कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने तिसरी दा विंची रोबोटिक सर्जिकल सिस्टिम सुरु केली – भारतातील एकमेव रुग्णालय जिथे तीन दा विंची रोबोट्स आहेत

~ वेगवेगळ्या स्पेशालिटीजमध्ये आजवर ४५०० पेक्षा जास्त रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत ~

~ देशातील पहिले रुग्णालय जिथे युरो-ऑन्कोलॉजीमध्ये २६०० पेक्षा जास्त रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत ~

मे 10, 2022, मुंबई (GPN): कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईने आपली तिसरी दा विंची रोबोटिक सर्जिकल सिस्टिम सुरु करण्याची घोषणा केली आहे, हे देशातील पहिले आणि एकमेव असे रुग्णालय बनले आहे जिथे तीन दा विंची रोबोट्स आहेत. त्याबरोबरीनेच हे देशातील पहिल्या काही रुग्णालयांपैकी आहे ज्यांनी जून २०१२ मध्ये दा विंची रोबोटिक सिस्टिमसह रोबोटिक शाश्त्रक्रिया सुरु केल्या आणि आजवर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईमध्ये रोबोटच्या मदतीने वेगवेगळ्या स्पेशालिटीजमध्ये ४५०० पेक्षा जास्त शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत, यामध्ये मोठ्यांसाठी तसेच मुलांसाठी युरोलॉजी, स्त्री रोग, नाक, कान व घसा आणि बेरिएट्रिक शस्त्रक्रियेसहित युरो-ऑन्कोलॉजी, महिलांना होणारे कॅन्सर, डोके व मानेचे कॅन्सर, फुफ्फुसे व अन्नव्यवस्थेतील व कोलोरेक्टल कॅन्सर यांच्यावरील उपचारांसाठी केल्या जाणाऱ्या कॅन्सर शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

भारतात आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणण्यात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल (केडीएएच) नेहमीच आघाडीवर असते आणि तिसरी आधुनिक दा विंची रोबोटिक सर्जिकल सिस्टिम सुरु करून रोबोटिक मिनिमल इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रियेतील अग्रणी म्हणून या रुग्णालयाने आपले स्थान अधिक जास्त मजबूत केले आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल देशातील पहिले असे रुग्णालय आहे ज्यांनी प्रोस्टेट, किडनी आणि मूत्राशयाच्या कॅन्सरच्या रुग्णांवरील उपचारांसाठी २६०० पेक्षा जास्त रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्ण करण्याचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. रोबोटिक शस्त्रक्रियांसाठी खास प्रशिक्षण घेतलेल्या विशेषज्ञांसह कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने पारंपरिक ओपन सर्जरीच्या मर्यादा ओलांडून आणि दा विंची रोबोटिक सर्जिकल प्लॅटफॉर्मचा वापर करून पारंपरिक लॅप्रोस्कोपिक पद्धतींमधील कमतरता दूर करत, रुग्ण आणि सर्जन्ससाठी मिनिमल इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रियेची नवी क्षितिजे निर्माण केली आहेत.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये रोबोटिक सर्जरीचे हेड आणि युरो-ऑन्कोलॉजीचे कन्सल्टन्ट डॉ टी.बी युवराजा यांनी सांगितले, “पारंपरिक ओपन सर्जरीच्या तुलनेत कितीतरी जास्त लाभ प्रदान करणारी रोबोटिक शस्त्रक्रिया सर्जिकल क्षेत्रात एका नव्या युगाचे प्रातिनिधीत्व करत आहे. यामुळे कठीण अशी युरोलॉजिकल शस्त्रक्रिया रुग्णांसाठी सोपी आणि सुरक्षित बनली आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये अधिक अचूक शस्त्रक्रिया, रक्त वाहून जाण्याचे प्रमाण कमी त्यामुळे बाहेरून रक्त द्यावे लागण्याचे प्रमाण देखील कमी, संसर्गाचा धोका कमी, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची तब्येत सुधारण्यासाठी लागणारे दिवस कमी आणि रुग्णालयात राहावे लागण्याचे दिवस देखील कमी असे अनेक लाभ रुग्णांना मिळतात. रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये प्रदीर्घ आणि सखोल अनुभवाच्या बळावर आम्ही अशा रुग्णांवर देखील उपचार करू शकतो ज्यांच्यासाठी पारंपरिक शस्त्रक्रिया हा योग्य पर्याय ठरू शकत नाही. त्याबरोबरीनेच शरीरातील अतिशय लहान जागी देखील खूपच अचूक शस्त्रक्रिया करण्यात आम्हाला सक्षम बनवण्यात रोबोटिक शस्त्रक्रियेचे मोलाचे योगदान आहे. आम्हाला अभिमान वाटतो की, आमच्या अभिनव कामांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नल्समध्ये स्वीकारले व प्रकाशित केले गेले आहे.”

