“आज़ादी का अमृतमहोत्सव वर्षानिमित्त स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर इतिहास” ‘मुंबई पोर्ट अथॉरिटी’ तर्फे भव्य छायचित्र प्रदर्शन मेळावा चे श्री.सर्बानंद सोनोवाल यांचे हस्ते १५ मे २०२२ रोजी उद्घाटन

बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री आणि आयुष मंत्री सन्माननीय श्री.सर्बानंद सोनोवाल यांचे हस्ते १५ मे २०२२ रोजी उद्घाटन करण्यात आले. 

मुंबई  १५ मे २०२२ (GPN)– १५० वर्षे पूर्ण करण्यासाठी सज्ज असलेले ‘मुंबई पोर्ट अथॉरिटी’ हे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी  वर्षानिमित्त प्रगती व कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास सादर करण्याचा उपक्रम राबवत आहे. ‘मुंबई पोर्ट अथॉरिटी’ तर्फे ‘गेटवे टू हिस्ट्री’ नावाचे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले  आहे. १५ मे २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री आणि आयुष मंत्री सन्माननीय श्री. सर्बानंद सोनोवाल यांचे हस्ते गेटवे ऑफ इंडिया येथे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की आज हिंदुस्तान ‘आजादी का अमृतमहोस्तव’ निष्ठापूर्वक साजरा करत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी देशात वेग-वेगळे मंत्रालये व संस्था प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे मुंबई पोर्ट पूर्वी “ट्रस्ट” होते आता “अथॉरिटी” झाली आहे. १८७२ ते २६ जून २०२२ ला १५० वर्षे पूर्ण होत आहेत आणि ह्याचा इतिहास छायाचित्र रुपात जनतेला सादर  करत आहेत, ज्याचे मी उद्घाटन केले. या ७ दिवसाच्या छायाचित्र प्रदर्शनाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे. ‘मुंबई पोर्ट अथॉरिटी’चे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी १५० वर्षांचा इतिहास जनतेसमोर सादर करून ‘आज़ादी का अमृतमहोत्सव’ एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा अप्रतिम प्रयत्न केला आहे.

‘मुंबई पोर्ट अथॉरिटी’ भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला अधिक गती देण्यासाठी बंदराचे अमूल्य योगदान प्रदर्शित करत आहे. या प्रदर्शनात स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील दुर्मिळ अप्रकाशित छायाचित्रांची निवड केली आहे. क्युआर कोड व कॅप्शन दिलेले आहेत. व्यापार आणि वाणिज्य याद्वारे मुंबईचा विकास, प्रगती, बदलत्या रहदारीचे स्वरूप, भौतिक अडथळे शेजारील बंदरांवरील स्पर्धा यांमुळे मुंबई बंदराने अनेक बदल आणि आव्हानांना तोंड दिले आहे. मुंबई बंदराने सर्वांगीण सुविधांसह एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे जी ईस्टर्न वॉटरफ्रंटचा कायापालट करेल आणि मुंबईला जागतिक दर्जाच्या शहरामध्ये बदलण्यासाठी चालना देईल. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना भविष्यातील योजना आणि ब्लू-प्रिंट्स पाहण्याची संधी मिळणार आहे. 

लोकांना त्यांच्याकडील बंदर आणि तेथील सुविधांची जुनी छायाचित्रे शेअर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, एक स्पर्धा आयोजित केली जात आहे. छायाचित्रे [email protected] वर पाठवून स्पर्धक सहभागी होऊ शकतात; आणि प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी २२ मे रोजी, उत्कृष्ट छायाचित्राला रु.१०,०००/- रोख पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेतील सर्व सहभागींना प्रमाणपत्र देखील दिले जाईल.ह्या प्रदर्शनात ‘मुंबई पोर्ट अथॉरिटी’ची १७ चित्रे (पेंटिंग) व ४६ छायाचित्रे (फोटो) लावण्यात आलेले आहेत. हे प्रदर्शन १४ मे ते २० मे २०२२ दरम्यान सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत सर्वांसाठी नि:शुल्क खुले राहणार आहे.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "“आज़ादी का अमृतमहोत्सव वर्षानिमित्त स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर इतिहास” ‘मुंबई पोर्ट अथॉरिटी’ तर्फे भव्य छायचित्र प्रदर्शन मेळावा चे श्री.सर्बानंद सोनोवाल यांचे हस्ते १५ मे २०२२ रोजी उद्घाटन"

Leave a comment

Your email address will not be published.


*