एयू स्मॉल फायनान्स बँकेकडून क्यूआयपी मार्गाने २,००० कोटी रूपयांचे टियर १ समभाग भांडवल आणि ५०० कोटी रूपयांचे टियर २ असे १० वर्षांचे बॉन्ड जारी करून एकूण २, ५०० कोटी रूपयांचे भांडवल उभारले आहे.

AU Small Finance Bank Limited (AU Bank)

Mr. Sanjay Agarwal, MD & CEO, AU Small Finance Bank

  • बँकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी भांडवल वाढ अनेकदा सबस्क्राइब करण्यात आली- समभाग चार पटींनी आणि टियर २ भांडवल २ पटींनी.
  • नवीन भांडवलाचा वापर मध्यम कालावधीत बँकेच्या वाढीच्या योजनांना पाठिंबा देण्यासाठी केला जाईल आणि बँकेचा कॅपिटल एडिक्वसी रेशो (सीआरएआर) २५ टक्क्यांपेक्षा जास्त.

मुंबई,१२ ऑगस्ट २०२२ (GPN)एयू स्मॉल फायनान्स  बँक या मालमत्तेनुसार भारतातील सर्वांत मोठ्या स्मॉल फायनान्स बँकेने एकूण २५०० कोटी रूपयांच्या भांडवलाच्या उभारणीची पूर्तता केली असून त्यात २,००० कोटी रूपयांचे टियर १ भांडवल आणि ५०० कोटी रूपयांचे टियर २ भांडवल समाविष्ट आहे. यामुळे बँकेचा एकूणच कॅपिटल एडिक्वसी रेशो (सीआरएआर) १९.४ टक्क्यांवरून २५.७ टक्क्यांवर गेला आहे (३० जून २०२२ नुसार प्रो फॉर्मा तत्वावर). या नवीन भांडवलाचा वापर मध्यम कालावधीत बँकेच्या वाढीच्या योजनांना पाठिंबा देण्यासाठी आणि नियामकांच्या कॅपिटल एडिक्वसीच्या गरजांपेक्षा जास्त पुरेसे भांडवल राखण्यासाठी केला जाईल.

क्यूआयपी इश्यू २,००० कोटी रूपये (२५३ दशलक्ष डॉलर्स) ३ ऑगस्ट २२ रोजी प्रति समभाग ५७०-५९० रूपयांच्या किंमतीत जारी करण्यात आला आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (डीआयआय) यांच्याकडून मोठी मागणी दिसून आली. त्याचबरोबर क्यूआयपीला ४ पटींपेक्षा जास्त सबस्क्राइब करण्यात आले. मागणी सॉवरिन वेल्थ फंड्स, मोठे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार, जागतिक मालमत्ता व्यवस्थापक, देशांतर्गत विमा कंपन्या आणि म्युच्युअल फंड यांच्यातील गुंतवणुकींमुळे १ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे. बँकेच्या कॅपिटल रेझिंग कमिटी (सीआरसी)ने इश्यूची किंमत प्रति समभाग ५८० रूपये निश्चित केली असून त्यांनी १० ते ६७ रूपयांच्या दर्शनी मूल्यांचे ३,४४,८२,७५८ (तीन कोटी चव्वेचाळीस लाख ब्याऐंशी हजार सातशे अठ्ठावन्न) वितरण केले आहे.

स्मॉल फायनान्स बँकेत एप्रिल २०१७ मध्ये रूपांतर झाल्यानंतर बँकेने २०१८ आणि २०१९ मध्ये टेमसेककडून १,००० कोटी रूपये बँकेच्या मार्च २०२१ मधील पहिल्या क्यूआयपीद्वारे ६२५.५ कोटी रूपयांच्या प्रेफरेन्शियल इश्यूअन्‍समधून उभारले. त्यानंतरची तिसरी आणि सर्वांत मोठी प्राथमिक भांडवल उभारणी आहे.

बँकेने असुरक्षित, सबऑर्डिनेटेड, रेटेड, लिस्टेड, रिडीम करण्यायोग्य, बिगर रूपांतरणीय लोअर टियर २ बाँड्स नॉन कन्वर्टिबल डिबेंचर्स (एनसीडी)द्वारे टियर २ भांडवलाची उभारणी केली आहे. २ ऑगस्ट २०२२ रोजीचा ४०० कोटी रूपयांच्या पायाभूत आकाराचा इश्यू २०० कोटी रूपयांच्या ग्रीन शू पर्यायासोबत आला आणि त्या इश्यूचे पात्र संस्थात्मक ग्राहक (क्यूआयबी) जसे म्युच्युअल फंड्स, विमा कंपन्या, बँका इत्यादींकडून मोठे स्वागत झाले. त्याची अंतिम बोली १,११० कोटी रूपयांची होती. बँकेने अंतिमतः १०० कोटी रूपयांचा ग्रीन शू पर्याय ठेवून ५०० कोटी रूपयांचे बाँड्स वितरित केले. या इश्यूला क्रिसिल आणि केअर रेटिंग्सनुसार ‘एए/स्टेबल’ हा दर्जा देण्यात आला आहे.

या निमित्ताने बोलताना एयू स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय अग्रवाल म्हणाले की, “गुंतवणूकदारांनी बाजारातील परिस्थिती कठीण असतानाही उत्तम प्रतिसाद देऊन २,५०० कोटी रूपयांचे भांडवल उभारण्यास मदत केली आहे, त्यातील २,००० कोटी रूपये टियर १ भांडवल असून ५०० कोटी रूपये टियर २ भांडवल आहे त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. आमच्या सर्व विद्यमान समभागधारकांचे मी या इश्यूमध्ये सहभागी होण्यासाठी खूप आभार मानतो आणि नवीन गुंतवणूकदारांचे स्वागत करतो- आर्थिक संस्था आणि देशांतर्गत गुंतवणूकदार. त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आमच्या वाढीच्या योजनांना पाठबळ दिले. आमचे ध्येय अत्यंत शाश्वत बिझनेस मॉडेलसोबत जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानावर आधारित रिटेल बँक उभारण्याचे असून या भांडवलाचा आम्हाला यात खूप फायदा होईल. २५ टक्क्यांपेक्षा जास्त (फ्रो फार्मा स्वरूपात) सीआरएआर जारी केल्यानंतर आम्ही सेवा देत असलेल्या विविध विभागांकडून येणाऱ्या सातत्यपूर्ण मागण्या आणि स्थिर मालमत्ता दर्जा यांच्यासोबत आम्ही वाढण्यासाठी आणि भारत आम्हाला देत असलेल्या प्रचंड संधींचा फायदा घेण्यासाठी सज्ज आहोत. माझा विश्वास आहे की, हे दशक भारताचे असेल आणि आमच्या क्यूआयपी आणि टियर २ इश्यूंचे यश आणि एफआयआयकडून येणारी प्रचंड मागणी या क्षेत्रासाठी उत्तम सेवा देऊ शकेल, याची मला खात्री आहे.”

==============================

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "एयू स्मॉल फायनान्स बँकेकडून क्यूआयपी मार्गाने २,००० कोटी रूपयांचे टियर १ समभाग भांडवल आणि ५०० कोटी रूपयांचे टियर २ असे १० वर्षांचे बॉन्ड जारी करून एकूण २, ५०० कोटी रूपयांचे भांडवल उभारले आहे."

Leave a comment

Your email address will not be published.


*