
AU Small Finance Bank Limited (AU Bank)
- सिग्नेचर डेबिट कार्ड खर्चांवर जवळपास १ टक्के कॅशबॅक, कॉम्प्लीमेण्टरी मूव्ही तिकिट, एअरपोर्ट लाऊंज उपलब्धता आणि आकर्षक वेलकम बेनीफिट्स यांसारखे लाभ कौटुंबिक सदस्यांना देखील मिळणार
- सध्या एचएनआय व एनआरआय ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करणारा संपन्न बँकिंग प्रोग्राम ‘एयू रोयाल’चा विस्तार
मुंबई, 24 मे २०२२ (GPN): एयू स्मॉल फायनान्स बँक या भारतातील सर्वात मोठ्या स्मॉल फायनान्स बँक व झपाट्याने विकसित होणा-या रिटेल बँकेने त्यांचा संपन्न बँकिंग प्रोग्राम एयू रोयालअंतर्गत दोन नवीन उत्पादने – ‘एयू रोयाल सॅलरी’ आणि ‘एयू रोयाल बिझनेस’ करंट अकाऊंट लाँच केले आहेत.
भारतातील श्रीमंत विभाग झपाट्याने विकसित होत आहे. हुरून इंडिया वेल्थ रिपोर्ट २०२१ च्या मते, पुढील पाच वर्षांमध्ये भारतीय करोडपती (यूएसडी) कुटुंबांची संख्या ३० टक्क्यांनी वाढणार आहे. या विभागामध्ये स्थिर वाढ होत असताना बँकिंगसंदर्भात त्यांच्या अपेक्षा सर्वसमावेशक बनल्या आहेत. ही बाब लक्षात घेता एयू बँकेने या विभागाच्या दैनंदिन बँकिंग गरजांची पूर्तता करण्यासाठी विशेषरित्या डिझाइन केलेला त्यांचा रोयाल प्रोग्राम लाँच केला होता. बँक अगोदरपासून एचएनआय व एनआरआयना सानुकूल प्रिमिअम उत्पादने देत होती आणि आता विशेषत: पगारदार व व्यवसाय विभागांसाठी विशेषरित्या डिझाइन केलेली सर्वोत्तम उत्पादने अनक्रमे ‘एयू रोयाल सॅलरी’ व ‘एयू रोयाल बिझनेस’ लाँच केले आहेत.
या लाँचबाबत बोलताना एयू स्मॉल फायनान्स बँकेचे कार्यकारी संचालक श्री. उत्तम तिब्रेवाल म्हणाले, ”वर्षानुवर्षे आम्हाला आमच्या वैयक्तिकृत सेवा व उच्च परताव्यांप्रती सधन विभागाकडून वाढती रूची दिसण्यात आली आहे. आम्ही स्वयं-रोजगारित व्यवसाय विभागासाठी पसंतीची बँक राहिलो असलो तरी मेट्रो व प्रथम श्रेणीच्या शहरांमध्ये आमची उपस्थिती वाढत असल्यामुळे पगारदार विभागातील ग्राहकांची संख्या स्थिर गतीने वाढण्यास सुरूवात झाली आहे. आम्ही बॅकिंग क्षेत्रामध्ये आमच्या अनेक सेवा धोरणात्मकरित्या विस्तारित केल्या आहेत.’एयू रोयाल सॅलरी’ व ‘एयू रोयाल बिझनेस’सह आम्ही श्रीमंत ग्राहकांच्या विभिन्न विभागांसाठी आमच्या दर्जात्मक उपाययोजना विस्तारित करत आहोत. बँकिंगमध्ये बदलाव आणण्याप्रती आमच्या कटिबद्धतेशी संलग्न राहत आम्ही आमच्या तत्त्वामध्ये वाढ करण्यासोबत आमच्या ग्राहकांना अद्वितीय मूल्य देत राहू.”
एयू रोयाल बिझनेस करंट अकाऊंट फॅमिली बँकिंग देतो, ज्यामधून व्यवसाय व कौटुंबिक खात्यांचा समूह करता येतो. संबंध व्यवस्थापक एण्ड-टू-एण्ड वैयक्तिकृत बँकिंग देतात, ग्राहक रिच रोयाल बिझनेस सिग्नेचर डेबिट कार्ड या वैशिष्ट्याच्या माध्यमातून देण्यात येणा-या अनेक लाभांचा आनंद घेऊ शकतात. इतर लाभ आहेत दर्जात्मक मर्चंट सोल्यूशन्स (क्यूआर, पीओएस, पेमेंट गेटवे), बँकिंग उत्पादनांवर पसंतीनुसार किंमत, खाते क्रमांक निवडण्याची मुभा आणि देशांतर्गत विमानतळ लाऊंज उपलब्धता.
एयू रोयाल सॅलरी बचत खाते जवळपास पाच सदस्यांना फॅमिली बँकिंग सुविधा आणि सिग्नेचर डेबिट कार्ड खर्चांवर जवळपास १ टक्के उत्साहवर्धक कॅशबॅक देते. समर्पित संबंध व्यवस्थापक सर्व बँकिंग गरजांमध्ये साह्य करतात, ग्राहक इतर अनेक लाभांचा आनंद घेऊ शकतात जसे बुकमायशोवर कॉम्प्लीमेण्टरी मूव्ही तिकिटे, आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर कमी चलन मार्क-अप आणि लॉकर्सवर ७५ टक्के सूट.
एयू रोयाल प्रोग्राममध्ये नोंदणी करण्याची इच्छा असलेले ग्राहक www.aubank.in या वेबसाइटला किंवा एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या जवळच्या शाखेला भेट देऊ शकतात.
Be the first to comment on "एयू बँकेकडून पगारदार व व्यवसाय विभागांना टॉप-ऑफ-द-लाइन एयू रोयाल प्रोग्रामची सुविधा"