
Mr Balfour Manuel, Managing Director, Blue Dart
मुंबई, 7 मे, 2022 (GPN):- दक्षिण आशियातील आघाडीची एक्स्प्रेस एअर आणि इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट आणि वितरण कंपनी ब्लू डार्ट एक्सप्रेस लिमिटेडने 31 मार्च 2022रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीचे लेखापरीक्षित आर्थिक निकाल मुंबई येथे झालेल्या बोर्ड बैठकीत जाहीर केला आहे.
31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने करा नंतर ₹1,354 दशलक्ष (मागील वर्षी ते ₹891 दशलक्ष) नफा नोंदविला आणि 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या वर्षासाठी करा नंतर ₹3,764 दशलक्ष (मागील वर्षी ते ₹963 दशलक्ष होते) नोंदवले गेले. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत ऑपरेशन्समधून महसूल ₹ 11,659 दशलक्ष आणि 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या वर्षासाठी ₹ 44,090 दशलक्ष इतका होता.
कंपनीने अलीकडच्या काळात सर्वात मजबूत कामगिरी दिली आहे. आव्हानात्मक भू–राजकीय परिस्थिती असूनही, व्हॉल्यूम वाढ आणि चांगल्या प्राप्ती यांच्यातील उत्कृष्ट समन्वयामुळे टॉपलाइन 21% ने वाढली. तिमाहीसाठी इबिटडा(EBITDA) ₹2,264 दशलक्ष आहे, मागील वर्षाच्या तुलनेत 25.7% ची वाढ. इबिटडा मार्जिन देखील मागील वर्षातील 18.6% च्या तुलनेत 19.4% वर सुधारला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षातील महसूल ₹44,090 दशलक्ष इतका होता, जो मागील वर्षाच्या तुलनेत 34% नी वाढला आहे. संपूर्ण वर्षाचा इबिटडा ₹6,963 दशलक्ष इतका होता, जो मागील वर्षाच्या तुलनेत 92% ची वाढ आहे. मागील वर्षीच्या ₹963 दशलक्षच्या तुलनेत PAT ₹3,764 दशलक्ष इतका होता. गेल्या वर्षी महामारीच्या काळात सुरू करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चार्टर्सने चालू आर्थिक वर्षातही कंपनीचा महसूल वाढवला.
ब्लू डार्टचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बॅलफर मॅन्युएल म्हणाले, “संपूर्ण वर्षभर आम्ही आमच्या सर्व भागधारकांसाठी अपवादात्मक लवचिकता, उत्तरदायित्व आणि विश्वासार्हता प्रदर्शित केली आहे, जी आमच्या चौथ्या तिमाहीत आणि वर्षअखेरीच्या आर्थिक कामगिरीमध्ये दिसून येते. ग्राहक–प्रथम, तंत्रज्ञान क्षमतांवर आमचे लक्ष केंद्रित आहे. कंपनी आणि वीयूसीए वातावरणातील परिणामी गतीने कंपनीला मार्जिन सुधारण्यास मदत झाली.आर्थिक वर्ष 2021-22 हे वर्ष फलदायी ठरले आहे. ब्लू डार्टने सर्व पॅरामीटर्समध्ये ‘कनेक्टिंग पीपल, इम्प्रूव्हिंग लाईव्ह‘ या आमच्या व्हिजनला पुन्हा एकदा मूर्त रूप दिले आहे. आम्हाला एक शीर्ष नियोक्ता, काम करण्यासाठी उत्तम ठिकाण तसेच महिलांसाठी सर्वोत्कृष्ट कार्यस्थळ म्हणून ओळखले गेले आहे. आम्ही आमच्या ग्राहकांच्या लॉजिस्टिकशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी ठाम आहोत. कोविड–केअर हॉस्पिटल्समध्ये शिपमेंट पाठवण्यापासून ते नाविन्यपूर्णतेला नवीन उंचीवर नेण्यापर्यंत, आम्ही देशासाठी व्यापार सुविधा देणारे आमचे कर्तव्य पार पाडण्यात कोणतीही कसर सोडली नाही.”
======================
Be the first to comment on "ब्लू डार्ट Q4 आणि वर्षअखेरीच्या निकालांसह विक्रमी कामगिरी नोंदवली कंपनीने 2021-22 या वर्षासाठी ₹ 44,090 दशलक्ष विक्री आणि ₹ 3,764 दशलक्ष नफा कर नंतर नोंदवला"