मुंबई, 19 एप्रिल 2022 (GPN) – कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड आणि हुरुन इंडिया यांनी आज भारतात मुख्यालय असलेल्या आघाडीच्या 50 कंपन्यांची, संयुक्त राष्ट्रांच्या 17 SDGsच्या पूर्ततेच्या आधारे, 2021 कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड हुरुन इंडिया इम्पॅक्ट 50 (2021 Capri Global Capital Ltd Hurun India Impact 50), ही यादी प्रथमच प्रसिद्ध केली आहे. हुरुन रिसर्चने 2021 हुरुन इंडिया 500 सर्वांत मौल्यवान कंपन्यांची यादी (2021 Hurun India 500 most valuable companies) आधी जाहीर केली. यासाठी वार्षिक वित्तीय अहवाल, ESG, CSR, शाश्वतता अहवाल आणि माध्यमांतील बातम्या ही सार्वजनिक स्तरावर उपलब्ध माहिती वापरून स्कोरकार्ड तयार करण्यात आले. व्यावसायिक ते शिक्षणतज्ज्ञ अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील पाच-सदस्यीय सल्लागार मंडळाने स्कोरिंगच्या पद्धतीला आकार देण्यात मदत केली.
महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये
- भारतातील सर्वांत शाश्वत कंपनी: 47 या एकत्रित शाश्वतता स्कोरसह ग्रासिम इंडस्ट्रीजने, 2021 वर्षातली कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड हुरुन इंडिया इम्पॅक्ट 50 यादीत, पहिला क्रमांक प्राप्त केला. गेल्या वर्षी ग्रासिम इंडस्ट्रीजने 17 शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये योगदान दिले. यापैकी चार उद्दिष्टांना मापनीय कालबद्ध लक्ष्ये होती. टेक महिंद्रा 46 स्कोरसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली, त्यापाठोपाठ टाटा पॉवर कंपनीचा क्रमांक आहे.
- सर्व शाश्वत विकास उद्दिष्टांचा समानतेने पाठपुरावा केला जात नाही: 2021 कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड हुरुन इंडिया इम्पॅक्ट 50 यादीतील केवळ 14 कंपन्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्व 17 SDGsच्या आधारे आपली शाश्वतता उद्दिष्टांची पूर्तता केली. 2021 कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड हुरुन इंडिया इम्पॅक्ट 50 यादीतील कंपन्यांनी काही SDGsना अधिक प्राधान्य दिले. हवामान कृती (SDG 13), जबाबदार उपभोग व उत्पादन (SDG 12) या उद्दिष्टांना सर्वाधिक कंपन्यांनी प्राधान्य दिले, तर पाण्याखालील जीवन (SDG 14), या उद्दिष्टाला सर्वांत कमी भारतीय कंपन्यांनी प्राधान्य दिले; केवळ अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन या कंपनीने या उद्दिष्टाला धरून स्वत:ची मापनीय उद्दिष्ट ठेवल्याची नोंद केली आहे.
- मापनीय उद्दिष्टे: 2021 कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड हुरुन इंडिया इम्पॅक्ट 50मध्ये सर्वाधिक मापन झालेले उद्दिष्ट क्लायमेट अॅक्शन (हवामानविषयक कृती) हे होते. 37 कंपन्यांनी या उद्दिष्टाला धरून स्वत:ची कामगिरी मोजली. त्यापाठोपाठ रिस्पॉन्सिबल कंझम्प्शन अँड प्रोडक्शन (जबाबदार उपभोग आणि उत्पादन) या उद्दिष्टाला धरून 31 कंपन्यांनी आपल्या कामगिरीचे मापन केले. हिंदुस्तान युनिलिव्हरने सर्वाधिक आठ शाश्वत विकास उद्दिष्टांच्या आधारे आपल्या उद्दिष्टांचे मापन, कालबद्ध लक्ष्यांसह, केले. त्यापाठोपाठ ITC आणि टेक महिंद्रा यांचे क्रमांक लागतात. या दोन कंपन्यांनी सात मापनीय शाश्वत विकास उद्दिष्टांच्या निकषांवर आपल्या कामगिरीचे मापन केले आहे. रोचक बाब म्हणजे, या यादीतील तीन कंपन्यांनी कोणत्याही शाश्वत विकास उद्दिष्टाच्या निकषावर मापनीय उद्दिष्टाची नोंद केलेली नाही.
