टाटा मोटर्सची स्‍मार्ट पिक-अप इन्‍ट्राने गाठला १ लाख आनंदी ग्राहकांचा टप्‍पा

उच्‍च वैविध्‍यपूर्ण व टिकाऊ इन्‍ट्रा देते पॉवर-पॅक कार्यक्षमता, उच्‍च दर्जाच्या ड्रायव्हिंग व ग्राहक अनुभवाची खात्री

मुंबई, जुलै , २०२२ (GPN): टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने त्‍यांच्या स्‍मार्ट पिक-अप इन्‍ट्राच्‍या १ लाख आनंदी ग्राहकांचा टप्‍पा गाठला आहे. या भव्‍य यशासह इन्‍ट्रा मे २०१९ मध्ये लाँच केल्‍यापासून अवघ्‍या तीन वर्षांमध्‍येच ही उपलब्‍धी प्राप्‍त करणारी तिच्‍या विभागातील सर्वात जलद वेईकल बनली आहे. प्रिमिअम टफ डिझाइन तत्त्वावर निर्माण करण्‍यात आलेली इन्‍ट्रा उच्‍च सामान वाहून नेण्‍याची क्षमता व सर्वोच्‍च ड्रायव्हिंग क्षमतेचा शोध घेत असलेल्‍या ग्राहकांच्‍या गरजांची पूर्णपणे पूर्तता करण्‍यासाठी उत्‍पादित करण्‍यात आली आहे. मागील तीन वर्षांमध्‍ये इन्‍ट्रा तिचा उच्‍च दर्जाचा ड्रायव्हिंग आरामदायीपणा, फ्यूएल इकोनॉमी अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांमुळे तिच्‍या विभागामध्‍ये लोकप्रिय राहिली आहे आणि ही वेईकल सर्वोत्तम ग्राहक अनुभव देते. 

या उपलब्‍धीबाबत बोलताना टाटा मोटर्सचे प्रॉडक्‍ट लाइन – एससीव्‍ही अॅण्‍ड पीयूचे उपाध्‍यक्ष श्री. विनय पाठक म्‍हणाले, इन्‍ट्रासाठी १ लाख ग्राहकांचा हा उल्‍लेखनीय टप्‍पा गाठणे आमच्‍यासाठी अभिमानास्‍पद व आनंददायी क्षण आहे. इन्‍ट्राची प्रचंड लोक‍प्रियता तिच्‍या विभागातील गेम-चेंजिंग वेईकल म्‍हणून तिचे स्‍थान आणि ग्राहकांच्या आमच्‍या ब्रॅण्‍डवर असलेल्‍या अतूट विश्‍वासाला दाखवते. टाटा मोटर्सने नेहमीच आपल्‍या प्रयत्‍नांमध्‍ये ग्राहकांना प्राधान्‍य दिले आहे आणि टाटा इन्‍ट्रा यापेक्षा वेगळी नाही. ही वेईकल कमी कार्यसंचालन खर्चासह व्‍यवसायामधून अधिक परताव्‍यांप्रती ग्राहकांच्‍या महत्त्वाकांक्षा लक्षात घेऊन डिझाइन करण्‍यात आली आहे. आम्‍ही सर्व ग्राहकांचे मनापासून आभार मानतो, जे मागील तीन वर्षांपासून आमच्‍यासोबत या प्रवासाशी संलग्‍न राहिले आहेत.

Tata Motors Intra – Smart Pick Up Truck

शक्तिशाली व विश्‍वसनीय इंजिनची शक्‍ती आणि व्‍यापक सामान कक्ष असलेल्‍या टाटा इन्‍ट्रामध्‍ये तिच्‍या मालकांसाठी उच्‍च दर्जाची कार्यक्षता, जलद टर्न-अराऊंड वेळ आणि अधिक कमाईची क्षमता आहे. वेईकलमध्‍ये प्रवेश करण्‍यासाठी एैसपैस जागा आणि एर्गोनॉमिक आसन व्‍यवस्‍थेसह ही वेईकल आरामदायी, त्रास-मुक्‍त ड्रायव्हिंग अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे.

इन्‍ट्रा वैविध्‍यपूर्ण आहे, या वेईकलमध्‍ये हायड्रो-फॉर्म्ड प्रबळ चेसिस फ्रेम आणि उच्‍च ग्राऊण्‍ड क्‍लीअरन्‍स आहे, ज्‍यामुळे खडतर प्रदेशामध्‍ये देखील आरामदायी ड्रायव्हिंगची खात्री मिळते. कमी देखरेख आणि कार्यसचांलन खर्चांच्‍या खात्रीसाठी या वेईकलमध्‍ये गिअर शिफ्ट अ‍ॅडवायजर, तसेच इको स्विच आहे. इन्‍ट्रा सध्‍या विविध डे कन्फिग्‍युरेशन्‍ससह व्‍ही१० व व्‍ही३० या दोन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध आहे. 

वेईकलमधील उच्‍च स्‍तरीय वैशिष्‍ट्यांसह टाटा मोटर्स संपूर्ण सेवा २.० छत्रांतर्गत उद्योगातील सर्वोत्तम विक्री-पश्‍चात्त व मूल्‍यवर्धित सेवा देते. संपूर्ण सेवा २.० मध्‍ये वेईकल केअर प्रोग्राम्‍स, फ्लीट मॅनेजमेंट सोल्‍यूशन्‍स आणि वार्षिक मेन्‍टेनन्‍स पॅकेजस्, तसेच टाटा मोटर्सच्‍या व्‍यावसायिक वाहनांच्‍या संपूर्ण श्रेणीसाठी इतर लाभ अशा सेवांचा समावेश आहे.  

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "टाटा मोटर्सची स्‍मार्ट पिक-अप इन्‍ट्राने गाठला १ लाख आनंदी ग्राहकांचा टप्‍पा"

Leave a comment

Your email address will not be published.


*