सर्वोत्तमपैकी एक आणि प्रतिष्ठित भारतीय लेखक अमिष त्रिपाठी हे ‘लीजंडस ऑफ द रामायणा विथ अमिष’ ह्या डिस्कव्हरी+ च्या अद्ययावत मालिकेमध्ये ह्या भारतीय महाकाव्याच्या प्रवासाचा लेखाजोखा मांडतील

Amish Tripathi and Megha Tata at the launch of Legends of The Ramayana

Amish Tripathi at the launch of Legends of The Ramayana

  • डिस्कव्हरी+ वर 7 एप्रिल रोजी सादर होणा-या ह्या ‘लीजंडस ऑफ द रामायणा विथ अमिष’ मालिकेमध्ये प्रसिध लेखक अमिष ओटीटीवर हॉस्ट व स्टोरीटेलर म्हणून पदार्पण करत आहेत.
  • ‘लीजंडस ऑफ द रामायणा विथ अमिष’ ह्याचे शूटिंग श्रीलंका, अयोध्या, नाशिक आणि हंपी अशा ठिकाणी झाले आहे आणि ते ह्या महाकाव्याशी संबंधित फारशा माहिती नसलेल्या गूढ गोष्टी समोर आणणार आहे.
  • अमिष त्रिपाठींनी ह्या मालिकेला ‘भावनिक आणि अध्यात्मिक अनुभव’ असे म्हंटले आहे.

मुंबई, 01 एप्रिल 2022 (GPN)– तुम्हांला माहिती आहे का श्रीरामांना एक मोठी बहीण होती? कैकेयीने श्रीरामांना 14 वर्षांच्याच वनवासासाठी का पाठवले? नाशिक शहराला ते नाव कसे मिळाले? श्रीराम आणि गौतम बुद्ध ह्यांना जोडणारा समान धागा तुम्हांला माहिती आहे का? अनेक शतकांपासून, रामायणाने भारतातील सर्वांत नावाजलेला ग्रंथ- इतिहास म्हणून मान्यता मिळवली आहे. संपूर्ण देशाच्या जनमानसाला त्याने आकार दिला आहे. परंतु, आपल्या संस्कृतीत इतके खोलवर रुजलेले असूनही, रामायणाबद्दल अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या लोकांना फार माहिती नाहीत. पवित्र राम नवमीच्या निमित्ताने डिस्कव्हरी+ लीजंडस ऑफ द रामायणा विथ अमिष मध्ये जगातील महानतम कथांपैकी एक असलेल्या ह्या कथेच्या पवित्र भौगोलिक वाटचालीला उजाळा देणार आहे. ही रोचक डॉक्युमेंटरी सर्वोत्तम लेखकांपैकी एक आणि डिप्लोमॅट अमिष त्रिपाठी ह्यांच्याद्वारे सांगितली जाईल. खिळवून ठेवणा-या दृश्यांची रेलचेल आणि विशिष्ट कहाण्यांसह ही मालिका वाईड अँगल फिल्म्सची प्रस्तुती आहे. डिस्कव्हरी+ वर 7 एप्रिल 2022 पासून सुरू होणा-या ह्या मालिकेमध्ये श्रीरामाच्या थरारक अयानाचे (वाटचालीचे) गूढ उलगडले गेले आहे.

पहिल्यांदाच अमिष त्रिपाठी डिजिटल जगतात येत असलेल्या ह्या थरारक तीन भागांच्या असाधारण मालिकेमध्ये 5000 किलोमीटर अंतरावरील प्रवासाचा समावेश आहे, रामायणाशी निगडीत प्राचीन कथा आणि कहाण्यांचा धांडोळा आहे जो आजवर घेतला गेला नव्हता. अतिशय अचूक मांडणीसह अमिष त्रिपाठी हजारो वर्षांपासून भारताला व जवळच्या देशांना प्रेरणा देणा-या, श्रद्धा, तत्त्वज्ञान व जीवनशैली देणा-या रामायणाभोवती असलेल्या रहस्यमय माहितीचे अन्वेषण करतील. शिवा त्रिमूर्ती आणि राम चंद्र मालिकेच्या लिखाणासाठी प्रसिद्ध असलेल्या व भारतीय प्रकाशन इतिहासामधील ह्या सर्वाधिक वेगाने व दुस-या क्रमांकावर सर्वाधिक विकल्या गेलेल्या पुस्तकांचे लेखक अमिष ह्यांची स्क्रीनवर कहाणी सांगतानाची उपस्थिती निश्चितच दर्शकांना खिळवून ठेवेल.

