
Akshay Kumar

IUW Poster: India’s Ultimate Warrior, premiering on discovery+ on March 04 at 6 AM

Vidyut Jammwal from india’s Ultimate Warrior
- विद्युत जमवाल होस्ट असलेल्या इंडियाज अल्टीमेट वॉरियरला 4 मार्च रोजी डिस्कव्हरी+वर सादर केले जाईल व त्यानंतर 14 मार्च रोजी ते डिस्कव्हरी चॅनलवर सादर केले जाईल; मानद दोजो मास्टर म्हणून अक्षय कुमारचा विशेष भाग 11 मार्च रोजी डिस्कव्हरी+ वर आणि 16 मार्च रोजी डिस्कव्हरी चॅनलवर सादर केला जाईल
- अथलीट, पोलिस, मार्शल आर्टिस्ट, जलतरणपटू, पहिलवान, मार्केटिंग व इतर अशा विविध पार्श्वभूमी व व्यावसायिक क्षमतांच्या 16 स्पर्धकांना ह्या 6 भागांच्या मालिकेमध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले बघता येईल व त्यातून भारतातील सर्वोत्तम योद्धा समोर येईल.
- अनेक दशकांपासून मुआय थाई, मुष्टीयुद्ध, शस्त्रयुद्ध (वेपनरी), एकिदो, ज्युदो, शाओलिन, कुंफू व इतर प्रकारांवर प्रभूत्व असलेल्याशिफू कनिष्का शर्मा, बी ‘किलरबी’ ग्युएन, शॉन कोबेर आणि मायकेल हॉके अशा लढाईच्या पद्धतींमधील दिग्गजांकडून ह्या स्पर्धकांना प्रशिक्षण दिले जाईल.
मुंबई, मार्च 2022: एकाग्रता, नियंत्रण, निर्धार, संतुलन, शिस्त – हे गुण ख-या योद्ध्याला घडवत असतात! एक देश म्हणून भारतामध्ये देशाच्या प्रतिष्ठेसाठी लढलेल्या नि:स्वार्थी योद्ध्यांच्या अगणित मालिकेचा वारसा आहे. खरेखुरे योद्धे आणि भारतातील प्राचीन लढाऊ प्रकारांच्या परंपरेला वंदन करतानाडिस्कव्हरी नेटवर्क अशा प्रकारचा पहिलाच रिअलिटी शो आणण्यास सज्ज झाले आहे व त्याचे नाव इंडियाज अल्टीमेट वॉरीयर आहे व 4 मार्च रोजी सकाळी 6 वाजता तो डिस्कव्हरी+ वर सादर केला जाईल आणि त्या शोच्या ब्रॉडकास्टला 14 मार्च रोजी रात्री 8 वाजता डिस्कव्हरी चॅनल, डिस्कव्हरी एचडी, डिस्कव्हरी तमिल, एनिमल प्लॅनेट, एनिमल प्लॅनेट एचडी, टीएलसी, टीएलसी एचडी, डिस्कव्हरी आयडी, डिस्कव्हरी आयडी एचडी, डिस्कव्हरी सायंस, डिस्कव्हरी टर्बो आणि युरोस्पोर्ट ह्या 12 डिस्कव्हरी चॅनल्सवर प्रसारित केले जाईल.
भारतातील आघाडीचा एक्शन सुपरस्टार आणि टॉप मार्शल आर्टिस्टसपैकी एक असलेल्या विद्युत जमवालद्वारे हा शो होस्ट केला जाईल व दोजो मास्टर म्हणून तो पदार्पण करेल. ह्या शोमध्ये ओजी खिलाडी अक्षय कुमार हा मानद दोजो मास्टर म्हणून तिस-या स्पेशल एपिसोडमध्ये सहभागी होईल व हा तिसरा भाग डिस्कव्हरी+ वर 11 मार्च रोजी तर डिस्कव्हरी चॅनलवर 16 मार्च रोजी प्रसारित केला जाईल.
