
R to L: Mr. Narayanan Suresh Krishnan, Managing Director, Paradeep Phosphates Ltd. and Mr. Sabaleel Nandy, President & Chief Operating Officer, Paradeep Phosphates Ltd. at the IPO press conference.

L to R: Mr. Ashwani Khare (Executive Vice President, ICICI Securities Ltd.), Mr. Vivek Toshniwal (Executive Director & Co-Head, ECM, Axis Capital Ltd.), Mr. Narayanan Suresh Krishnan (Managing Director, Paradeep Phosphates Ltd.), Mr. Sabaleel Nandy (President & Chief Operating Officer, Paradeep Phosphates Ltd.), Mr. Atul Mehra (Joint Managing Director, JM Financial Ltd.) and Mr. Ratnadeep Acharyya (SVP, SBI Capital Markets Ltd.).
प्राईस बँड प्रति समभाग ३९ रुपये ते ४२ रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला असून दर्शनी मूल्य प्रति समभाग १० रुपये आहे.
- आयपीओ १७ मे २०२२ ते १९ मे २०२२ पर्यंत खुला राहील.
- कमीत कमी ३५० समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त बोली लावायची असल्यास ३५० च्या पटीत बोली लावता येईल.

PARADEEP PHOSPHATES LIMITED LOGO
मुंबई, १२ मे २०२२ (GPN): पारादीप फॉस्पेट्स लिमिटेडचा (“कंपनी”) आयपीओ (“ऑफर”) १७ मे २०२२ रोजी खुला होणार आहे. त्याच्या एक दिवस (कामकाजाचा दिवस) म्हणजे १३ मे २०२२ रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी ऑफर खुली होईल.
ऑफरचा प्राईस बँड प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक समभागासाठी ३९ रुपये ते ४२ रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी ३५० समभागांसाठी आणि त्यापुढे ३५० च्या पटीत बोली लावता येतील.
या ऑफरमध्ये (१) नव्याने जारी करण्यात येत असलेले, प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेले एकूण १०,०४० मिलियन रुपयांचे इक्विटी समभाग (“फ्रेश इश्यू”) आणि (२) समभाग विक्रीस प्रस्तुत करणारे प्रमोटर समभागधारक व जीओआय विक्री करणारे समभागधारक यांच्याकडून विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात येत असलेले ११,८५,०७,४९३ इक्विटी समभाग यांचा समावेश आहे.
“फ्रेश इश्यू” मधून जी रक्कम उभारली जाईल तिचा उपयोग (१) गोवा फॅसिलिटीच्या अधिग्रहणासाठी लागणार असलेल्या रकमेपैकी काही भाग; (२) काही कर्जांची परतफेड/मुदतीआधी परतफेड आणि (३) सर्वसाधारण कॉर्पोरेट कामे यांच्यासाठी केला जाईल.
विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आलेल्या समभागांमध्ये झुआरी मॅरॉक फॉस्पेट्स प्रायव्हेट लिमिटेडचे ६०,१८,४९३ पर्यंत इक्विटी समभाग आणि भारत सरकारच्या रसायने व खते मंत्रालयामार्फत भारताच्या राष्ट्रपतींकडून १,१२४,८९,००० पर्यंत इक्विटी समभाग यांचा समावेश आहे. (“समभाग विक्रीस प्रस्तुत करणारे प्रमोटर समभागधारक व जीओआय विक्री करणारे समभागधारक”)
या ऑफरमध्ये प्रस्तुत केले जात असलेले इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”) (दोन्ही मिळून “शेअर बाजार”) मध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.
या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे आहेत.
Be the first to comment on "पारादीप फॉस्पेट्स लिमिटेडचा आयपीओ १७ मे २०२२ रोजी खुला होणार"