वेळेवर उपचार न घेणे जवळपास 70% हृदयविकार झटक्यांसाठी कारणीभूत, न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स पॅनलच्या तज्ज्ञांचा दावा

Neuberg Diagnostics Logo

Dr Sandesh Prabhu

Dr Ajith

Dr Vivek mahajan

  • राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणानुसारमागील पंधरा वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीतभारतात जवळपास 21% महिला आणि 24% पुरुष अतितणावाग्रस्त
  • 39% महिला आणि 49% पुरुषांमध्ये पूर्व-तणावाची स्थिती 

भारतबुधवार, 28 सप्टेंबर, 2022 (GPN): सदस्य मंडळाने न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स पॅनल चर्चेत चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवत ‘अतितणाव व हृदय विकार झटका’ या विषयासंबंधी जागरूकता निर्मितीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. आपल्या ह्रदय आरोग्यासंबंधी कायम देखरेखीखाली ठेवणे महत्त्वाचे असल्याचा मुद्दा या चर्चेतून अधोरेखित करण्यात आला. वयोगत कोणताही असोलोकांनी घरच्याघरी अॅम्ब्यूलटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग (एबीपीएम)करिता उपलब्ध विविध उपकरणांद्वारे रक्तदाब तपासणे आवश्यक ठरते. हृदय विकाराच्या झटक्याकरिता निरनिराळे पारंपरिक धोके जबाबदार असून अतितणाव हा प्रमुख घटकांपैकी एक घटक हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतो. कारण ही स्थिती शरीराच्या धमन्यांना प्रभावित करते.

उच्च रक्तदाब असल्यास रक्ताचा दबाव सातत्याने धमन्यांच्या भिंतींच्या विरुद्ध धक्का देत राहतो. हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जोराने कार्य करणे आवश्यक ठरते. काळानुरूप, हृदयावर पडणाऱ्या ताणामुळे हृदयाचे स्नायू कमकुवत होतात आणि त्यांची कार्यशीलता मंदावते. लवकरच अथवा काही काळाने, अतिताणाने बेजार झालेल्या हृदयाचे काम कायमचे थांबते.

मधुमेह, कोलेस्ट्रॉल, आळशी जीवनशैली, अतिमहत्त्वाकांक्षा तसेच ताण, नियमित अतिव्यायाम करणे, हवेचे प्रदूषण, धूम्रपान तसेच अनारोग्यदायक आहार आणि जीवनशैली ही हृदय विकारामागील प्रमुख कारणं आहेत.

फोर्टीस हॉस्पिटल्स मुंबई येथील कन्सलटंट इंटरवेंशनल कार्डीओलॉजी, डॉ. विवेक महाजन म्हणाले, “अशी काही औषधे आहेत, जी रक्तदाबाशी संबंधित औषधासोबत घेतल्यास रक्तदाब वाढू लागतो, या प्रकाराला कारणीभूत ठरणाऱ्या वेदनाशमन गोळ्यांच्या काही वर्गवाऱ्या म्हणजे आयब्यूप्रोफेन तसेच डायक्लोफेनॅक इत्यादी. अतिताणाला कारणीभूत अन्य औषध गट म्हणजे नाकाद्वारे सर्दीकरिता घेण्यात येणारे ड्रॉप, गर्भनिरोधक गोळ्या तसेच जेष्ठमधासारखी काही आयुर्वेदिक औषधे आणि स्टेरॉइडस्”.

ते पुढे म्हणाले की, “आजच्या काळात अगदी शाळकरी विद्यार्थी देखील अतीतणावग्रस्त असतात. अतिप्रमाणात खाणे, असंतुलित जीवनशैली, भाज्या व फळ सेवनाचा अभाव असे काही जोखमीचे घटक प्राथमिक स्वरूपातील अतितणावाला जबाबदार ठरतात. त्यामुळे कायम या वयोगटाला लक्ष्य करण्याची शिफारस करण्यात येते, जेणेकरून अतितणावाला प्रतिबंध करण्याविषयीचे शिक्षण देऊन चांगले आरोग्यदायक जीवन जगता येईल.

न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स, क्लिनिकल अँड इमेजिंग सेंटरचे वैद्यकीय संचालक डॉ अजिथ के. एन. म्हणाले, “आपल्या सर्वांना ठाऊक आहे, कधीही प्रतिबंध हा उपायापेक्षा बेहत्तर! त्यामुळे ठरावीक अंतराने आपला रक्तदाब तपासून घेणे फार महत्त्वपूर्ण ठरते! काही लक्षणे दिसू अथवा न दिसो! त्यासोबत संतुलित जीवनशैली, मिठाचा आहारात समावेश तपासणे, मोसमातील फळं खाणे, पुरेशी झोप घेणे, योग्य वजन राखणे तसेच शारीरिक व्यायाम आपल्या पेशींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी, आरोग्यदायक राहण्याकरिता तसेच रक्त दाब प्रतिबंधित करण्यासाठी साह्य करतो.”

जर एखादी व्यक्ति औषधोपचार घेत असेल आणि दीर्घकाळ तिचा रक्तदाब स्थिर असेल तर आपण औषधे थांबवू नये, उलट तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, त्याचप्रमाणे सदस्य मंडळाने जारी केल्याप्रमाणे औषधांचे प्रमाण किंवा गोळ्या कमी करण्याविषयी विचारणा करता येईल. कारण अल्प रीडिंगकरिता अनेक वेगळे घटक जबाबदार असतात आणि ते स्थिर नसतात.

मणिपाल हॉस्पिटल’ज व्हाईटफिल्डचे सल्लागार- कार्डिओलॉजी आणि इलेक्ट्रोसायकोलॉजी, डॉ संदेश प्रभू म्हणाले, “महासाथी दरम्यान अतितणाव प्रसारात वाढ झाल्याचा अनुभव आम्ही घेतला, घरून काम करण्याची पद्धत सामान्यपणे याला जबाबदार होती. केवळ रक्तदाबात नव्हे तर कोलेस्ट्रॉल, मधुमेह इत्यादीतही वाढ झाली.”

“ताजे मार्गदर्शक तत्त्व सिस्टोलिक ब्लड प्रेशर 130 एमएम एचजीहून अधिक तसेच डायस्टोलिक ब्लड प्रेशर 80 एमएम एचजीपेक्षा अधिक असल्यास ही अतितणावाची पहिली पायरी समजली जाते” असेही डॉ. प्रभू पुढे म्हणाले.

==============================

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "वेळेवर उपचार न घेणे जवळपास 70% हृदयविकार झटक्यांसाठी कारणीभूत, न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स पॅनलच्या तज्ज्ञांचा दावा"

Leave a comment

Your email address will not be published.


*