भारताला आपला नवीन ‘महायोद्धा’ देण्यासाठी, बेस फिल्म्सद्वारे निर्मित ह्या मालिकेमध्ये दोजो मास्टर विद्युत प्रशिक्षकांसह ‘लढाई शिबिराचे’ आयोजन करेल. त्यामध्ये हे असतील- शिफू कनिष्का ज्याने मार्शल आर्टसबद्दल असलेल्या प्रेमामधून स्वत:च्या शैलीतील क्राफ्ट- शिफू कनिष्का काँबॅटीव्हज बनवली आहे; शॉन कोबेर हा ऑस्ट्रेलियन सेनेमध्ये सेवा देणारा माजी रग्बी खेळाडू आहे; बी ग्युएन म्हणजेच किलर बी आहे जी मुआय थायी ह्या जगातील मार्शल आर्टसच्या सर्वांत कठीण प्रकारामधील विशेषज्ञ आहे आणिमायकेल हॉक हा अमेरिकन सेनेच्या विशेष दळातील माजी अधिकारी आहे. प्रत्येक प्रशिक्षक 4 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करेल व प्रशिक्षण देईल व अंतिम विजेता बनण्यामध्ये असलेल्या अतिशय खडतर आव्हानांना सामोरे जाऊन ते दिलेल्या कामांना पूर्ण करतील.
पोलिस अधिकारी, पहिलवान, पुरातत्त्वशास्त्रज्ञ, कॉरपोरेट व्यावसायिक, तायक्वोंदो अथलीट आणि मुष्टीयोद्धा असे इंडियाज अल्टीमेट वॉरियरमधील विविध पार्श्वभूमीचे स्पर्धक उत्तम प्रकारे बनवलेल्या अनेक आव्हानांमधून आणि खडतर प्रशिक्षणामधून पुढे जातील. 6 भागांमध्ये, ह्या हरहुन्नरी आणि कुशल स्पर्धकांची झुंज सुरीने लढणे, कुस्ती, इपिक सुमो क्लॅश, अकी किती किक लढाई, दोरीवर चढून लढणे, वॉटर गाँटलेट व इतर प्रकारांमध्ये त्यांच्या क्षमतेच्या मर्यादांपर्यंत बघायला मिळेल. त्यांची शक्ती, वेग, स्टॅमिना किंवा लढण्याचे कौशल्य ह्यासह केवळ शारीरिक पातळीवर नाही, तर योद्ध्याच्या मानसिक पैलूंवरील प्रभूत्व जसे धोरणात्मक डावपेच, सन्मान, दृढता व जुळवून घेण्याची क्षमता अशा बाबींमध्येही त्यांची कसोटी पार पडेल.
ह्या शोसाठी दोजो मास्टर बनल्याबद्दल विद्युत जमवाल ह्याने म्हंटले,“दोजो मास्टर म्हणून होस्टचे काम करणे माझ्यासाठी समृद्ध करणारे होते, कारण मी हा विषय जगलो आहे. जेव्हा मी पहिल्यांदा प्रशिक्षण सुरू केले, तेव्हा शारीरिक कृत्ये करण्यासाठी आवश्यक असलेल्या मानसिक समार्थ्याची गरज असलेल्या विशिष्ट अडथळ्यांच्या मालिकांमध्ये विद्यार्थ्यांना ठेवणे, ही कल्पना होती. अशी ही एक वेगळ्या प्रकारची अभिनव संकल्पना व्यवस्थित संशोधन केलेल्या व व्यापक अशा आव्हानांशी जोडली गेली ज्यामध्ये कालारीपायात्तु ते क्रेव मागा अशांचा समावेश आहे व त्यासह हा शो भारतातील रिअलिटी प्रकारामध्ये कधीही न बघितला गेलेला व कधीही न ऐकण्यात आलेला अशा प्रकारचा ठरणार आहे.”
