पिनॅकल इंडस्ट्रीजने सादर केली नवी प्रगत रेल्वे आसन यंत्रणा – सुरक्षित, आरामदायी, जागतिक दर्जाचा सौंदर्यानुभव देणारी आसने देण्याचे लक्ष्य

Pinnacle Industries Limited Logo

Mr. Arihant Mehta, Director, Pinnacle Industries Limited and Founder Pinnacle Social & Charitable Foundation

Pinnacle Social & Charitable Foundation

मध्यप्रदेशमधील इंदूर येथील इंदूर एअरपोर्ट अँड नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक्सजवळील (एनएटीआरएएक्स) सुपर कॉरिडॉर येथे 28 एप्रिल ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत आयोजित मध्यप्रदेश ऑटो शो 2022 मध्ये कंपनीतर्फे आपली नवी रेल्वे सीटिंग रेंज आणि क्षमता सादर करण्यात येणार आहे 

मुंबई2एप्रिल, 2022 (GPN): पिनॅकल इंडस्ट्रीज या भारतातील ऑटोमोटिव्ह इंटिरिअर्स, आसन यंत्रणा व ईव्ही सुटे भाग व स्पेशालिटी वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपनीतर्फे रेल्वे आसन यंत्रणांमध्ये पदार्पण करत असल्याची घोषणा करण्यात आली. व्यावसायिक ऑटोमोटिव्ह आसने, इंटिरिअर्स आणि सुट्या भागांच्या उद्योगामध्ये असलेले अद्वितीय ज्ञान व कौशल्यासह पिनॅकलच्या रेल्वे सीटिंग डिव्हिजनचे डिझाइन, इंजिनीअरिंग आणि पूर्णपणे मान्यताप्राप्त रेल सीटिंगच्या निर्मितीमध्ये खास कौशल्य आहे. ही निर्मिती करताना सुरक्षा व आरामदायीपणाचा जागतिक दर्जा साध्य करण्यात येणार आहे.

पिनॅकलची रेल्वे आसन यंत्रणांची नवीन रेंज प्रगत मटेरिअल व तंत्रज्ञान, अत्यंत उपयुक्त डिजाइन्सचा वापर करून तयार करण्यात आली आहे. अरगोनॉमिक तत्वांवर आधारित जागतिक दर्जाच्या सुरक्षित, सौंदर्यानुभव देणाऱ्या टिकाऊ तसेच अत्यंत आरामदायी आसनांच्या मागणीसाठी कंपनी रेल्वे आसनांमध्ये प्रगत तंत्रज्ञान सादर करत आहे. दर्जा, आरामदायीपणा व सुरक्षितता यांची सांगड घालून या उत्पादन रेंजमध्ये नावीन्यपूर्ण सौंदर्यानुभव देणारे डिझाइन आहे आणि यात नव्या युगासाठी विविध फीचर्सही आहेत.

कंपनीच्या विस्तृत पोर्टफोलियोमध्ये भर घालण्यात आलेल्या या नव्या उत्पादनाबद्दल पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक श्री. अरिहंत मेहता म्हणाले, “नव्या युगातील तुलनेने वेगवान ट्रेन्सचा विचार करता भारतीय रेल्वेमध्ये सुरक्षित, आऱामदायी आणि सौंदर्यानुभव देणाऱ्या आसनांची मागणी असेल. आम्ही मार्केटमध्ये पुरवठा करत असलेल्या प्रत्येक उत्पादनासह आम्ही जे उपलब्ध करून देऊ इच्छितो, त्याच्याशी हे सुसंगत आहे. सुरक्षितता, आरामदायीपणा व स्टाइलची उच्च पातळी, आधुनिक सौंदर्यानुभव व फीचर्स उपलब्ध करून देणारी रेल्वे आसन यंत्रणेची नवी रेंज सादर करताना आम्ही अत्यंत उत्साहात आहोत. प्रवाशांना सुरक्षितता, आरामदायी प्रवास व प्रसन्न करणारा सौंदर्यानुभव उपलब्ध करून देणारी उत्पादने विकसित करण्याच्या व पुरविण्याच्या प्रतिबद्धतेचे हे द्योतक आहे. भविष्याकडे वाटचाल करताना रेल्वे सेगमेंट आणि इतर मार्केट्सना नावीन्यपूर्ण, वाजवी खर्चातील, सुरक्षित आणि टिकाऊ जागतिक दर्जाच्या उत्पादनांचे डिझाइन करणे, विकसित करणे आणि त्यांचा पुरवठा करणे याबाबत आम्ही खूप आशावादी आहोत. भारतातील आणि जगभरातील रेल्वे उद्योगांची क्षमता पाहता पिनॅकल इंडस्ट्रीजला वाढीच्या अनेक संधी मिळतील, अशी आम्हाला खात्री आहे.

डिझाइन व विकास या विभागात या उद्योगातील आघाडीचे कौशल्य आणि ऑटोमोटिव्ह आसने, सुटे भाग यांची असेंब्ली आणि पीथमपूर व पुणे येथील कारखाने यामुळे परिपूर्ण रेल्वे आसन यंत्रणांसाठी एक्सक्लुझिव्ह ठिकाण होण्याचे पिनॅकल इंडस्ट्रीजचे उद्दिष्ट आहे. बॅक एंड व फॉरवर्ड इंटिग्रेशनमधील आपल्या क्षमतांचा उपयोग करून घेत तांत्रिक, व्यावसायिक व उत्पादन दृष्टिकोनातून मॉड्यूल सोल्यूशन्स इष्टतम करण्याची कंपनीची योजना आहे. यामुळे मल्टि-इटरेशन डिझाइन आणि विकास करण्याला लागणारा कमी वेळ साध्य करून जोखीम कमी करता येणार आहे.

अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारताची रेल्वे यंत्रणा जगातील चौथ्या क्रमांकाची आहे. स्थानिक व परदेशातील खासगी कंपन्यांचा रेल्वेमध्ये सहभाग वाढत असून अनुकूल धोरण उपाययोजनांमुळे रेल्वे क्षेत्र मध्यम व दीर्घकालीन कालावधीत वेगाने वाढणार आहे. भारत सरकारने पायाभूत सुविधांवर भर दिल्यामुळे रेल्वेची वाढ वेगाने होत आहे. रेल्वे पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक 2030 पर्यंत रु.50 लाख कोटी (715.41 अमेरिकन डॉलर) इतकी असेल.

पिनॅकिल इंडस्ट्रीजचे 5 सुसज्ज, मोक्याच्या ठिकाणी असलेले, अत्याधुनिक उत्पादन कारखाने आहेत. डिझाइन, रिव्हर्स इंजिनीअरिंग, टूल डिझाइन व विकासउत्पादन आणि रॅम्प-अपमध्ये कंपनीची क्षमता आहे. आपल्या इंजिनीअरिंगडिझाइनतंत्रज्ञानउत्पादन आणि भक्कम पुरवठा साळीचा उपयोग करून घेतानाच पिनॅकल इंडस्ट्रीज हे आउटसोर्स केलेल्या सुट्या भागांच्या निर्मितीसाठी मौल्यवान ठिकाण असेल.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "पिनॅकल इंडस्ट्रीजने सादर केली नवी प्रगत रेल्वे आसन यंत्रणा – सुरक्षित, आरामदायी, जागतिक दर्जाचा सौंदर्यानुभव देणारी आसने देण्याचे लक्ष्य"

Leave a comment

Your email address will not be published.


*