
Sudhir Mehta, Chairman & Managing Director, Pinnacle Industries Limited – File Photo GPN
कंपनीद्वारे अद्यावत ईव्ही कंपोनट्सची (सुटे भाग) श्रेणी आणि क्षमतांचे ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनद्वारे (एसीएमए) 23 आणि 24 मार्च 2022 रोजी इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्ट, ग्रेटर नॉयडा येथे आयोजित केल्या जाणार असलेल्या ईव्हीज : ट्रान्सफॉर्मिंग मोबिलिटी समिट अँड एक्स्पोमध्ये प्रदर्शन करणार
मुंबई, 23 मार्च, 2022 (GPN): भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणखी व्यवहार्य करण्यासाठी पिनॅकल इंडस्ट्रीज या भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह इंटेरियर, सिटींग सिस्टीम्स व स्पेशॅलिटी व्हिईकल्स क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने 2 आणि 3 चाकी वाहनांसाठी इलेक्ट्रिकल वाहनासाठीच्या सुट्या भागांची श्रेणी तयार केली आहे. डिझाइन, विकास क्षेत्रातील अनुभव तसेच जुळणी आणि पितमपूर व पुण्यातील इलेक्ट्रिक मोबिलिटी अप्लिकेशन्ससाठीच्या घटकांची उत्पादन क्षमता यांच्या मदतीने पिनॅकल इंडस्ट्रीजने इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करणारे खास ठिकाण बनण्याचे ध्येय ठेवले आहे.
उद्योग क्षेत्रातील आघाडीची वाहनांसाठी सुटे भाग आणि जागतिक प्रतिष्ठा असलेली स्पेशल अप्लिकेशन वाहन बनवणारी कंपनी या नात्याने पिनॅकल इंडस्ट्रीज आपल्या अनोख्या क्षमतांच्या मदतीने इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणारे घटक अचूकतेसह बनवणार असून त्यामध्ये शीट मेटल आणि ट्युबलर पाइप कंपोनंट्स, बॉडी पार्ट्स, सीट्स आणि जगभरातील प्रमुख ब्रँड्ससाठीचे आयएसओ/टीएस 16949, आयएसओ 14001, ओएचएसएएस 18001 द्वारे प्रमाणित 2W/3W साठीचे बॅटरी पॅक्स यांचा समावेश आहे.
व्यावसायिक वाहनांसाठी ऑटोमोटिव्ह इंटेरियर्स आणि सीटिंग सिस्टीम्सच्या उत्पादन क्षेत्रातील अनुभव व कौशल्य, भारतातील बहुतेक सर्व प्रमुख व्यावसायिक वाहन ब्रँड्सना केला जाणारा पुरवठा यांच्यासह पिनॅकल इंडस्ट्रीजने जागतिक स्तरावर डिझाइन, विकास आणि ईव्ही कंपोनंट्सचा पुरवठा क्षेत्रात आघाडीचे स्थान मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे. डिझाइन आणि उत्पादन क्षेत्रातील पिनॅकलच्या कौशल्यामुळे तांत्रिक, व्यावसायिक आणि उत्पादन दृष्टीकोनातून सर्वोत्तम मॉड्युलर सोल्यूश्स बनवणे शक्य होते तसेच डिझाइन्सची पुनरावृत्ती होण्याची जोखीम कमी करता येते व विकासाचा वेळही कमी होतो.
या अद्यावत घडामोडीविषयी पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या विक्री आणि व्यवसाय विकास विभागाचे प्रमुख श्री. भरत प्रीतमानी म्हणाले, ‘ईव्ही यंत्रणा वेगाने उभारली जात असून देशभरातील 2W आणि 3W उत्पादक तसेच प्रमुख ओईएम्स या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विस्तार करत आहेत. भारत ही जगातील सर्वात मोठी 2W आणि 3W बाजारपेठ आहे आणि या क्षेत्रात ईव्ही वापरात लक्षणीय वाढ होणार असल्याचा आमचा अंदाज आहे. त्याशिवाय या क्षेत्राच्या विकासाला हातभार लावू शकणारे सुटे भाग आणि बॅटरी जुळणी भागांच्या स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. 2030 पर्यंत दुचाकी व तीनचाकी क्षएत्रात 80 टक्क्यांपर्यंत ईव्हीचा अवलंब केला जाण्याचे भारताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सुसंगत आहोत. आमच्या डिझाइन, उत्पादन आणि पुरवठा साखळी क्षमता लक्षात घेता या बाबतीत यशस्वी होण्यासाठी कंपनी सज्ज आहे.’
पिनॅकल इंडस्ट्रीजकडे 5 धोरणात्मकदृष्ट्या स्थित, अद्यावत कारखाने आणि या क्षेत्रातील आघाडीची बॅटरी पॅक जुळणी सुविधा आहे. कंपनीच्या क्षमतांमध्ये डिझाइन, रिव्हर्स इंजिनियरिंग टुल डिझाइन आणि विकास, उत्पादन व रॅम्प अप यांचा समावेश आहे. आउटसोर्स्ड कंपोनंट उत्पादन आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठीची बॅटरी जुळणी क्षेत्रातील महत्त्वाचे ठिकाण बनण्यासाठी पिनॅकल इंडस्ट्री सज्ज असून त्यासाठी इंजिनियरिंग, डिझाइन, तंत्रज्ञान, उत्पादन आणि दमदार पुरवठा साखळी यांचा योग्य वापर केला जाणार आहे.
पिनॅकल इंडस्ट्रीजने एका ही वाहन आणि तंत्रज्ञान कंपनीही लाँच केली असून त्याद्वारे किफायतशीर आणि कार्यक्षम इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहने आणि सुविधांचे उत्पादन करून ईव्हीचा मोठ्या प्रमाणावर अवलंब होण्यासाठी चालना दिली जाईल. एका ही पिनॅकल इंडस्ट्रीजची उपकंपनी असून भारताच्या ऑटो पीएलआय योजनेतील मान्यताप्राप्त अर्जदारांपैकी एक आहे.Ends
Be the first to comment on "पिनॅकल इंडस्ट्रीजचा ईव्ही कंपोनंट्स व्यवसायात प्रवेश"