टाटा संपन्नचे ड्राय फ्रुट्स कॅटेगरी मध्ये पदार्पण; परिपूर्ण पोषण देणारे अन्नपदार्थ बाजारपेठेत उपलब्ध करवून देण्यासाठी टाटा संपन्न आग्रही

मुंबई, २६ जुलै २०२२ (GPN):- भारतातील एक सर्वात लोकप्रिय एफएमसीजी ब्रँड टाटा संपन्नने ड्राय फ्रुट्स कॅटेगरीमध्ये अतिशय दमदार पदार्पण केले आहे. एरव्ही काहीशा विस्कळीत स्वरूपाच्या या उद्योगक्षेत्रात टाटा संपन्न ब्रँड सातत्याने विस्तार करत असून त्यांना भरपूर लोकप्रियता मिळत आहे. लवकरच हा ब्रँड देशभरातील खूप मोठ्या रिटेल नेटवर्कमध्ये उपलब्ध होईल. परिपूर्ण पोषण देणारे अन्नपदार्थ बाजारपेठेत उपलब्ध करवून देण्यासाठी सुरु करण्यात आलेला ब्रँड टाटा संपन्नने उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत गुणवत्तेमध्ये समृद्ध ड्राय फ्रुट्स सादर केले आहेत. टाटा संपन्नच्या नट्स अँड ड्राय फ्रुट्स रेन्जमध्ये उत्तम दर्जाचे काजू, मनुका, बदाम आणि पिस्ते आहेत. सर्वोत्तम दर्जाचे, उत्कृष्ट चवीचे सुके मेवे मिळावेत या ग्राहकांच्या मागणीबरोबरीनेच खाद्यपदार्थांचे पोषक पर्याय उपलब्ध व्हावेत ही त्यांची गरज देखील टाटा संपन्न पूर्ण करत आहे.

टाटा संपन्न ड्राय फ्रुट्सच्या प्रत्येक पॅकमधील नट्स व ड्राय फ्रुट्स सर्वोत्तम दर्जाचे असून खास तुमच्यासाठी अतिशय काळजीपूर्वक निवडले गेले आहेत. बहुस्तरीय पॅकेजिंगचा वापर करण्यात आल्यामुळे सुक्या मेव्यांचा स्वाद आणि दर्जा यांना जराही धक्का पोचत नाही. २०० ग्रॅम व ५०० ग्रॅम वजनाच्या पॅक्समध्ये संपूर्ण भारतभरात ई-कॉमर्स तसेच निवडक जनरल दुकानांमध्ये टाटा संपन्न ड्राय फ्रुट्स उपलब्ध आहेत.

पिस्ते, काजू व बदामांमध्ये प्रथिने, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांचे प्रमाण निसर्गतःच भरपूर असते. आपल्या शरीरातील हाडे निरोगी व मजबूत राखण्यासाठी हे घटक महत्त्वाचे असतात. तसेच त्यांमध्ये डाएटरी फायबरचे प्रमाण देखील भरपूर असते. हे सुके मेवे संतुलित आहाराचा एक प्रमुख भाग मानले गेले आहेत. टाटा संपन्न ड्राय फ्रुट्स रेन्जमध्ये खारवलेले व भाजलेले १००% प्रीमियम पिस्ते, कुरकुरीत, स्वादिष्ट व डिलक्स आकाराचे १००% प्युअर कॅलिफोर्निया अल्मन्डस (बदाम) व १००% प्युअर प्रीमियम कॅश्यु (काजू) आहेत. दर्जा व पोषण याबाबतीत पूर्णपणे निश्चिन्त राहून टाटा संपन्न ड्राय फ्रुट्सच्या उत्कृष्ट स्वादाचा आस्वाद घेता येईल. टाटा संपन्न १००% प्युअर प्रीमियम रेसिन्स (मनुका) चा देखील यामध्ये समावेश आहे. अतिशय काळजीपूर्वक निवडण्यात आलेले हे सर्व सुके मेवे सादर करून टाटा संपन्नने सतत सर्वोत्तम गुणवत्ता व पोषण प्रदान करण्याच्या वचनाच्या दिशेने पुढचे पाऊल उचलले आहे.-Ends.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "टाटा संपन्नचे ड्राय फ्रुट्स कॅटेगरी मध्ये पदार्पण; परिपूर्ण पोषण देणारे अन्नपदार्थ बाजारपेठेत उपलब्ध करवून देण्यासाठी टाटा संपन्न आग्रही"

Leave a comment

Your email address will not be published.


*