व्यावसायिक ईव्ही कंपनी, एका च्या वतीने पहिली इलेक्ट्रिक बस – एका E9 चे अनावरण

बसचे अनावरण महाराष्ट्र सरकारचे माननीय पर्यटन, पर्यावरण आणि प्रोटोकॉल मंत्री श्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. आणि त्यावेळी डॉ. सुधीर मेहता, अध्यक्ष, एका आणि पिनेकल इंडस्ट्रीज लिमिटेड. उपस्थित होते.

‘एका’च्या नवीन एनर्जी कमर्शियल वेहिकलकडून या वर्गवारीमधील वजनाने हलके आणि कमी दरात मालकीचे वाहन उपलब्ध

मुंबई, 2 एप्रिल 2022 (GPN): एका, ही एक इलेक्ट्रिक वाहन निर्मिती आणि तंत्रज्ञान कंपनी असून पिनाकल इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे, आज या कंपनीच्या वतीने नवीन 9 मीटर अस्सल इलेक्ट्रिक आणि घातक वायूंचे शून्य-उत्सर्जन करणारी बस ‘एका E9’ लॉन्च करण्यात आली. E9 ही एका ची पहिली बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक बस आहे. या बसचे डिझाईन नवीन पद्धतीच्या वाहन आरेखनानुसार असून तिची मोनोकॉक स्टेनलेस स्टील चेसीस आणि संपूर्ण कंपोझीट रचनेमुळे ती अधिकाधिक शक्तिशाली आणि अंतर कापणारी आहे. सध्या उपलब्ध असलेल्या इंटर्नल कॉम्ब्शन इंजिन बसच्या तुलनेत हिची मालकी किंमत कमी आहे, एका E9 सर्व सहयोगींच्या तुलनेत शाश्वत आणि नफा मिळवून देण्याचे वचन देते.

बसचे अनावरण श्री. आदित्य ठाकरे, माननीय पर्यटन, पर्यावरण आणि प्रोटोकॉल मंत्री, महाराष्ट्र सरकार आणि डॉ. सुधीर मेहता, चेअरमन,EKA आणि पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या शुभहस्ते द पुणे अल्टरनेट फ्युएल कॉंक्लेव्ह (एएफसी) या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), महाराष्ट्र प्रदूषणनियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आयोजित महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाद्वारे करण्यात आले.

E9च्या लॉन्चसह, जगभरातील शहरांमध्ये शाश्वत आणि कार्यतत्पर सार्वजनिक वाहतुकीकरिता मजबूत मंच उपलब्ध करून देण्यासाठी एका ग्राहकांसाठी विश्वासार्ह आणि नफेशीर कामकाज उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे. ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढताना एका चे E9 संपूर्ण इलेक्ट्रिक वाहन अभिनव पद्धतीचे आरेखन, यंत्रणा उपलब्ध करून देते. ते संपूर्णत: स्वदेशी बनावटीचे मेड इन इंडिया उत्पादन आहे. यामधील नाविन्यपूर्ण मोनोकॉक स्टेनलेसस्टील चेसीस सर्वोत्तम गंजमुक्त आयुष्य देते. हे वाहन कमी आवाज आणि कंपन देणारे आहे, तसेच वाहनाचे आरेखन अतिशय चांगले, ठोस आहे. सुरक्षा, नफा, उपयुक्तता, विश्वासार्हता आणि कामगिरी या घटकांवर उत्पादनाचा भर आहे.

एका E9 मध्ये ECAS सह फ्रंट आणि रियर एअर सस्पेन्शन देण्यात आले आहे. याचे एमएम रुंद,  31+D+व्हीलचेअर (व्हीलचेअर रॅम्पने सुसज्ज) प्रवाशांना बसण्यासाठी आणि उभे राहण्याकरिता पुरेशी जागा उपलब्ध करून देते. वाहनाच्या प्रवेश आणि निर्गमन मार्गावर असलेल्या पायऱ्या चढण्या-उतरण्याची सुविधा बघून तयार केल्या आहेत. तिची वैशिष्ट्ये परिपूर्ण असून 650 एमएमपर्यंत खाली असलेली उंची वयोवृद्ध, लहान मुलं, महिला आणि दिव्यांग प्रवाशांना लक्षात घेऊन तयार केलेली आहे. चालकाच्या कॉकपीटमधील अत्याधुनिक सुविधा, ऑटो-ड्राईव्ह वैशिष्ट्य, टील्टींगयुक्त पॉवर असिस्टन्स आणि टेलेस्कोपीक स्टेअरिंग तसेच एक सेंट्रल कन्सोल प्रवासी आणि चालकाला वाहनाचा सुरळीत अनुभव देतात.

