~ मार्गदर्शकतत्त्वांचा २०५० पर्यंत शून्य पर्यावरणीय उत्सर्जन संपादित करण्याचा मनसुबा ~
राष्ट्रीय, एप्रिल २३, २०२२ (GPN):
सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (एसपीएनआय)ने हरित पद्धतींचा अवलंब करत उद्योगाचे नेतृत्व करण्याच्या कटिबद्धतेसह उद्योगामध्ये पहिल्यांदाच कन्टेन्ट प्रॉडक्शनसाठी सस्टेनेबिलिटी मार्गदर्शकतत्त्वे जारी केली. एसपीएनआयने २०५० पर्यंत शून्य पर्यावरणीय उत्सर्जन संपादित करणे हा या मार्गदर्शकतत्त्वांचा मनसुबा आहे.
सुरूवातीला एसपीएनआय त्यांच्या काही शोजमध्ये या मार्गदर्शकतत्त्वांची अंमलबजावणी करेल आणि त्यानंतर सर्व विद्यमान प्रॉडक्शन्समध्ये त्यांची अंमलबजावणी करेल.
ही मार्गदर्शकतत्त्वे एसपीएनआयशी संलग्न सर्व प्रॉडक्शन हाऊस व सहयोगींनी पालन करावयाच्या कृतींना सादर करतात. काल्पनिक, अकाल्पनिक व डिजिटल अशा कन्टेन्ट स्वरूपांमध्ये करण्यात आलेल्या व्यापक उद्योग संशोधनानुसार ही मार्गदर्शकतत्त्वे काळजीपूर्वक तयार करण्यात आली आहेत. यामध्ये समाविष्ट असलेल्या उपाययोजनांमध्ये व्यापक कार्यसंचालनांसह कृतीशील उपक्रमांचा समावेश आहे, जसे सेट डिझाइन करण्यासाठी सिंगल-युज प्लास्टिक, थर्माकोलवर, तसेच प्रिंटींगसाठी फ्लेक्सवर पूर्णपणे बंदी. तसेच यामध्ये लो-व्हीओसी पेंट्स, एफएससी प्रमाणित टिंबर, नैतिक व पर्यावरणास अनुकूल कॉस्मेटिक्सचा वापर आणि अनिवार्य कचरा वेगळे करणे व पुनर्चक्रण धोरणाची अंमलबावणी यांचा देखील समावेश आहे. तसेच यामध्ये हरित परिवर्तनाशी संबंधित सुरू असलेल्या प्रकियेबाबत जागरूकता निर्माण करणारे कर्मचारीवर्ग व पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी प्रशिक्षण व क्षमता-निर्माण उपक्रमांची देखील शिफारस आहे.
सस्टेनेबिलिटी मार्गदर्शकतत्त्वांवर भर देणारे उपक्रम सर्व शोजसाठी कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याच्या दिशेने पाऊल आहेत आणि हे उपक्रम कार्यसंचालनांच्या इतर स्वरूपांमध्ये देखील राबवण्यात येणार आहेत. ही मार्गदर्शकतत्त्वे पूर्णपणे हरित कामकाजाच्या मॉडेलमध्ये रूपांतरण करण्याला चालना देण्यास मदत करतील. हरित पद्धतींचा अवलंब करण्याचा आवश्यक पैलू म्हणजे ऑडिट यंत्रणा, ज्यामुळे कंपनीला प्रगतीवर देखरेख ठेवत लाभ होईल. एसपीएनआय वातावरणीय बदलाचा सामना करण्यासाठी आणि आरोग्यदायी व शाश्वत भूतलाची खात्री घेत नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्यासाठी स्थिर उपक्रम व सहयोग करत पर्यावरणीय उत्सर्जन कमी करणारी ठोस प्रगती करण्याप्रती कटिबद्ध आहे.
Be the first to comment on "सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाने कन्टेन्ट प्रॉडक्शनसाठी जारी केली सस्टेनेबिलिटी मार्गदर्शकतत्त्वे"