क्वेस्ट ग्लोबल नवीन स्वरूप व नूतनीकृत उद्दिष्टासह साजरी करत आहे २५ वर्षे

Quest Global Logo

Ms Yumi Clevenger-Lee, Global Chief Marketing Officer at Quest Global

Mr Ajit Prabhu, Chairman and CEO, Quest Global -Photo By GPN

ब्रॅण्डचा नवीन अवतार इंजिनीअरिंगला उद्याच्या मार्गात येणाऱ्या आजच्या समस्या सोडवण्यासाठी अनन्यसाधारण संधी मिळवून देण्याची घोषणा ठळकपणे करतो

बेंगळुरूएप्रिल २६२०२२ (GPN): क्वेस्ट ग्लोबल या जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या इंजिनीअरिंग सर्व्हिसेस फर्मने आपले नवीन कॉर्पोरेट ब्रॅण्ड उद्दिष्ट व लोगो यांचे आज अनावरण केले.

डोळ्यांत भरणारे श्रीमंती रंग व नवीन डिझाइन यांची दृश्य उधळण कंपनीच्या २५ वर्षांच्या अस्तित्त्वाबद्दल सांगते आणि आपण जगातील सर्वांत कठीण इंजिनीअरिंग समस्या सोडवणारे सर्वांत विश्वासार्ह सहयोगी आहोत हेही स्पष्ट करते.

सध्या दर आठवड्याला १२५ हून अधिक इंजिनीअर्सची भरती करणाऱ्या या कंपनीचा नवीन लूक हे ग्राहक, सध्याचे कर्मचारी आणि अनेक पटींनी वाढ साध्य करून देणारे नवनियुक्त कर्मचारी यांच्यासाठी ब्रॅण्ड अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी क्वेस्ट ग्लोबल टाकत असलेल्या अनेक पावलांपैकी एक पाऊल आहे.

“२०२२ हे क्वेस्ट ग्लोबलसाठी महत्त्वाचे वर्ष आहे, आम्ही २५ वर्षांचे झालो!”, असे क्वेस्ट ग्लोबलचे अध्यक्ष व सीईओ अजित प्रभू म्हणाले. “आम्ही हा वैभवशाली क्षण साजरा करत असतानाच, आमच्या नवीन ओळखीतून, एक शतकी संस्था होण्याची आमची महत्त्वाकांक्षा व कळकळ दिसून येत आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांत कसे उत्क्रांत होत आलो आहोत आणि अधिक चांगल्या समाजासाठी, आमच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि आमच्या ग्राहकांसाठी, आम्ही आमच्या सीमा कशा ओलांडत राहू हे यातून दिसून येत आहे. आम्ही या नवीन अध्यायात विनय व अभिमानाने प्रवेश करत आहोत आणि अधिक चांगले भवितव्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.”

पारंपरिक क्षेत्रासाठी पुनरुज्जीवीत स्वरूप

नवीन लोगोमध्ये कंपनीच्या १९९७ च्या मूळ लोगोतील झुलते भिंग कायम ठेवण्यात आले आहे. अत्यंत कौशल्यपूर्ण अचूकतेचा कंपनीचा लौकीक यातून दिसून येतो.

“आमची नवीन कॉर्पोरेट ब्रॅण्ड आयडेंटिटी, आमच्या लोकांसोबत, आमच्या ग्राहकांसोबत आणि समाजासोबत, अधिक चांगल्या पद्धतीने संवाद साधण्याचा मार्ग मोकळा करून देते. आम्ही केवळ सेवा पुरवठादार नाही आहोत, तर त्यापलीकडे जातो हे सांगण्यात ती आम्हाला मदत करते. जगातील सर्वांत कठीण इंजिनीअरिंग समस्यांसाठी सर्वाधिक विश्वासार्ह सहयोगी होण्यासाठी आणि नवनवीन शिखरे गाठण्यासाठी आम्ही अविश्रांतपणे प्रयत्न करत आहोत. या नवीन ओळखीतून आमचे कामावरील प्रेम आणि निष्ठा चपखल दिसून येतेच, शिवाय आमच्या वारशाचे संकेतही यातून मिळतात,” असे क्वेस्ट ग्लोबलचे ग्लोबल चीफ मार्केटिंग ऑफिसर युमी क्लेव्हेंजरली म्हणाले.

आशावादी पिवळा आणि सौहार्दपूर्ण जांभळा या रंगांचा संयोग नवीन दृश्यात्मक संकेत उलगडत जातो. यशस्वी लोकांची जागतिक कंपनी तसेच जगभरातील इंजिनीअरिंगच्या सर्वांत कठीण समस्या सोडवून अनेक उद्योगक्षेत्रांतील ग्राहकांना मदतीचा हात देणारी कंपनी ही ओळख या नवीन स्वरूपातून स्पष्ट होते. इंजिनीअरिंगचा व्यवसाय हा खऱ्या अर्थाने अधिक उज्ज्वल भविष्यकाळ बांधण्याचा आहे तसेच हे भविष्यकाळाच्या आड येणाऱ्या वर्तमानातील समस्यांवर तोडगा काढणे आहे हे या नवीन लोगोतून खऱ्या अर्थाने दिसून येते.

“क्वेस्ट ग्लोबलचे ब्रॅण्ड प्रतीक केवळ काळ्या व निळ्या स्पर्धकांच्या समुद्रात वेगळे उठून दिसणार नाही, तर १०० टक्के अचीव्हर व १०० टक्के केअरगिव्हर यांचा अनन्यसाधारण संयोग यातून दिसून यावा असे आम्हाला वाटत होते. हे प्रतीक आधुनिक व कालातीत दोन्ही दिसणे आवश्यक होते, ते सुसंबद्ध तरीही वेगळे वाटावे, त्याचा आधारही वाटावा पण स्वरूप निर्भय असावे असा विचार त्यामागे होता. यातून जे साकार झाले आहे ते पुरेसे बोलके आहे,” असे ओशन ब्रॅण्डिंगचे संस्थापक व क्रिएटिव डायरेक्टर डेव्हिड बुचान म्हणाले. याच एजन्सीने क्वेस्ट ग्लोबलचा लोगो डिझाइन केला होता.Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "क्वेस्ट ग्लोबल नवीन स्वरूप व नूतनीकृत उद्दिष्टासह साजरी करत आहे २५ वर्षे"

Leave a comment

Your email address will not be published.


*