आज मिनिमल इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रियेमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेला पसंती दिली जाते आणि अनेक क्षेत्रांमध्ये पारंपरिक लॅप्रोस्कोपिक व ओपन सर्जरीच्या ऐवजी रोबोटिक शस्त्रक्रिया केली जाते. वेगवेगळ्या कारणांमुळे ज्या रुग्णांवर ओपन सर्जरी केली जाऊ शकत नाही अशांसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया खूपच फायदेशीर ठरली आहे, तसेच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी सर्वसामान्यतः याच तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

रोबोटिक शस्त्रक्रिया स्वयंचलित (ऑटोमेटेड) सर्जिकल प्रणाली नाही तर मानव सर्जन दुरून ही शस्त्रक्रिया नियंत्रित करतात. शस्त्रक्रियेवर संपूर्ण वेळ सर्जनचे नियंत्रण असते, त्यामुळे ही शस्त्रक्रिया खूपच सुरक्षित आहे. मिनिमल इन्व्हेसिव्ह दृष्टिकोन अवलंबून रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये शरीरावर अगदी छोट्या चिरा केल्या जातात, या उलट पारंपरिक ओपन सर्जरीमध्ये मोठ्या आकाराच्या चिरा कराव्या लागतात. हातात पकडून वापरल्या जाणाऱ्या उपकरणांच्या तुलनेत दा विंची रोबोटिक प्रणाली अतिशय अचूकतेने काम करते, शरीरातील ज्या भागांपर्यंत पोचणे कठीण असते अशा भागांच्या शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक प्रणाली लाभकारी ठरते. यामध्ये एक संगणक सर्जनचे हात आणि सर्जिकल उपकरणे यांच्या दरम्यान एक डिजिटल इंटरफेस प्रदान करतो. व्यापक हाय-डेफिनिशन थ्री-डायमेन्शनल इमेजसह अधिक चांगले व्हिज्युअलायझेशन प्रदान करून ही प्रणाली सर्जनचे हात आणि मनगट यांची लवचिकता वाढवते आणि त्यामुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्म व अचूक हालचाली करणे शक्य होते.

डॉ टी.बी युवराजा यांनी पुढे सांगितले, “आम्हाला हे माहिती आहे की, रोबोटिक शस्त्रक्रियेतून मिळणारे परिणाम सर्जनच्या कौशल्यावर अवलंबून असतात आणि म्हणून आम्ही रोबोटिक शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण आमच्या सर्जन्सना देण्यावर देखील लक्ष केंद्रित केले आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये आम्ही एक फेलोशिप प्रोग्राम चालवतो आणि दरवर्षी दोन युरोलॉजिकल सर्जन्सना रोबोटिक सर्जरी व दा विंची सिस्टिम रोबोटिक सर्जिकल प्लॅटफॉर्मचा उपयोग करण्याचे प्रशिक्षण देत आहोत.”

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संतोष शेट्टी म्हणाले, “सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रुग्णांची मदत करण्यात रोबोटिक शस्त्रक्रिया किती जास्त क्षमतेने काम करू शकते ते आम्ही ओळखले आणि आधुनिक दा विंची रोबोटिक सिस्टिम आणणाऱ्या काही पहिल्या रुग्णालयांमध्ये आम्ही होतो. आमच्या सर्जन्सना आधुनिक रोबोटिक तंत्रांचा उपयोग करून विविध स्थितींचे निदान व त्यावरील उपचारांचे प्रशिक्षण देण्यावर आम्ही सातत्याने भर देत आलो आहोत. आम्हाला आनंद वाटतो की आमच्या या दूरदर्शी धोरणामुळे हजारो रुग्णांना रोबोटिक सर्जरीचे लाभ मिळाले आहेत. पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत रोबोटिक शस्त्रक्रियेच्या खर्चात कमी प्रमाणात फरक असून ही शस्त्रक्रिया आपल्या किमतीचे पुरेपूर मूल्य मिळवून देते. हे रोबोटिक शस्त्रक्रियांच्या वाढत्या संख्येचे एक प्रमुख कारण आहे. आरोग्य विम्यामध्ये देखील रोबोटिक शस्त्रक्रियेचे फायदे ओळखले गेले आहेत आणि आता त्यामध्ये देखील या शस्त्रक्रियांना कव्हर केले जाते, जे रुग्णांसाठी एक वरदान आहे.”

दा विंची रोबोटिक सर्जिकल सिस्टिम नवीन सर्जिकल व रोबोटिक तंत्रज्ञानाचे प्रतिनिधित्व करते. १५व्या शतकातील संशोधक, शोधक आणि चित्रकार, ज्यांनी पहिला रोबोट तयार केला होता त्या लिओनार्दो दा विंची यांच्या नावावरून या प्रणालीचे नाव दा विंची ठेवण्यात आले. दा विंची ही प्रणाली नासा आणि स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटने आघाडीच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून विकसित केली होती आणि २००० साली यूएस एफडीएने या प्रणालीचा उपयोग शस्त्रक्रियांसाठी करण्याला मंजुरी दिली. तंत्रज्ञानदृष्ट्या आधुनिक आणि अनेक सुधारणा करून सिद्ध करण्यात आलेल्या दा विंची सर्जिकल सिस्टिममध्ये एक थ्री-डायमेन्शनल लेन्स सिस्टिम कॅमेरा असतो जो सर्जन्सना दृश्यामध्ये सुधारणा करून आणि अगदी लहान तंत्रे करता यावीत यासाठी शस्त्रक्रियेची जागा १० ते १५ पटींनी मोठी करून दाखवतो. आज ६७ देशांमध्ये ६५०० पेक्षा जास्त दा विंची सर्जिकल सिस्टिम्स बसवण्यात आल्या आहेत आणि जगभरात ५५००० पेक्षा जास्त सर्जन्सनी दा विंची प्रणालीच्या उपयोगाचे प्रशिक्षण घेतले आहे. जगभरात दा विंची सिस्टिमसह १०० लाखांहून जास्त प्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने तिसरी दा विंची रोबोटिक सर्जिकल सिस्टिम सुरु केली – भारतातील एकमेव रुग्णालय जिथे तीन दा विंची रोबोट्स आहेत"

Leave a comment

Your email address will not be published.


*