
Manoj Bajpai
‘फॅमिली मॅन’ मनोज बाजपेयी त्याचे आवडते देशी खाद्यपदार्थ तुमच्या स्क्रीनवर सादर करणार आहे
मुंबई, १४ जुलै २०२२ (GPN):- मनोज बाजपेयी, एक सुप्रसिद्ध भारतीय अभिनेता एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या नवीन प्रोजेक्टच्या सेटवरील काही चित्रे सुचवतात की हा पॉवर पॅक्ड परफॉर्मर आता होम शेफची टोपी घालणार आहे !
सर्वगुण संपन्न देशी भारतीय थाळीचा चाहता, ‘फॅमिली मॅन’ मनोज बाजपेयी त्याच्या आवडीचे देशी खाद्यपदार्थ तुमच्या स्क्रीनवर आणेल. खूप कमी लोकांना माहित आहे की मनोजला शूटिंग नसताना त्याच्या मुलांसाठी आणि प्रियजनांसाठी देशी जेवण बनवायला आवडते.
त्याच्या पात्रांची अतिशय काळजीपूर्वक निवड करणारा, मनोज पूर्ण पोषणासाठी चांगल्या दर्जाचे देशी खाद्यपदार्थ निवडण्याकडेही खूप लक्ष देतो.
मनोज बाजपेयी यांच्याकडून खास टिप्स मिळविण्यासाठी आणि त्यांच्या नवीन प्रोजेक्टमध्ये त्याची देशी जादू पाहण्यासाठी सज्ज व्हा.
Be the first to comment on "मनोज बाजपेयींच्या स्वयंपाक घरात काय शिजत आहे?"