“जेव्हा मी मार्शल आर्टसचा सराव सुरू केला, तेव्हा माझे वय 9 होते आणि आज मी जो काही आहे, त्याचे पूर्ण श्रेय ह्या कला प्रकाराला जाते. जेव्हा लढाऊ पद्धतींचा समावेश असलेल्या इंडियाज अल्टीमेट वॉरियरचा एक गेस्ट म्हणून भाग बनण्याविषयी डिस्कव्हरी+ ने मला विचारले, तेव्हा मला त्याचा खूप आनंद झाला. त्याचा हेतु आणि विश्वसनीयतेसाठी इंडियाज अल्टीमेट वॉरीयर हे रिअलिटी जेनरमध्ये सर्वोत्तम आहे आणि मला खात्री आहे की, ह्या मालिकेला सुरुवातीपासूनच दर्शकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया मिळतील,”असे स्पेशल गेस्ट म्हणून ह्या शोचा भाग असलेल्या अक्षय कुमारने म्हंटले.“
ह्या शोच्या शुभारंभाबद्दल बोलताना, साउथ- एशिया मॅनेजिंग डायरेक्टर, डिस्कव्हरी इन्कच्या मेघा टाटा ह्यांनी म्हंटले, “ह्या मालिकेमध्ये आमचे प्राथमिक उद्दिष्ट भारतातील रिअलिटी कंटेंटच्या प्रकारामध्ये खळबळ होईल अशी लाट आणणे व असा विश्वसनीय शो आणणे जो भारताच्या मानसिकतेमध्ये प्राचीन काळापासून समाविष्ट असलेल्या योद्ध्याच्या ख-या गुणांना उजेडात आणेल, हे आहे. ह्या विशिष्ट फॉरमॅट आणि निर्मितीच्या पातळीसह, इंडियाज अल्टीमेट वॉरीयर एक पूर्वग्रह तोडणारे ठरेल आणि रिअलिटी जेनरमध्ये नवीन मापदंड स्थापित करेल. आम्हांला आशा आहे की, मार्शल आर्टसमधील दिग्गज विद्युत जमवालच्या शक्तीचा वापर करून व एक्शनच्या बाबतीतला सर्वांत मोठा सुपरस्टार अक्षय कुमारच्या विशेष उपस्थितीसह ह्या शोमध्ये असाधारण मनोरंजन मिळेल व आमच्या दर्शकांना खूप वेगळे बघण्याचा अनुभव मिळेल”.
इंडियाज अल्टीमेट वॉरीयरने आघाडीच्या जाहिरातदारांना आपल्याकडे आकर्षित केले आहे, पॉलिसीबझार.कॉम आणि थम्स अप हे को- पॉवर्ड प्रायोजक आहेत तर ह्या शो साठी स्पॉटीफाय पार्टनर्ड प्रायोजक आहे.
इंडियाज अल्टीमेट वॉरीयर प्रशिक्षकांचे तपशील:
- शिफू कनिष्क (43) – बॉलीवूडमधील एक्शन कोरिओग्राफर शिफू कनिष्काचे केवळ सातव्या वर्षी मार्शल आर्टसवर प्रेम बसले होते, परंतु नंतर ते त्याचे पॅशन बनेल, ह्याची जाणीव मात्र त्याला नव्हती. विविध मार्शल आर्टसमध्ये प्रशिक्षण घेण्यामध्ये त्याने आयुष्याची 32 वर्षे व्यतित केली आणि सिफू कनिष्क कंबॅटीव्हज ही स्वत:ची प्रणाली बनवली. चीनमधील प्रसिद्ध शेओलिन मंदिरातून “शिफू” ही पदवी मिळवणारा तो एकमेव भारतीय आहे व लॉ एन्फोर्समेंट मिलिटरी अँड स्पेशल फोर्सेसमध्ये काली टॅक्टीकल काँबॅट सिस्टीमचा परिचय करून देणारा पहिला भारतीय आहे. पेकितीरिसा काली ही अतिशय कठोर लढाईची प्रणाली देशामध्ये आणणारा तो पहिला भारतीय आहे.
- शॉन कोबेर (35)- ऑस्ट्रेलियाचा रहिवासी शॉन एक रग्बी खेळाडू आहे व संरक्षण दलाच्या विश्वचषकामध्ये त्याने त्याच्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियातील दोन राज्यांचे नेतृत्व केले आहे. वयाच्या 20 व्या वर्षी ऑस्ट्रेलियन सेनेमध्ये त्याचा समावेश झाला होता व इराक, पूर्व तिमोर आणि अफघनिस्तानमध्ये त्याने तीन नियुक्त्यांमध्ये काम केले. अगदी अलीकडेच थायलंडमधील लढाऊ कौशल्यावर आधारित प्रशिक्षण शिबिरात त्याची नियुक्ती झाली आहे व तो योद्ध्यांना सक्रियपणे प्रशिक्षण देत आहे.