- पर्यावरणपूरकतेकडे वाटचाल; कार्बनयुक्त वायूंच्या शून्य उत्सर्जनाकडे जाण्याचा कालबद्ध प्रवास: 2021 कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड हुरुन इंडिया इम्पॅक्ट 50 यादीतील केवळ 29 कंपन्यांकडे कार्बन-न्युट्रॅलिटी साध्य करण्यासाठी कालबद्ध लक्ष्ये आहेत. ITC आणि इन्फोसिस या दोन कंपन्यांनी अनुक्रमे 2006 आणि 2020 या वर्षांत कार्बन न्युट्रॅलिटी साध्य केली आहे. सिपला आणि अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन या कंपन्यांनी 2025 सालापर्यंत कार्बन न्युट्रॅलिटी साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्तान झिंक आणि टेक महिंद्रा या कंपन्यांनी उत्सर्जन कमी करण्यासाठी अंतर्गत कार्बन धोरण अमलात आणले आहे.
- महत्त्वाचे भौगोलिक प्रदेश आणि उद्योग: 2021 कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड हुरुन इंडिया इम्पॅक्ट 50 यादीत भारतभरातील 13 शहरांमधील कंपन्या आहेत. यात मुंबईतील सर्वाधिक 27 कंपन्या आहेत, त्या पाठोपाठ नवी दिल्लीच्या चार कंपन्या आहेत. यादीत सर्वाधिक म्हणजे 8 कंपन्या वित्तीय सेवा क्षेत्रातील आहेत, त्या पाठोपाठ सॉफ्टवेअर आणि सर्व्हिसेस क्षेत्रातील 6 कंपन्या आहेत. 2021 कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड हुरुन इंडिया इम्पॅक्ट 50 यादीतील उत्पादन कंपन्यांचा सरासरी स्कोर 36 आहे, सेवा कंपन्यांनी सरासरी 34 स्कोर नोंदवला आहे.
कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडच्या सोशल इम्पॅक्ट अँड स्ट्रॅटेजी एग्झिक्युटिव जिनिशा शर्मा म्हणाल्या, “हा अहवाल, अधिकाधिक मोठ्या आणि छोट्या, कंपन्यांना, आपल्या व्यवसायातील कार्यांचा समाजावर व पर्यावरणावर किती व्यापक प्रभाव होऊ शकतो हे अधिक चांगल्या रितीने जाणून घेण्याचा प्रवास सुरू करण्यासाठी आव्हान देईल तसेच प्रेरणा देईल. केवळ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या पलीकडे जाऊन, संबंधितांना आणि संबंधितांखेरीज इतरांनाही फायदा मिळवून देण्यासाठी नवोन्मेषाने काम करणाऱ्या कंपन्यांसाठी, हे उत्तम समर्थन आहे. ही यादी केवळ प्रारंभबिंदू आहे आणि यात पुढील काही वर्षांत अधिकाधिक कंपन्या सहभाग घेतील अशी आशा आम्हाला वाटते.”

Anas Rahman Junaid, MD and Chief Researcher, Hurun India -File Photo GPN
अनस रहमान जुनैद, एमडी आणि प्रमुख संशोधक, हुरुन इंडिया म्हणाले: “2021 कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड हुरुन इंडिया इम्पॅक्ट 50 यादीच्या लक्ष्यस्थानी संयुक्त राष्ट्रांच्या 17 SDGsचे पालन करणारे कॉर्पोरेट क्षेत्रातील घटक आहेत. या कंपन्यांच्या कथांमधून आधुनिक भारतातील शाश्वत विकासाची कहाणी उलगडत जाते. भारतातील कंपन्या शाश्वतता उद्दिष्टांचे पद्धतशीर मापन करण्यासाठी तसेच नोंदवण्यासाठी रचनाविषयक अपडेट्सचा वापर करत आहेत. ही यादी अधिकाधिक कंपन्यांना त्यांची व्यवसाय कार्ये संयुक्तराष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी जोडून घेण्याची प्रेरणा मिळेल अशी आशा आम्हाला वाटते.”
2021 कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड हुरुन इंडिया इम्पॅक्ट 50 यादीतील पहिल्या 10 कंपन्या
2021 कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड हुरुन इंडिया इम्पॅक्ट 50 यादीतील पहिल्या 10 कंपन्यांनी प्राधान्य दिलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये जबाबदार उपभोग व उत्पादन सर्वात वर आहे, त्यापाठोपाठ शून्य उपासमार (झिरो हंगर) आणि लिंगसमानता (जेण्डर इक्वालिटी) यांचा समावेश होतो.
