
Faisal Khan as Garud on Sony SAB’s Dharm Yoddha Garud
Mumbai, 19th April 2022 (GPN): गरूडचा (फैजल खान) जन्म हा भारतीय इतिहासाच्या पानांवर कोरण्यात आलेल्या सर्वात लक्षणीय घटनांपैकी एक आहे. तो आकाशावर अधिपत्य गाजवण्यासोबत पक्ष्यांचा राजा बनण्याचे भाकित करण्यात आले होते, पण त्याची काकी कद्रूच्या (पारूल चौहान) दुष्ट हेतूंमुळे त्याचे नशीब बदलते. ईर्ष्या व रागाच्या भरात तिने स्वत:ची बहीण विन्ताला (तोरल रासपुत्र) गुलाम बनवले, ज्यामुळे गरूडचा गुलामगिरीमध्ये जन्म होईल आणि त्याला तिच्या आदेशांचे पालन करावे लागेल. पण विन्ताने तिच्या दुर्दैवी नशीबाचा स्वीकार करण्याला सुरूवात केली असतानाच गरूडचा जन्म झाला आणि त्यासोबत तिने कल्पना न केलेला आशेचा किरण जागृत झाला.

Faisal Khan as Garud on Sony SAB’s Dharm Yoddha Garud
विन्ता दीर्घकाळापासून गरूडची वाट पाहत होती. कद्रू त्याच्या अंड्याचे नुकसान करणार असतानाच गरूड राखेमधून फिनिक्ससारखा प्रकट होतो. त्याचा जन्म ज्याच्या शक्तीची आठवण करून देतो, ज्यामधून पक्ष्यांचा राजा अपराजित असल्याचे दिसून येते आणि तो कद्रूच्या दुष्ट इच्छांना मोडून काढण्यासाठी आला आहे.
गरूड त्याच्या आईला गुलामगिरीमधून बाहेर काढण्यामध्ये यशस्वी होईल का? कद्रूची त्याच्या जन्माप्रती काय प्रतिक्रिया असेल?

Faisal Khan as Garud on Sony SAB’s Dharm Yoddha Garud -Photo By GPN
गरूडची भूमिका साकारणारा फैजल खान म्हणाला, ”गरूडचा जन्म अशावेळी झाला, जेव्हा त्याची आई सर्व बाजूने हतबल असते. कद्रूला गरूडच्या शक्तीबाबत माहित नसते आणि ती त्याला दुखापत करण्यासाठी कोणतीच कसर सोडत नाही. गरूड हा देव असण्याचे भाकित करण्यात आल्यामुळे तिने त्याचा जन्म थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याचा जन्म भव्यदिव्य होता आणि तो विन्ताचे नशीब पुन्हा घडवण्यास व तिचा संरक्षक बनण्यास आला. हा सीक्वेन्स आकर्षक व्हिज्युअल्ससह तयार करण्यात आला आहे, जो निश्चितच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल. मी सर्वांना गरूडचा जन्म आणि त्यानंतरचा प्रवास पहाण्यासाठी आगामी एपिसोड्स पाहण्याचे आवाहन करतो.”
शक्तिशाली गरूडचा जन्म पाहण्यासाठी पहा ‘धर्म योद्धा गरूड‘ दर सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता फक्त सोनी सबवर!
Be the first to comment on "सोनी सबवरील मालिका ‘धर्म योद्धा गरूड’मध्ये गरूडच्या जन्माचा क्षण आणि त्याचा भव्य उगम पहा"