- बी ग्युएन अर्थात् किलर बी (31)– किलर बी अमेरिकेतील टेक्सासची आहे व तिला मुआय थाई ह्या अतिशय कठीण अशा मार्शल आर्टस प्रकारामध्ये प्रशिक्षण मिळालेले आहे. ह्या प्रकारामध्ये मुठी, कोपर, गुडघे व नडगी वापरून किकबॉक्सिंग केले जाते. 2012 मध्ये तिने पहिला आत्म संरक्षणाचा वर्ग घेतला आणि दीर्घकाळ शोषण झालेल्या नात्यानंतर स्वत:च्या जीवनाचा ताबा घेतला. ती हेव्हीवेट चँप लू सॅवार्सेच्या जीममध्येही प्रशिक्षण देते.
- मायकेल हॉक (55) – हॉक हा माजी अमेरिकन सेनेतील विशेष दळ अधिकारी, लेखक व टिव्हीवरील प्रस्तुतकर्ता आहे. त्याला एकिदो आणि ज्युदोमध्ये ब्लॅक बेल्टस मिळाले आहेत आणि त्याने रिजर्वजमध्ये एकूण 12 वर्षे सक्रिय सेवा केलेली आहे व आणखी 12 वर्षे गार्डस म्हणून सेवा केलेली आहे. तो एक लढाईमधील दिग्गज आहे व सुचीबद्ध सैनिक आहे आणि त्याने युद्धाने ग्रासलेल्या आफ्रिकेमध्ये बंडखोरांशी झुंज दिली होती आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेला प्रशिक्षण दिले होते. कोलंबियामधील मादक पदार्थांच्या विरोधातील लढाईमध्ये त्याने लढाऊ झडती आणि बचाव अभियान राबवले होते.
स्पर्धक:
- अभिषेक मिश्रा– भारतीय अल्ट्रा प्रकारातील खेळाडू व आयरनमॅन ट्रायएथलीट 4 वेळेस राहिलेला अभिषेक हा एक प्रस्थापित मोटीव्हेशनल स्पीकर आहे व त्याने टीसीएस, डिओलेट, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक इ. कॉरपोरेटससोबत जवळून काम केलेले आहे. ‘रन टू रिअलाईझ’ हे पुस्तकही त्याने 2018 मध्ये प्रकाशित केले आहे व त्यामध्ये त्याने सर्व जगभरातील विविध कार्यक्रमांमधील त्याच्या सहभागाचे अनुभव सांगितले आहेत.
- दीपक दत्तात्रेय माळी– दीपकने विविध मार्शल आर्टस प्रकारांमध्ये प्रशिक्षण घेतले आहे व बो- स्टाफ (पारंपारिक आणि एक्स्ट्रीम), नान- चुक, तलवार आणि बंदुक अशा शस्त्र लढायांमध्ये त्याचे प्रभूत्व आहे. त्याला कुक्कीवॉनच्या तायक्वोंदो मार्शल आर्टसमध्ये (जागतिक तायक्वोंदो मुख्यालयामध्ये) पहिल्या क्रमांकाचा ब्लॅक बेल्ट मिळालेला आहे. त्याच्या सरावाच्या वर्षांमध्ये त्याने मायओड टीम उभी केली होती, तो मुंबई पार्करचा भाग राहिला आहे व त्यासह मूव्हमेंट एकेडमीमध्येही सहभागी आहे. भारतीय चित्रपट उद्योगामध्ये त्याचे प्रदीर्घ व उल्लेखनीय असे स्टंट करीअर राहिलेले आहे.
- दीपक शर्मा– दीपक शर्मा पोलिस अधिकारी असून सध्या तिहार जेलमध्ये सहाय्यक पोलिस सुपरइंटेंडंट म्हणून कार्यरत आहे. 2014 पासून तो फिटनेस क्षेत्रात आहे व त्याने भारतातील पोलिसांच्या साच्याला तोडण्यासाठी सक्रिय प्रकारे ते हाती घेतले होते. भारत सरकारची मान्यता असलेल्या दिल्ली तांत्रिक विद्यापीठाने त्याला 2019 मध्ये स्वाभिमान खेल रत्न पुरस्कार दिला होता. मीडियामध्ये व त्याच्या कामाच्या क्षेत्रामध्ये अतिशय प्रभावी असलेला दीपक होतकरू अभिनेता आणि मॉडेलसुद्धा आहे, परंतु त्याला देशाची त्याची सेवा ही त्याची सर्वोच्च प्राथमिकता वाटते.