2021 कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड हुरुन इंडिया इम्पॅक्ट 50- पहिल्या 10 कंपन्या
क्रमवारी | कंपनी | स्कोर | हुरुन इंडिया 500 क्रमवारी | उद्योगक्षेत्र | योगदान देत असलेले आघाडीचे SDGs |
1 | ग्रासिम इंडस्ट्रीज | 47 | 39 | सिमेंट उत्पादने | झिरो हंगर, जेंडर इक्वालिटी, क्लायमेट अॅक्शन, रिस्पॉन्सिबल कंझम्प्शन अँड प्रोडक्शन |
2 | टेक महिंद्रा | 46 | 30 | सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस | इंडस्ट्री, इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर |
3 | टाटा पॉवर | 45 | 63 | वीज पुरवठा | क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन, अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, क्वालिटी एज्युकेशन |
3 | विप्रो | 45 | 10 | सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस | जेंडर इक्वालिटी, अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी |
5 | अंबुजा सिमेंट्स | 44 | गैरलागू | सिमेंट उत्पादने | सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज, क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन |
5 | हिंदुस्तान युनिलिव्हर | 44 | गैरलागू | व्यक्तिगत (पर्सनल) उत्पादने | रिस्पॉन्सिबल कंझम्प्शन अँड प्रोडक्शन |
7 | हिंडाल्को इंडस्ट्रीज | 43 | 42 | धातू व खाणकाम | अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी |
7 | टाटा स्टील | 43 | 29 | धातू व खाणकाम | क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन |
7 | इन्फोसिस | 43 | 4 | सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस | जेंडर इक्वालिटी |
10 | ITC | 42 | 14 | FMCG | झिरो हंगर |
10 | मेरिको | 42 | 61 | FMCG | रिस्पॉन्सिबल कंझम्प्शन अँड प्रोडक्शन |
स्रोत: हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूट, 2021 कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड हुरुन इंडिया इम्पॅक्ट 50
मापनीय आणि कालबद्ध लक्ष्ये
2021 कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड हुरुन इंडिया इम्पॅक्ट 50 यादीतील 94% कंपन्यांकडे किमान एका शाश्वत विकास उद्दिष्टासाठी मापनीय व कालबद्ध ध्येय होते. 2021 कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड हुरुन इंडिया इम्पॅक्ट 50 यादीतील 62% कंपन्यांकडे कार्बन न्युट्रॅलिटी साध्य करण्यासाठी कालबद्ध उद्दिष्टे आहेत.
सर्वाधिक मापनीय व कालबद्ध ध्येये असलेले मुद्दे
क्रमवारी | योगदान दिले जात असलेले SDG | कंपन्यांची संख्या | आघाडीचे योगदान देणारी उद्योगक्षेत्रे |
1 | क्लायमेट अॅक्शन (हवामानविषयक कृती) | 41 | सिमेंट उत्पादने, सॉफ्टवेअर आणि सर्व्हिसेस, धातू व खाणकाम आणि वित्तीय सेवा |
2 | रिस्पॉन्सिबल कंझम्प्शन अँड प्रोडक्शन (जबाबदार उपभोग आणि उत्पादन) | 31 | सिमेंट उत्पादने आणि धातू व खाणकाम |
3 | क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन (स्वच्छ पाणी आणि स्वच्छता) | 26 | सिमेंट उत्पादने, सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस, धातून आणि खाणकाम, औषध उत्पादन |
4 | अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी (परवडण्याजोगी व पर्यावरणपूरक ऊर्जा) | 18 | औषध उत्पादन, सॉफ्टवेअर आणि सर्व्हिसेस, पर्सनल उत्पादने |
4 | जेंडर इक्वालिटी (लिंग समानता) | 16 | सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस, धातू व खाणकाम, वित्तीय सेवा |
स्रोत: हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूट, 2021 कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड हुरुन इंडिया इम्पॅक्ट 50
सर्वाधिक मापनीय कालबद्ध लक्ष्ये ठेवणाऱ्या कंपन्या
क्रमवारी | SDG मध्ये योगदान देणारी कंपनी | SDG मुद्दयांची संख्या | उद्योगक्षेत्र |
1 | हिंदुस्तान युनिलिव्हर | 8 | व्यक्तिगत (पर्सनल) उत्पादने |
2 | टेक महिंद्रा | 7 | सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस |
2 | ITC | 7 | FMCG |
3 | टाटा पॉवर कंपनी | 6 | वीज पुरवठा |
3 | इन्फोसिस | 6 | सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस |
3 | अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन | 6 | मरिन पोर्ट अँड सर्व्हिसेस |
3 | गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स | 6 | व्यक्तिगत (पर्सनल) उत्पादने |
स्रोत: हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूट, 2021 कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड हुरुन इंडिया इम्पॅक्ट 50
पद्धत
2021 कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड हुरुन इंडिया लिमिटेड ही भारतातील आघाडीच्या 50 कंपन्यांची यादी आहे, या कंपन्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या 17 SDGsशी (शाश्वत विकास उद्दिष्टे) किती जोडून घेतले आहे, यावर त्यांना क्रमवारी देण्यात आली आहे.
