
MEDNAwise Brand
राष्ट्रीय, 25 एप्रिल २०२२ (GPN): प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा क्षेत्रातील एक आद्यप्रवर्तक कंपनी इंडस हेल्थ प्लस MEDNAwise ही प्रिसिशन मेडिसीनच्या क्षेत्रातील एक जनुकीय उपाययोजना दाखल करत आपल्या जनुकीय तपासणी संचाचा विस्तार करत आहे. MEDNAwise चाचणीमुळे तुम्हाला कोणती औषधे सर्वात उत्तम प्रकारे लागू ठरू शकतात हे समजण्यास मदत होते, तुमच्या उपचारांचे व्यवस्थापन करता येते आणि त्यांची परिणामकारकता वाढविता येते. शिवाय ज्यांना उपचारांच्या बाबतीत एक पाऊल पुढे रहायचे आहे अशांसाठी प्रेडिक्टिव्ह पर्सनलाइझ्ड मेडिकेशन गाइड म्हणूनही त्याचा उपयोग होऊ शकतो.
MEDNAwise चाचणी ही फार्माकोजिनोमिक्स, म्हणजे विशिष्ट औषधांना तुमचे शरीर कशाप्रकारे प्रतिसाद देईल हे सांगण्यासाठी तुमच्या जनुकीय माहितीचा वापर करणा-या अभ्यासपद्धतीवर आधारित तपासणी आहे. यामुळे डॉक्टर्स आपल्या रुग्णांना अधिक सुरक्षित आणि अधिक परिणामकारक औषधे लिहून देऊ शकतील. एखादे औषध तुमच्या शरीराकडून कसे स्वीकारले जाईल, किंवा एखाद्या औषधाच्या बाबतीत तुम्ही किती संवेदनशील आहात या गोष्टीवर जनुकीय घटकांचा परिणाम होत असतो. त्यामुळे कोणत्याही औषधाच्या बाबतीत प्रमाण औषधांच्या प्रमाण मात्रेला चांगला प्रतिसाद देणारे रुग्ण आणि असा प्रतिसाद न देऊ शकणारे रुग्ण असे रुग्णांचे दोन प्रकार असतात. यापैकी प्रतिसाद देऊ न शकणा-या रुग्णांना पर्यायी औषधांची किंवा औषधाची मात्रा बदलण्याची गरज भासते. एखाद्या व्यक्तीचे शरीर कोणत्याही प्रकारच्या औषधाचे पचन अशापद्धतींनी करते.
ही नवी तपासणीपद्धती सुरू करताना इंडस हेल्थ प्लसचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अमोल नायकवाडी म्हणाले, “जनुकीय विज्ञानाच्या क्षेत्रात जसजशी अधिकाधिक प्रगती होत आहे, तसतसे आपल्या आरोग्य व स्वास्थ्याविषयी अधिक चांगले निर्णय घेण्यासाठीची संसाधने लोकांच्या हाती लागत आहेत. उपचारांचे अधिक चांगले परिणाम मिळावेत यासाठी अधिक सुरक्षित व परिणामकारक औषधे लिहून देण्यासाठी डॉक्टरांना बळ देणे हा MEDNAwise या आमच्या फार्माकोजिनोमिक उत्पादनामागचा आमचा हेतू आहे. MEDNAwise ही एक जेनेटिक उपाययोजना आहे जी पुढील गोष्टी साध्य करेल:
- तुम्हाला सर्वात उत्तम प्रकारे मानवेल अशी औषधे आणि मात्रा निवडण्यास मदत करणे
- उपचारांच्या खर्चाचा इष्टतम वापर होण्यास मदत करणे.
- कमीत-कमी त्रुटी आणि चुका
- औषधाचे विपरित परिणाम होण्याची किमान शक्यता
- उपचार अयशस्वी होण्याची किमान शक्यता
- परिणामकारकता वाढवून उपचारांचा कालावधी कमीत-कमी राखण्यास मदत करणे
MEDNAwise चा वापर ज्या व्यक्तींच्या कुटुंबात औषधांचे विपरित परिणाम होण्याचा पूर्वेतिहास असेल अशा कोणत्याही व्यक्तीकडून केला जाऊ शकतो, उपचारांचे अपेक्षित परिणाम न दिसल्यास, विविध औषधे एकाचवेळी घेत असलेल्या व्यक्तीकडून, विशिष्ट औषधे घेणा-या किंवा सुरू करू पाहणा-या वयोवृद्ध व्यक्तींकडूनही याचा वापर होऊ शकतो. समाजाला आरोग्य सेवा उपाययोजना पुरविण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करत असतो आणि आता MEDNAwise च्या मदतीने आम्ही पर्सनलाइझ्ड मेडिसीनच्या क्षेत्रात उडी घेत आहोत.”
MEDNAwise ही लाळेद्वारे केली जाणारी, यूजर-फ्रेंडली जनुकीय चाचणी आहे, जी घरच्या घरीसुद्धा करता येते आणि तिची किंमत ९,९९९ रूपये+ कर इतकी आहे. MEDNAwise चाचणी सर्व वयोगटांसाठी चालू शकेल अशी आहे व त्यात विविध आरोग्यविभागांशी संबंधित ११ प्रवर्ग आणि ७२ औषधांवरील चाचणीचा समावेश आहे. MEDNAwise चाचणीसाठी पात्र प्रवर्ग पुढलीप्रमाणे:
१ | भूलशास्त्र (Anesthesiology) |
२ | चेतासंस्थाशास्त्र (Neurology) |
३ | हृदयचिकित्सा (Cardiology) |
४ | कर्करोगशास्त्र (Oncology) |
५ | मानसशास्त्र (Psychiatry) |
६ | जठरांत्रमार्गशास्त्र (Gastroenterology) |
७ | जठरांत्रमार्गशास्त्र (Gastroenterology) |
८ | स्त्रीरोगशास्त्र (Gynecology) |
९ | अवयव प्रत्यारोपण (Organ Transplantation) |
१० | फुफ्फुसशास्त्र (Pulmonology) |
११ | संसर्गजन्य आजार |
MEDNAwiseचाचणीच्या रिपोर्टवरून रुग्णाची (व्यक्ती) माहिती जाणून घेण्यास मदत होते व त्यावरून डॉक्टर्स संबंधित व्यक्तींच्या उपचारांबद्दल संपूर्ण माहितीनिशी निर्णय घेऊ शकतात.
इंडस हेल्थ प्लस प्रा. लि. ही आयएसओ 9001: 2015 कंपनी आहे, जी दर्जेदार आरोग्यसेवा सर्वांसाठी ‘अव्हेलेबल, अॅक्सेसिबल व अफोर्डेबल‘ करण्याप्रती कटिबद्ध आहे. इंडसने भारतातील ७८ हून अधिक शहरांमधील उत्तमरित्या सुसज्ज व अत्याधुनिक हॉस्पिटल्स व डायग्नोस्टिक लॅब्ससह धोरणात्मक सहयोग केले आहेत आणि कंपनीचे १२२ हून अधिक सेंटर्स आहेत.
स्क्रिनिंग टेस्टच्या माध्यमातून आजारांचे लवकर निदान केल्यास जीवन वाचण्यासोबत व्यक्ती व त्याच्या कुटुंबियांचे प्रचंड शारीरिक, भावनिक व आर्थिक तणावापासून देखील संरक्षण होते.
Be the first to comment on "इंडस हेल्थ प्लस घेऊन आले आहे MEDNAwise, प्रिसिशन मेडिसीनच्या क्षेत्रासाठी एक जनुकीय उपाययोजना"