
250 kidney transplants activity at apollo hospital navi mumbai
जागतिक लोकसंख्या क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी, केवळ ०.१ % लोकांची अवयव दानासाठी नोंद
नवी मुंबई, १४ ऑगस्ट २०२२ (GPN):- अवयवदानाबाबत जागरूकता वाढत आहे पण अजूनही या दिशेने बरेच काम करायचे आहे. देशात जिवंत आणि मृत व्यक्तींच्या अवयवदानाची प्रक्रिया कायद्याने नियंत्रित केली जाते. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्येचा देश असूनही आपल्या देशातील केवळ ०.१% लोकांनी अवयव दानासाठी नोंदणी केली आहे, जी देशातील अवयव दानाची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी अपुरी आहे. अवयवदान महत्त्वाचे का आहे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी जागतिक अवयवदान दिन (World Organ Donation Day) साजरा केला जातो. या खास प्रसंगी नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने नवसंजीवनी देणारे २५०+ मूत्रपिंड प्रत्यारोपण करुन मैलाचा दगड गाठून हा दिवस साजरा केला. २५०+ मूत्रपिंड प्रत्यारोपणामध्ये जिवंत आणि मृत दात्याशी संबंधित प्रत्यारोपणाचा समावेश आहे, यामध्ये एबीओ विसंगती, बालरोग, लठ्ठ असलेला प्राप्तकर्ता, वृद्ध दात्याचे प्रत्यारोपण, डिसेन्सिटायझेशन (संवेदीकरण) शिष्टाचाराद्वारे अत्यंत संवेदनशील प्रत्यारोपण आणि स्वॅप प्रत्यारोपण यासारख्या जटिल प्रकरणांचा समावेश आहे.
सर्वसमावेशक मूत्रपिंड प्रत्यारोपण कार्यक्रम मूत्रविज्ञान आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि रोबोटिक शस्त्रक्रिया सल्लागार डॉ. अमोलकुमार पाटील, नेफ्रोलॉजी आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण चिकित्सक सल्लागार डॉ. रविंद्र निकळजी यांच्याद्वारे चालवला जातो. तसेच इतर नेफ्रोलॉजी, युरोलॉजिस्ट, ऍनेस्थेसियोलॉजिस्ट आणि प्रशिक्षित परिचर्या कर्मचार्यांद्वारे सहकार्य प्राप्त होते. डॉ. रविंद्र निकळजी म्हणाले की, “मूत्रपिंड प्रत्यारोपण ही जीवन वाचवणारी प्रक्रिया आहे आणि चांगले आरोग्य प्राप्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. दीर्घकालीन डायलिसिसपेक्षा खूप उत्तम आहे आणि दात्यांचा सेतू निर्माण करण्यासाठी आपण मृत दात्यांबद्दल जागरुकता वाढवणे आवश्यक आहे.”
डॉ. अमोलकुमार पाटील म्हणाले, “प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम जीवनासाठी आणि एकंदर आरोग्यासाठी मूत्रपिंडाचे आरोग्य राखणे महत्वाचे आहे. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे कमीतकमी वेदनादायक तंत्रांसह शस्त्रक्रियात्मक तंत्रज्ञानाचा सतत विकास होत आहे, ज्यामुळे शस्त्रक्रियेनंतर चांगल्याप्रकारे रोगमुक्तता होते आणि उत्तम सुधारित परिणाम दिसून येतात. उत्कृष्ट उपचारांचे केंद्र म्हणून आम्ही रक्तगटात विसंगती असलेले प्रत्यारोपण करु शकतो, याचे परिणाम इतके चांगले असतात की याची तुलना सुसंगत परिस्थितीशी करता येईल. भारतामध्ये अनेक प्रत्यारोपण करुन ९९% पेक्षा जास्त यशाचा दर असून आता नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सचे मूत्रपिंडासंबंधी प्रत्यारोपण केंद्र हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील रुग्णांसाठी गुणवत्तापूर्ण उपचार मिळवण्यासाठी एक आशेचा एक किरण ठरत आहे.”
Be the first to comment on "भारत जगभरातील रुग्णांसाठी गुणवत्तापूर्ण उपचार व प्रत्यारोपण केंद्र"