आजवरचे सर्वात विचारपूर्वक तयार करण्यात आलेले व्यावसायिक वाहन, एका E9 ची पुढील रचना, स्टाईलिश वेव्हर साईड पॅनल आणि मोठ्या पॅनोरमिक व्ह्यू देणाऱ्या काचा तुम्हाला अधिक स्वागतशील आणि भविष्यवेधी देखणेपण देते. एका E9 इलेक्ट्रीक मोटरवर आधारित आहे, ज्यातून 200 केडब्ल्यूपर्यंतची सर्वाधिक शक्ति आणि 2500 एनएम टोर्क निर्माण करण्यात येतो. ज्यामुळे वाहनाला वेग मिळतो, अधिक अश्वशक्ति, मोठी ट्रॅक्शन पॉवर, उद्योगातील अग्रेसर विश्वासार्हता सोबतच 17% दर्जा कोणत्याही प्रदेशात कामगिरी बजावू शकते आणि ब्रेकिंग यंत्रणा काम करू शकते.

वाहनात देण्यात आलेली लि-आयॉन बॅटरी अत्याधुनिक रासायनिक क्षमता असलेली, शहरातील कार्यवहनाला उपयुक्त ठरते. ही बॅटरी यंत्रणा सुरक्षित, टिकाऊ आणि कार्यतत्पर आहे. एका E9 मधील वेहिकल कंट्रोल युनिट सॉफ्टवेअर इनहाऊस तयार करण्यात आलेले आहे, एकीकृत धोरण वाहन वैशिष्टय आहे.

इथे देण्यात आलेली वजनाने हलकी स्टील मोनोकॉक चेसीस, बसची महत्त्वपूर्ण रचनात्मक शक्ति आणि टिकाऊपणा, गंज-मुक्त एकत्रित बॉडी पॅनल पारंपरिक बसहून वेगळे ठरते. एका E9च्या सर्वोत्तम सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेकसह ईबीएस, सीसीएस2 प्रोटोकॉल फास्ट चार्जर, 4 कॅमेरे, आपतकालीन स्थितीत स्टॉप बटण, अग्निरोधक यंत्रणा, स्वयंचलित चालकसाह्य यंत्रणा (एडीएएस)चा समावेश आहे.

हिचे आरेखन गुरुत्वाकर्षणाचा खालचा मध्य गाठते, अधिक वेगात असताना स्थिरता प्रदान करतेच, शिवाय गर्दीत किंवा शहरातील वाहतूक कोंडीत सहज वळते.

लॉन्चप्रसंगी बोलताना एका आणि पिनाकल इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष डॉ सुधीर मेहता म्हणाले की, “व्यावसायिक वाहने, सार्वजनिक वाहतूक; प्रामुख्याने बस क्षेत्रात झालेले इलेक्ट्रीफिकेशन (विजेवर चालणारी) हे भारताच्या कार्बनमुक्त धोरणाच्या दृष्टीने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. आम्हाला पहिली इलेक्ट्रिक बस, एका E9 लॉन्च करताना उत्साह वाटतो आहे. त्यामुळे शहरांना शून्य कार्बन उत्सर्जन ध्येय गाठण्यासाठी बळ मिळेल. आमच्या बसची बांधणी आणि आरेखन हे प्रवासाचा सर्वोत्तम अनुभव, स्वच्छ पर्यावरण आणि ग्राहकांना चांगला परतावा मिळवून देण्याचे आहे. नाविन्यपूर्ण एका E9 सोबत, आम्ही जागतिक पटलावर स्वच्छ, कार्यतत्पर आणि नफा मिळवून देणारा पर्याय घेऊन आलो आहोत. जेणेकरून महत्त्वपूर्ण बाजारांमधील वाढत्या मागण्या गाठणे शक्य होईल, जे विजेवरील दळणवळण स्वीकारण्यास सज्ज आहे.”

एका ही भारतातील अग्रेसर वाहनविषयक बैठक (सिटींग), अंतर्गत सजावट (इंटेरियर) आणि विशेष प्रकारची वाहन (स्पेशियलिटी वेहिकल) निर्मिती करणाऱ्या पिनाकल इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे, तसेच भारत सरकारच्या ऑटो पीएलआय धोरणाच्या चॅम्पियन ओईएम स्कीम आणि ईव्ही कंपोनंट मॅन्यूफॅक्चरिंग स्कीम अंतर्गत संमत एकमेव व्यावसायिक वाहन निर्माता मानला जातो.

एका चे पुनर्रचित तत्वज्ञान आधारित आरेखन आणि इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन निर्मिती शेअरेबल टेक्नॉलॉजीला विकसीत करते आहे, ज्यामुळे वाहनाचा मालकी खर्च कमी होतो आणि सर्वोत्तम टीसीओ ईव्ही शाश्वत पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होणार आहे. एका चे आरेखन, निर्मिती आणि संपूर्णत: इलेक्ट्रिक वाहन श्रेणीचा पुरवठा, फ्युएल सेल इलेक्ट्रिक वेहिकल आणि पर्यायी इंधन वाहने उपलब्ध करून देईल. हा ब्रॅंड सुट्या भागांची बांधणी आणि निर्मितीसोबतच ईव्ही ट्रॅक्शन सिस्टीम, ईव्ही एनर्जी स्टोरेज सिस्टीम इत्यादीसह पुढे चालला आहे.Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "व्यावसायिक ईव्ही कंपनी, एका च्या वतीने पहिली इलेक्ट्रिक बस – एका E9 चे अनावरण"

Leave a comment

Your email address will not be published.


*