- दीपक राव– दीपक हा स्ट्राँगमॅन गेम्स इंडिया असोशिएशनचा अध्यक्ष, वर्ल्ड डेडलिफ्ट काउंसिलचा आशियातील अध्यक्ष, प्रोफेशनल स्ट्राँगमॅन एकेडमीचा मालक आणि एका जिमचा मालक आहे. भारतामध्ये त्याने स्ट्राँगगेम्सला पुन: सुरुवात केली, हे तो अभिमानाने सांगतो. त्याच्या काही उपलब्धी अशा आहेत- स्ट्राँगमॅन ऑफ इंडिया (2015-2018), स्ट्राँगमॅन ऑफ एशिया (2017, भारत), वर्ल्ड्स स्ट्राँगेस्ट मॅन, आठवे स्थान (2018, फिनलँड), वर्ल्ड स्ट्राँगेस्ट मॅन, चौथे स्थान (2018, भारत), वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग युनियन 2017 (90 किलो प्रकारात सुवर्ण) आणि वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग युनियन 2017 (डेडलिफ्ट रेकॉर्ड होल्डर)
- दिनेश शेट्टी– दिनेश शेट्टी हा एक सिरियल उद्योजक आहे- तो एक मुष्टीयोद्धा आहे, त्याचा स्वत:चा घोड्यांचा तबेला आहे व तो एक संस्थाही चालवतो. त्याच्या फिटनेस प्रवासाची सुरुवात 10 वर्षांपूर्वी झाली जेव्हा बिग 92.7 FM सोबत काम करताना त्याने 100 किलो वजन उचलले. दिनेशच्या व्यायामाच्या दिनक्रमामध्ये मुष्टीयुद्ध, क्रॉसफिट (टायगर मुआय थायीमध्ये प्रशिक्षित), वेट ट्रेनिंग़ व घोडेस्वारी ह्यांचा समावेश आहे.
- हालीमा सादिया इस्माईल मोमीन– हालीमा तायक्वोंदो आणि हापकिदो तसेच कॅलीथेनिक्स, वेट ट्रेनिंग व बाईक स्टंट रायडिंगचा सराव करते. ती 3- वेळेस हापकिदो राष्ट्रीय सुवर्णपदक इजेती आहे व तिला एमेच्युअर पॉवरलिफ्टिंगमध्ये रुपेरी पदक मिळालेले आहे. ह्या ऑक्टोबरमध्ये कझाकस्तानमध्ये ती आंतरराष्ट्रीय एमएमए स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल.
- लेखा जांबौलीकर– लेखा मार्केटिंग मॅनेजर आहे व ती सध्या एक पोषण अभ्यासक्रम पूर्ण करत आहे. इन्स्टाग्रामवर 25 हजार फॉलोअर्ससह ती एक इन्फ्लुएंसर आहे व तिची हाईप गँग आहे जिथे लोक एकमेकांना हाईप करतात आणि वर्कआउट करण्यासाठी प्रेरणा देतात, तिचे सूत्र आहे, “तुमच्या कमकुवतपणाला तुमच्यावर व तुमच्या सामर्थ्यावर मात करू देऊ नका.” 2016- 17 मध्ये तिने तिच्या पहिल्या जिल्हास्तरीय मुष्टीयुद्ध मॅचमध्ये लढत दिली व ती 2 वर्षांपासून राज्य स्तरीय मुष्टीयोद्धा आहे.