Legends of the Ramayana with Amish Tripathi Premieres on 7th April on discovery+

त्यांच्या ह्या प्रवासामध्ये यतींद्र मिश्र (अयोध्याचे राजपूत्र), कविता काणे (लेखिका), पुरस्कार विजेते जल- भूगोलशास्त्रज्ञ रितेश आर्या, सुनेला जयवर्देने (परावरण वास्तुविशारद व लेखिका), कृष्ण देवराया, विजयनगर साम्राज्याचे वंशज, शशी धनतुंगे, श्रीलंकन सिव्हिल एव्हिएशन ऑथोरिटीचे माजी अध्यक्ष आणि इतर अनेक त्यांच्यासोबत असतील जे ह्या मालिकेची विश्वसनीयता वाढवतील. भूगर्भशास्त्र, रिती- रिवाज आणि मान्यतांचा मागोवा घेताना अमिष भारत आणि श्रीलंकेतील मुख्य ठिकाणी प्रवास करतील आणि इतिहासाला जीवंत करून समृद्ध संस्कृती, सामाजिक विविधता व प्रत्येक ठिकाणी प्रचलित असलेल्या परिसरांना समोर ठेवतील. पुरस्कार विजेते प्रॉडक्शन हाऊस वाईड अँगल फिल्म्सची निर्मिती असलेली ही मालिका सुजाता कुलश्रेष्ठ आणि अभिमन्यु तिवारी ह्यांनी सह- दिग्दर्शित केली आहे.

अमिष ह्यांनी म्हंटले, रामायण प्रत्येक भारतीयाच्या गौरवाची बाब आहे, मग तो व्यक्ती कोणत्याही धर्माचा, जातीचा, भाषेचा किंवा लिंगाचा असेल. आम्ही ही डॉक्युमेंटरी शूट करत असताना ह्या सत्याची आणखी प्रचिती मला आली. इतक्या कमी माहिती असलेल्या अनेक कहाण्या आणि परंपरा आम्हांला सापडल्या व त्यातल्या काही तर खूपच धक्कादायक होत्या. डिस्कव्हरी आणि वाईड अँगल फिल्म्सच्या प्रतिभावान टीमसोबत प्रवास करणे, हा एक सन्मान होता. आणि आम्ही त्याच वाटेवर गेलो जिथे अनेक हजारो वर्षांपूर्वी आपले श्रीराम स्वत: चालत गेले होते. हे रुपांतर घडवणारे होते, मजेशीर होते आणि खरे वाटू नये असे असाधारण होते.

डिस्कव्हरी इन्क, साउथ एशिया मॅनेजिंग डायरेक्टर मेघा टाटा ह्यांनी म्हंटले, “ह्या रोमांचक कथा आणि संकल्पनांचा केंद्रबिंदू भारतीय पुराणे आहेत आणि तरीही ती मोठ्या प्रमाणात समोर न आलेली आहेत. सर्व कालखंडांमधील दर्शकांना रामायण आजही आकर्षित करते. ह्या महाकाव्यावर अनेक कलाकृती आल्या असल्या तरी, डिस्कव्हरी+ मध्ये आम्ही अधिक खोल जाण्याची संधी घेतली व कमी माहिती असलेल्या मनोरंजक गोष्टी आमच्या दर्शकांसाठी समोर आणण्याचे ठरवले. लीजंडस ऑफ द रामायणा विथ अमिषमध्ये पौराणिक कादंबरीच्या जगामध्ये आमचा प्रवेश झाला आहे व भारतीय भूगोलामध्ये असलेल्या आपल्या सांस्कॄतिक वारशाचा एक भाग विशेषज्ञांद्वारे पुनर्जीवित केला जात आहे.

त्यांनी पुढे म्हंटले, ह्या मालिकेच्या नेतृत्वासाठी आम्हांला अमिष त्रिपाठींव्यतिरिक्त आणखी उत्तम हॉस्ट मिळणे शक्य नव्हते. लेखक म्हणून त्यांची प्रचंड लोकप्रियता आणि पुराणशास्त्रातील त्यांचा असाधारण अनुभव ह्यामुळे ते ह्या मालिकेसाठी सर्वोत्तम ठरले. ह्या असाधारण साहसाच्या क्षेत्रात पदार्[अण करताना कहाण्या व स्पष्टीकरणासह असलेल्या त्यांच्या निवेदनामुळे ही मालिका निश्चितच उत्कृष्ट बनली आहे.

ह्या विशेष कलाकृतीच्या भव्यतेचा आदर राखताना, ही मालिका एफपीव्ही ड्रोणसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानासह सादर केली जात आहे. अनेक पिढ्यांसाठी नव्याने सांगितली जाणारी ही खोलवर शोधून मांडलेली कहाणी आधी क्वचितच माहिती असलेल्या रंजक बाबी समोर आणेल.

श्रीराम आणि देवी सीता ह्यांच्या पौराणिक जगामध्ये प्रवेश करून ह्या असामान्य संस्कृत महाकाव्यातील कधी न ऐकलेल्या कहाण्यांचा शोध घेण्यासाठी 07 एप्रिलपासून फक्त डिस्कव्हरी+ स्ट्रीम करा.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "सर्वोत्तमपैकी एक आणि प्रतिष्ठित भारतीय लेखक अमिष त्रिपाठी हे ‘लीजंडस ऑफ द रामायणा विथ अमिष’ ह्या डिस्कव्हरी+ च्या अद्ययावत मालिकेमध्ये ह्या भारतीय महाकाव्याच्या प्रवासाचा लेखाजोखा मांडतील"

Leave a comment

Your email address will not be published.


*