Mumbai, 3rd May 2022 (GPN): सध्या संपूर्ण देशात “भोंगा” या विषयावर चर्चा सुरु आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त “भोंगा” या चित्रपटाने प्रदर्शनापूरवीच चांगली प्रसिद्धी मिळविलेली आहे. अक्षयतृतीयाच्या आणि ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे हा चित्रपट. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मस्जिदिचे भोंगे उतरवण्या बद्द्ल भाष्य केले होते. त्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण प्राप्त झाले. मुस्लिम लोकांकडून या निर्णयाला मोठा विरोध झाला. शिवाय विरोधी पक्षांकडूनही चिकलफेख करण्यात आली. अशातच ‘भोंगा’ या चित्रपटाचे पोस्टर आले आणि हे प्रकरण अधिकच रंगले. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आउट झाला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे.
या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी केले असून, प्रस्तुती अमेय खोपकर, संदीप देशपांडे आणि अमोल कागणे करत आहेत.ध्वनी प्रदूषण कमी करण्यावर या चित्रपटात जोर दिला असून या पाश्र्वभूमीवर हा भोंगा चित्रपट चित्रीत करण्यात आला आहे. धर्मापेक्षा मोठ कोणी नाही मग कोणाच्या जीवाला धोखा असेल तरी चालेल. या वृत्तीला दडपून टाकण्यासाठी गावकर्यांचे प्रयत्न या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.
भोंगा या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारी दीप्ती धोत्रे म्हणते ,कुठला हि धर्म वाईट नाही, धर्माचे आचरण म्हणजेच एक उत्तम समाज बांधणी . काळाच्या ओघात ह्या रूढी-परंपरा मध्ये अनेक परंपरा वाढल्या अथवा वाढवल्या गेल्या आहेत. आणि ह्या अनावश्यक परंपरा त्रासदायक असतील तर त्या बदलल्या तर काय होईल?
ह्या चित्रपटामध्ये शिवाजी सरांनी भोंगा हा विषय घेऊन खरंतर ह्या किंवा अशा प्रकार च्या समाजातील प्रवृत्तीवर प्रकाश टाकण्याचा अत्यंत मोलाचा असा सामाजिक प्रयत्न केला आहे.खरंतर भोंगा हे फक्त अशा अनावश्यक परंपरेचे प्रतीक आहे.असे मला वाटते.पण आपण सगळ्यांनीच हा चित्रपट बघून भोंगा किंवा अशा अनेक प्रकार च्या अनावश्यक परंपरा टाळुन एक उत्तम समाज निर्माण करण्याचा विचार करावा ह्या चित्रपटातून हा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
अभिनेत्री दीप्ती धोत्रे या चित्रपटात रुक्साना नावाची मुस्लिम कॅरेक्टर प्ले करत आहे. रुक्साना काही कारणास्तव घर बदलून ती आणि तीचा परिवार एका घरात राहायला येतात ज्या घराजवळ मस्जिद आहे… रुक्सानाच्या लहान बाळाला एक आजार आहे, ज्यामधे रुक्साना सतत त्याच्याकडे लक्ष देण्याचा आपलं बाळ लवकर बरे होण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत असते, पण अगदी घराजवळ मस्जिद, त्यामधे ५ वेळा होणारा नमाज, त्या भोंग्यावरून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना यामुळे बाळाला होणारा त्रास, आणि त्यामुळे वाढत जाणारा त्याचा आजार आणि त्याच्या आजारपणामुळे त्याला आवश्यक असणारी झोप, हयासाठीच होणारा संघर्ष म्हणजेच भोंगा, परंतु “अजान” हे धार्मिक कार्य आहे आणि ते बंद होणार नाही, हा “भोंगा” बंद होणार नाही असे म्हणणारे आणि चिमुकल्या बाळासाठी त्याने बरे व्हावे असा प्रयत्न करणारे, एकंदरीतच गावामधे संघर्ष आणि संघर्षाचे कारण “भोंगा”.चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील (shivaji lotan patil) यांनी केले आहे. “भोंगा” ३ मे ला आपल्या सिनेमा गृहात येत आहे.
व्यावसायिक आघाडीवर दिप्ती धोत्रेने तिच्या मुळशी पॅटर्न, भोंगा, विजेता आणि इतर अनेक चित्रपटांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रशंसा मिळवली आहे. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये भिरकिट आणि विषय क्लोज यांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त, अभिनेत्री बॉलीवूड इंडस्ट्रीवर राज्य करण्यासाठी सज्ज आहे जे Amazon प्राइमवर रिलीज होणार आहे . त्या बरोबर अभिनेत्री लवकरच उर्वशी रौतेला आणि रणदीप हुड्डा सोबत जिओ स्टुडिओ मालिका इन्स्पेक्टर अविनाश मध्ये अत्यंत वेगळ्या भुमिकेत दिसणार आहे . येत्या काही महिन्यांत या अभिनेत्रीचे आणखी काही रिलीज आहेत.Ends
Be the first to comment on "दीप्ती धोत्रेच्या चित्रपटात सांगितले आहेत- अजाण साठी भोंग्याची काय गरज? भोंगा चित्रपटाचा दमकदार ट्रेलर"