्राहकांना लिमिटलेस जगण्यासाठी प्रेरित करतो.”

संपूर्ण देश सणांसाठी तयार होत असताना एयू बँकेने या सणांच्या कालावधीत जास्त काही मिळवण्याच्या संधी देण्यासाठी एयू शॉपिंग धमाकाची घोषणा केली आहे.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "सणांच्या कालावधीसाठी एयू शॉपिंग धमाकामध्ये अनेक सवलती आणि ऑफर्स"

Leave a comment

Your email address will not be published.


*