
(डावीकडून-उजवीकडे): श्री. विक्रमादित्य सिंग खिची,ईडी; श्री. संजीव चड्ढा, एमडी आणि सीईओ यांच्यासोबत श्री. अजय के. खुराना, ईडी; श्री. जॉयदीप दत्ता रॉय, ईडी आणि श्री. अखिल हांडा, चीफ डिजीटल ऑफिसर, बँक ऑफ बडोदा डिजीटल कॉंक्लेव्हमध्ये बॉब वर्ल्ड गोल्ड लॉन्च करताना
- वापरण्यास सोपा इंटरफेस सोबतच सुटसुटीत डिझाईन
- आवश्यक घटकांवर, वारंवार वापरात आलेल्या सेवांवर भर
मुंबई, 28 एप्रिल, 2022 (GPN): बँक ऑफ बडोदा, ही सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँकांपैकी एक असून आज त्यांच्या वतीने आज बॉब वर्ल्ड गोल्ड लॉन्चची घोषणा करण्यात आली – या बॉब वर्ल्ड मोबाईल बँकिंग मंचावर खास करून ज्येष्ठ आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी बॉब वर्ल्ड मोबाईल बँकिंगमंच हे खास वैशिष्ट तयार करण्यात आले आहे.
ज्येष्ठ नागरिकांना डिजीटल बँक व्यवहारात रस असल्याचे अभ्यास दर्शवतो, त्यात त्यांच्या विशिष्ट गरजा आणि आवश्यकतांची दखल घेण्यात आली आहे. बॉब वर्ल्ड गोल्ड हा अभिनव डिजीटल मंच असून प्रामुख्याने अशा गरजांसाठी तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना सोपा, सुरळीत आणि संरक्षित मोबाईल बँकिंग अनुभव मिळतो.
बॉब वर्ल्ड गोल्ड हाताळण्यास अगदी सोपा, मोठे फॉन्ट्स, पुरेसे मधले अंतर (स्पेसिंग) आणि स्पष्ट पर्याय उपलब्ध करून देणारे आहे. त्यात रेडी–टू–असिस्ट वॉईस बेस्ड सर्च सर्विससारखीवैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. त्याशिवाय, बॉब वर्ल्ड 250 हून अधिक सेवा उपलब्ध देते. बॉब वर्ल्ड ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यावश्यक, वारंवार वापर असणाऱ्या सेवा आणि पसंतीचे व्यवहार घेऊन आले आहे. या सुविधा होम स्क्रीनवर सुलभतेने उपलब्ध असून सहज हाताळता येतील अशा आहेत. या सेवांमध्ये ठेवींचे नूतनीकरण, बचत खात्यांची तुलना, निवृत्ती आणि उत्तराधिकारी योजना सेवा, आरोग्य सेवा/ औषधालय शोध इत्यादी समाविष्ट आहेत.
बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री संजीव चड्ढा म्हणाले, “आमच्या ज्येष्ठ ग्राहकांच्या गरजा अभिनव आहेत आणि त्यामुळे काहीशा निराळ्या अप्रोचचे ते मानकरी ठरतात. बॉब वर्ल्ड गोल्डमागची कल्पना म्हणजे प्रत्येक घटकाकडे भौगोलिक नजरेतून पाहिले जाते आणि डिजीटल बँकिंग मंचातून त्यांच्या विशिष्ट गरजा समजून घेतल्या जातात. शेवटचा परिणाम सुलभ, स्मार्टर, अधिक व्यक्तिनुरूप आणि ज्येष्ठ नागरीक–स्नेही बँकिंग अनुभव आमच्या ग्राहकांना देऊन जाणारा आहे आणि त्यांच्याकरिता तयार करण्यात आलेल्या बँकिंग सुविधांची विस्तृत श्रेणी उपलब्ध होईल याची खातरजमा या माध्यमातून करण्यात येणार आहे.”
बॉब वर्ल्ड गोल्डची वैशिष्ट्ये:
· सोपा आणि सुलभ वापरकर्ता इंटरफेस: सुटसुटीत डिझाईन आणि सोपे इन्फोग्राफिक स्क्रीन नेव्हीगेशनला सहज साह्य करतात, रेडी–टू–असिस्ट आवाज–आधारित शोध सेवा, डॅशबोर्डच्या उजवीकडे देण्यात आली आहे.
· कस्टमायजेशन: बॉब वर्ल्ड गोल्ड ज्येष्ठ नागरीक ग्राहकांचे प्राधान्यक्रम समजून घेण्यासाठी कस्टमाईज केले असून ते समर्पक व पसंतीच्या मेन्यू पर्यायासह उपलब्ध आहेत.
· प्राधान्य–आधारित संशोधनात्मक सेवा: बॉब वर्ल्ड गोल्ड ही खास करून ज्येष्ठ नागरिक (60 वर्षे आणि त्यावरील)साठी असलेली सेवा असून नवीन तयार करण्यात आलेल्या डॅशबोर्डवर मोठाले आयकन आणि फॉन्टचा समावेश आहे, चांगली रंगसंगती, मजकूर, टूलटिप्स आणि नेव्हीगेशनवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
या ग्राहक वर्गाच्या विशेष गरजा ओळखून लॉग–इन डॅशबोर्ड आणि सेवा; जसे की स्टेटमेंट/सर्टिफिकेटवर अधिक भर, शाखेशी कनेक्ट आणि अतिरिक्त वैशिष्ट्ये म्हणजे औषधालये, निदान ऑफर आणि आरोग्यविषयक पॅकेजेस लक्ष्य करण्यात आलेल्या ग्राहक समुहाला उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
2021 पर्यंत भारतात अंदाजे 138 दशलक्ष ज्येष्ठ नागरिक होते, जे 2031 पर्यंत 192 दशलक्षपर्यंत वाढतील. प्रामुख्याने महासाथीनंतरच्या युगातील डिजीटल सेवा वापरणारा हा महत्त्वाचा ग्राहक वर्ग असेल. ज्याला विशेष अप्रोचची आवश्यकता असेल.
बॉब वर्ल्ड गोल्डची वैशिष्ट्य अँड्रॉईड आणि आयओएस दोन्हीवर उपलब्ध आहे.Ends
Be the first to comment on "बँक ऑफ बडोदाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी बॉब (bob) वर्ल्ड गोल्ड लाँच केले"