हुरुन रिसर्चने 2021 हुरुन इंडिया 500 सर्वांत मौल्यवान कंपन्यांसोबत (2021 Hurun India 500 most valuable companies) या प्रक्रियेची सुरुवात केली. वित्तीय अहवाल, ESG, CSR, शाश्वतता अहवाल आणि प्रसारमाध्यमांतील बातम्या अशा सार्वजनिक स्तरावर उपलब्ध डेटाचा वापर करून एक स्कोरकार्ड तयार करण्यात आले. अनेक वेळा आम्ही थेट कंपन्यांशी संपर्कही केला.
17 UN SDGsपैकी प्रत्येकाला 5 पैकी गुण देण्यात आले, कालबद्ध मापनीय लक्ष्ये, सुधारणेचे दस्तावेजीकरण व CSRवरील अतिरिक्त खर्च यांसाठी कमाल 3 अतिरिक्त बोनस गुण देण्यात आले, एकूण 146 पैकी गुण देण्यात आले आणि त्यावरून 100 पैकी गुण काढण्यात आले.
प्रत्येक मुद्दयासाठी दिलेल्या स्कोरला अंतिम स्वरूप देण्यासाठी हुरुन रिसर्चने पुढील बाबींचे मूल्यमापन केले:
- व्यवसायाच्या पद्धतीत रुजवण्यात आलेले SDGs
- SDGsशी संबंधित विशिष्ट प्रकल्प
- SDGsशी संबंधित कामांसाठी केलेल्या गुंतवणुका/देणग्या
- SDGsशी संबंधित महत्त्वाचे कामगिरी निदर्शक प्रसिद्ध करणे
- शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कालबद्ध लक्ष्ये निश्चित करणे
- कालबद्ध लक्ष्यांमध्ये झालेल्या सुधारणांचे दस्तावेजीकरण
- वार्षिक अहवाल, ESG अहवाल, SDG अहवाल किंवा CSR अहवाल यांमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या विशिष्ट SDGशी संबंधित कीवर्ड्स
बोनस गुण: कंपनीच्या प्रमुख व्यावसायिक प्रारूपाचा SDG मुद्दयांच्या स्कोरवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम झाला. SDG 7 अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जीमध्ये (कमाल 2 गुण) नूतनीकरणीय ऊर्जा व्यवसायांसाठी बोनस गुण देण्याची तरतूद होती. SDG 6 क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन, SDG 12 सस्टेनेबल कंझम्प्शन अँड प्रोडक्शन (कमाल 1 गुण), SDG 13 क्लायमेट अॅक्शन (कमाल 1 गुण), SDG 14 लाइफ बिलो वॉटर आणि SDG 15 लाइफ ऑन लॅण्ड (कमाल 1 गुण) यांमध्ये प्रदूषकांसाठी गुण कापण्याची तरतूद होती (कमाल 1 गुण).
हुरुन SDG क्रमवारी: हुरुन रिसर्चने प्रत्येक कंपनीला SDG रेटिंग दिले: AAA 45गुण+; AA, 41-45गुण; A, 36-40गुण; BBB. 31-35गुण; BB, 26-30गुण; B, 21-25गुण.
व्यावसायिक ते शिक्षणतज्ज्ञांचा समावेश असलेल्या आमच्या पाच सदस्यांच्या विषय तज्ज्ञ समितीचे, हुरुन रिसर्च, विशेष आभार मानत आहे. आमच्या पद्धतीला आकार देण्यात या समितीची खूपच मदत झाली. पद्धतीची रचना करण्यात मदत पुरवणाऱ्या UNIDO टीमचेही हुरुन रिसर्च आभार मानत आहे.
Be the first to comment on "2021 कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड हुरुन इंडिया इम्पॅक्ट 50: भारतातील सर्वाधिक शाश्वत खासगी कंपन्यांचा शोध"