९६ वर्षांच्या वयोवृद्ध आजीवर मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया, खाटेला खिळून असलेली वयोवृद्ध आजी ‘लॅमिनेक्टॉमी’ शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी सरळ उभी राहून चालू लागली

R-L: 96 yrs old Spine Surgery Patient with Dr. Sunil Kutty, Consultant-Brain and Spine Surgeon, Apollo Hospital, Navi Mumbai

Apollo Hospitals Logo

नवी मुंबई, २० जून २०२२ (GPN): अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई या एका आघाडीच्या टर्शरी केयर हॉस्पिटलमध्ये एका ९६ वर्षांच्या (पक्षाघात) पॅरलाईज्ड महिला रुग्णावर लॅमिनेक्टोमी आणि मणक्याला संकुचित करणारी गुठळी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या सर्वात वयोवृद्ध व्यक्तींमध्ये आता याही महिलेचा समावेश झाला आहे. अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबईच्या डॉक्टरांची टीम तब्बल दोन तास ही प्रक्रिया करत होती. शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी ही वयोवृद्ध रुग्ण सरळ उभी राहू शकली. लॅमिनेक्टॉमी ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये स्पायनल कॅनलवर असलेला कशेरुकी लॅमिना (मणक्याचा मागील भाग) काढून जागा तयार केली जाते. यामुळे मणक्यांमध्ये व त्याच्या आसपासच्या संरचनेमध्ये प्रवेश करता येतो. या केसमध्ये आम्ही मणक्याला संकुचित करणारी गुठळी काढून टाकली.

Dr. Sunil Kutty, Consultant-Brain and Spine Surgeon, Apollo Hospital, Navi Mumbai – File Photo GPN

डॉ सुनील कुट्टी, कन्सल्टन्ट-ब्रेन अँड स्पाईन सर्जन, अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई म्हणाले, “इतके वयोवृद्ध रुग्ण शस्त्रक्रिया करवून घेण्यास राजी होणे ही खूपच दुर्मिळ बाब आहे. बहुतेक वेळा लोकांना मणक्याच्या शस्त्रक्रियांची भीती वाटते आणि त्यामुळे त्यांना कायमचे खाटेला खिळून राहावे लागेल अशी समजूत असते. इथे आमच्याकडे ९६ वर्षांची वृद्धा स्ट्रेचरवर आली आणि शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी ती उभी राहिली, खाटेवरून उठून चालू लागली. वय आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया या दोन्हींविषयी लोकांच्या सर्व गैरसमजांना त्यांनी खोडून काढले. न्यूरोसर्जन्स व ऍनेस्थेटिस्टसच्या आमच्या टीमला सर्जरीमध्ये मिळालेल्या यशामध्ये ही रुग्ण आणि तिच्या नातेवाईकांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि रुग्णाच्या वयाचा काहीही अडथळा न येणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या.” उरणला राहणाऱ्या ९६ वर्षांच्या वृद्धेला अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये आणण्यात आले तेव्हा त्यांना दहा दिवसांपासून दोन्ही पायांमध्ये कमजोरी जाणवत होती. त्यामुळे त्यांना चालता येत नव्हते व दररोजची कामे देखील करणे शक्य होत नव्हते. त्यांची पाठ खूप दुखत होती आणि हे दुखणे डाव्या पायापर्यंत गेले होते. त्यांच्या मणक्याचा एमआरआय केला गेला ज्यामध्ये आढळून आले की एल१ व एल२ मणके गंभीर प्रमाणात संकुचन पावले होते. कोडल नर्व्ह रूट आपल्या जागेवरून हलले होते (मणक्यातून खाली जाऊन शरीराच्या इतर अवयवांना जोडणारे नर्व्ह रूट्स). अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईच्या न्यूरो टीमने एकत्र मिळून या अतिशय वयोवृद्ध रुग्ण महिलेवर मणक्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. डॉ रवी शंकर, जॉईंट मेडिकल डायरेक्टर, अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई म्हणाले, “गरजू रुग्णांसाठी मणक्याची शस्त्रक्रिया सुरक्षित व प्रभावी आहे. व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून बहुतांश रुग्ण पाठीच्या दुखण्यातून बरे होतात पण या प्रकरणात वय हा एक गंभीर घटक होता आणि पॅरलाईज्ड रुग्णावर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव व्यवहार्य पर्याय उरला होता. वयोवृद्ध रुग्णांमध्ये देखील जर आवश्यक असेल तर मणक्याची शस्त्रक्रिया हा लक्षणीय इलाज ठरू शकतो, ज्यामुळे त्यांच्या जीवन गुणवत्तेमध्ये सुधारणा होऊ शकते. आम्हाला आनंद आणि समाधान वाटते की, आमच्या न्यूरोसर्जिकल टीमने सर्वतोपरी प्रयत्न करून ही केस यशस्वी केली.”Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "९६ वर्षांच्या वयोवृद्ध आजीवर मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया, खाटेला खिळून असलेली वयोवृद्ध आजी ‘लॅमिनेक्टॉमी’ शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी सरळ उभी राहून चालू लागली"

Leave a comment

Your email address will not be published.


*