क्रेडीट रिपोर्टची भूमिका आणि गृह कर्ज पात्रतेचा स्कोअर ? कमी क्रेडीट स्कोअरमागची सर्वात महत्त्वाची कारणे कोणती? लेखक: नीरज धवन, व्यवस्थापकीय संचालक, एक्सपीरियन इंडिया

Experian India Logo

Neeraj Dhawan, Managing Director, Experian India

मुंबई, 19 एप्रिल 2022 (GPN):- तुम्हाला कर्जाची आवश्यकता भासल्यावर वित्तीय संस्था तुमच्या क्रेडीट रिपोर्टचं मूल्यांकन करते. त्यावरून तुम्ही किती कर्जासाठी पात्र ठरता किंवा कितपत रकमेची सेवा तुम्हाला मिळू शकते ते ठरतं. हा दस्तावेज कर्जदात्याला तुमची ओळख, तुमची कर्जविषयक पार्श्वभूमी (तुम्ही पूर्वी घेतलेली कर्ज), तुमची सुरू असलेली कर्जविषयक खाती, भरणा रक्कम किंवा पेमेंट, अधिक कर्जाकरिता अलीकडे करण्यात आलेली विचारणा आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचा क्रेडीट स्कोअर याबद्दल माहिती उपलब्ध करून देतो.

क्रेडीट कार्ड, चारचाकीसाठी कर्ज, घरासाठी गहाणखत आणि तत्सम गरजांसाठी चांगला क्रेडीट स्कोअर फार महत्त्वाचा ठरतो. तुमचा क्रेडीट स्कोअर हा तीन अंकी क्रमांक असतो. तुमच्या कर्जविषयक पार्श्वभूमीची शहानिशा करून तो ठरतो. यामध्ये प्रत्येक महत्त्वाचं आर्थिक पाऊल, पैसा हाताळताना तुमचं एकंदर वर्तन आणि इतर मौल्यवान मालमत्ता, जी वित्तीय जबाबदाऱ्यांच्या दिशेने सामान्य वृत्तीव्यतिरिक्त निर्माण केलेली आहे, ज्यामध्ये उपयुक्तता भरणा रकमेचा समावेश असतो.

कमी क्रेडीट स्कोअरमागील महत्त्वाची कारणं:

  • पुनर्परताव्याला झालेला उशीरजेव्हा एखादा कर्ज परतफेड (रिपेमेंट) करण्यास उशीर होतो, त्यावेळी क्रेडीट स्कोअर खालावतो. जर कर्जाचा परतफेड करण्यास सातत्याने विलंब होत असल्यास, त्याचा विपरीत परिणाम क्रेडीट स्कोअरवर होतो. कर्जाची रक्कम परत करण्यात जितकी दिरंगाई, तेवढाच क्रेडीट स्कोअर खाली गडगडण्याची शक्यता अधिक असते.  
  • विविध कर्जे: विविध प्रकारची कर्जे घेतली असल्यास क्रेडीट स्कोअरवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बळावते आणि त्यामुळे परतफेड करण्याच्या क्षमतेला फटका बसतो.
  • प्रदीर्घ कर्ज पार्श्वभूमी नसणेकर्ज घेण्याचा दीर्घ इतिहास असल्यास तुमचा क्रेडीट स्कोअर राखण्यास मदत होते. शक्य असल्यास, तुमची जुनी क्रेडीट कार्ड बंद न करता सुरू ठेवावी. त्यामुळे चांगला कर्ज इतिहास आणि परतावा वर्तन तुम्हाला साह्यकारी ठरते.
  • विविध प्रकारची कर्जे किंवा क्रेडीट कार्डसाठी अर्ज करतानाविविध प्रकारची कर्जे किंवा क्रेडीट कार्डकरिता वारंवार अर्ज केल्यास तुम्ही कर्ज घेण्यासाठी अतिउत्सुक आहात असे दिसून येते. एकाच वेळी क्रेडीट कार्ड आणि कर्जासाठी अर्ज न करता, थोडे अंतर असू द्यावं. अनेक कर्जविषयक अर्ज केल्यास, तुमच्याकडे माहितीची विचारणा करण्यासाठी चौकशीचे बरेच कॉल येऊ शकतात. ते टाळण्यासाठी मोफत एक्सपीरियन  क्रेडीट रिपोर्ट डाऊनलोड करून कर्जदात्या संस्थांना उपलब्ध करून देता येईल.
  • तुमच्या क्रेडीट रिपोर्टचे पुनरावलोकन न करणेक्रेडीट रिपोर्ट हा तुमची वैयक्तिक माहिती, कर्जविषयक व्यवहार, कर्जविषयक खाती आणि परताव्यासंबंधीचा सारांश असतो. तुमच्या क्रेडीट रिपोर्टमध्ये तथ्यात्मक अचूकतेची खातरजमा करण्यासाठी, तुम्हाला मोफत एक्सपीरियन  क्रेडीट रिपोर्ट आणि स्कोअर नियमित तपासण्याविषयी सल्ला देण्यात येतो. मोफत, अमर्याद एक्सपीरियन  क्रेडीट रिपोर्टचा लाभ घेण्यासाठी भेट द्या, www.experian.in.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "क्रेडीट रिपोर्टची भूमिका आणि गृह कर्ज पात्रतेचा स्कोअर ? कमी क्रेडीट स्कोअरमागची सर्वात महत्त्वाची कारणे कोणती? लेखक: नीरज धवन, व्यवस्थापकीय संचालक, एक्सपीरियन इंडिया"

Leave a comment

Your email address will not be published.


*