
Learning Links Foundation, in collaboration with Mastercard, organized a Grant and Certificate Distribution Ceremony for the Mastercard WE & Tech program in IMC, Churchgate, Mumbai

Similar Event Photo

(Similar Event Photo)Learning Links Foundation, in collaboration with Mastercard, organized a Grant and Certificate Distribution Ceremony for the Mastercard WE & Tech program in Vadodara, Gujarat
Mumbai, 29 March, 2022 (GPN): ठीकान:- वालचंद् हिराचंद सभाग्रुह, IMC इमारत, ४ मजला, IMC मार्ग, चर्चगेट, मुंबई ४०००२०,
वेळ:- दुपारी २.०० वाजता.
लर्निग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टर कार्ड यांच्या संयुक्तविद्यमाने महिला उद्योजकता आणि तंत्रज्ञान (WE and TECH) हा कार्यक्रम विना मोबदला मुंबई (MMRDA) या कार्यक्षेत्रामध्ये राबविन्यात आला होता. या कार्यक्रमा अंतर्गत सर्व महिलांना ५ दिवसाचे वित्तीय साक्षरता, डिजिटल व्यवसाय आणि महिला उद्योजकता , व्यवसाय योजना ( BUSINISS PLAN) असे प्रशिक्षण देण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमा अंतर्गत मुंबई , ठाणे आणि नवी मुंबई विभागातून लर्निग लिंक्स फोंडेशन च्या संपूर्ण मुंबई टीमने १,१८४ पेक्षा अधिक महिलांना प्रशिक्षण दिले आहे. त्याच्यातील ५८० महिलांनी आप आपले बिझिनेस प्लान जमा केले होते. तसेच लेर्निंग लिंक्स फाउंडेशन ने महिलांना उद्योजक बनवण्यासाठी उद्यम आधार कार्ड, FSSAI लायसेन्स, बँक लिंकेज लोन प्रोसेस, डिजिटल माध्यमा तुन बिझनेस करण्यासाठी मदत देखील करीत आहे.
महिला उद्योजकता आणि तंत्रज्ञान (WE and TECH) या कार्यक्रमा मधील निवडक अशा १५० महिलांना आर्थिक साहाय्य म्हणून रुपये ५,०००/-( Non Refundable Amount) देण्यात आले आहे. हे आर्थिक साहाय्य महिलाना त्यांच्या उद्योगाला अधिक चालना देण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे ,तसेच प्रशिक्षण झालेल्या काही महिलांना लर्निग लिंक्स फाउंडेशन मार्फत प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम देखिल करण्यात आले आहे. हा कार्यक्रम संपूर्ण (MMRDA) कार्यक्षेत्रा मधील महिलाना नवीन टेक्नोलॉजीशी अवगत करण्यासाठी देखिल महत्वाचे ठरणार आहे.

Learning Links Foundation Brand Logo
वरील कार्यक्रम दिनांक, २९ मार्च २०२२ रोजी लर्निग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टर कार्ड यांच्या मार्फत वालचंद् हिराचंद सभाग्रुह, IMC इमारत, ४ मजला, IMC मार्ग, चर्चगेट, मुंबई ४०००२०,वेळ:- दुपारी २.०० वाजता आयोजित करण्यात आला होता.
या अनुदान वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री सुभाष देसाई , उद्द्योगमंत्री महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते .तसेच या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून माननीय श्रीमती ज्योतीताई ठाकरे , अध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जा)-महिला आर्थिक विकास महामंडळ , श्री रोहिदास दोरकुलकर (उपसंचालक – राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान ,महाराष्ट्र) श्री प्रसाद राजे भोसले (SMID-राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान ,महाराष्ट्र ),श्री पांडुरंग सपकाळ (दक्षिण मुंबई विभागीय प्रमुख ,शिवसेना ) आणि श्री मोहम्मद आमिर एजाज ( व्यवस्थापकीय सल्लागार – लर्निंग लिंक्स फौंडेशन ,दिल्ली ) व इतर मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानाचे मुंबई,ठाणे व उल्हासनगर चे जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते .
माननीय प्रमुख अतिथी श्री . सुभाष देसाई यांनी (उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य ) आपल्या मार्गदर्शना मध्ये महिलांचे आणि लर्निंग लिंक्स फॉउंडेशन तसेच मास्टरकार्ड यांचे अभिनंदन केले व महिलांना संबोधनमध्ये असे म्हणाले कि एक छोटी उदयोगिनी उद्याची उदोगपती होऊ शकते ही आजच्या महिलांना मध्ये शक्ति आहे.
माननीय विशेष अतिथी श्रीमती ज्योतीताई ठाकरे (अध्यक्ष. महिला आर्थिक विकास महामंडळ) यांनी आपल्या भाषणांमध्ये बचत गटातील महिलांन करीता असणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली व महिलांना त्याचा लाभ घेण्यास प्रोसाहित केले तसेच त्यांनी लर्निंग लिंक्स फौंडेशन व मास्टरकार्ड यांचे विशेष आभार मानले .
माननीय श्री मोहमद आमिर एजाज (व्यवस्थापकीय सल्लागार – लर्निंग लिंक्स फौंडेशन , दिल्ली ) यांनी लर्निंग लिंक्स फौंडेशन यांच्या कार्यबदल व WE & TECH प्रोग्राम बदल माहिती दिली महिलांना त्यांचा भावी उद्योगासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
तसेच या कार्यकमाला यशस्वी करण्यासाटी चंद्रकांत अहिरे ( प्रमुख सल्लागार- मुंबई ,लर्निंग लिंक्स फौंडेशन ) व त्यांचे सहकारी सचिन सूर्यवंशी व कपिल गवळे याचे महत्वाचे योगदान होते.
या कार्य्रक्रमाचे आभार प्रद्रशन श्री चंद्रकांत अहिरे यांनी केले.
Be the first to comment on "लर्निग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टर कार्ड यांच्या संयुक्तविद्यमाने १५० महिलांना आर्थिक साहाय्य म्हणून रुपये ५,०००/-( Non Refundable Amount) वाटप"