- मुंतझीर अहमद– कश्मीरचा असलेला मुंतझीर व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे अणि त्याला एमएमएमध्ये व पहलवान कलेमध्ये विशेष प्रावीण्य मिळालेले आहे. तो कराटेमध्ये सेकंड डॅन ब्लॅकबेल्ट आहे. त्याने 2012 मध्ये पानिपतपासून त्याच्या मार्शल आर्टस वाटचालीला सुरुवात केली व त्याने स्थानिक लढतींमध्ये सहभाग घेतला आहे. कराटे व एमएमएच्या क्षेत्रांमध्ये त्याच्या नावावर अनेक पुरस्कार आहेत. तो त्याच्या टिकाऊपणाला त्याची सर्वांत मोठी शारीरिक ताकत मानतो व स्वत:ला “मास्टर मुंतझीर” म्हणतो. विनम्रतेसह मास्टरी सुरू होते.
- पर्ल मोंटीरिओ– रशियामधील कॅलीथेन्सिक्स स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती पहिली महिला होती व तिने दुसरे स्थान मिळवले होते. पर्लला नेहमीच एंड्युरन्सवर आधारित व्यायाम आवडले आएत व तिच्या एका मित्राने तिला कॅलीथेन्सिक्सची ओळख करून दिली. गरजा भागवण्यासाठी तिने बीपीओजमध्येही काम केले आहे, परंतु ती तिथे आनंदी नव्हती. मान्यता मिळण्यासाठी व तिची कहाणी पहिल्यांदा सांगण्यासाठी तिला ह्या शोचा भाग व्हायचे आहे.
- पूजा यादव– व्यावसायिक भारतीय तायक्वोंदो अथलीट असलेल्या पूजाने खेळाची कोणतीही पार्श्वभूमी कुटुंबात नसतानाही स्थानिक व क्षेत्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत रुपेरी पदक जिंकल्यामुळे तिला तिचे तायक्वोंदो व्यावसायिक करिअर म्हणून करावेसे वाटले व त्यातून तिला ज्युनिअर व सिनियर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खूप पदकेही मिळाली. तिने राष्ट्रीय स्तरावर बास्केटबॉल आणि हँडबॉलमध्येही भाग घेतला आहे व ती मुष्टीयुद्ध, कराटे व प्राथमिक ज्युदोही खेळते. पूजाला तिच्या राज्याने तिलोरौतेली पुरस्कार हा सर्वोच्च महिला सक्षमीकरण पुरस्कारसुद्धा दिला आहे.
- प्रक्रम दंदोना– भारतातील रहिवासी दंदोनाने पाच वर्षांपूर्वी आपले जीवन फिटनेसला वाहून घेतले व भारतामध्ये एमएमए प्रसिद्ध होण्याच्या अगदी आधी आपले प्रशिक्षण सुरू केले. त्याची पहिली अधिकृत लढाई 2019 मध्ये झालेली एमएफएन (मॅट्रिक्स फाईट नाईट) होती ज्याचा मालक टायगर श्रॉफ व त्याची बहीण कृष्णा श्रॉफ होते. ह्या निधीचा वापर करून त्याने स्वत:ची जिम सुरू केली व तिथे तो त्याच्या फाईट क्लबमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतो.
- रोहीत चौधरी– रोहीत चौधरी हा एक व्यावसायिक मुष्टीयोद्धा आहे व तो क्युरफिट आणि हेल्थीफायमी अशा विविध फिटनेस app साठी ऑनलाईन प्रशिक्षक आहे. 2008 मध्ये ऑलिंपिक्समध्ये विजेंदर सिंहच्या विजयामुळे त्याला मुष्टीयुद्ध सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. त्याचा संपूर्ण दिवस त्याच्या प्रो- बॉक्सिंग प्रशिक्षणात आणि नंतर त्याच्याद्वारे इतरांना देण्यात येणा-या प्रशिक्षणात जातो. त्याची वेदना सहन करण्याची क्षमता अतिशय जास्त आहे आणि बॉक्सिंगच्या क्षेत्रात त्याने अमेच्युअर गटात राज्य व राष्ट्रीय स्तरावर पदके मिळवली आहेत. व्यावसायिक बनल्यावर 1-0-1 हा विक्रम त्याच्या नावावर आहे.
- रौनक गुलिया– रौनक ही राष्ट्रीय स्तरावरील मल्ल आहे व तिच्या महाविद्यालयाच्या दिवसांमध्ये तिचा पहिलवान कलेशी परिचय झाला होता. तिच्या उपलब्धी पुढील प्रकारच्या आहेत: रेसलिंग सिनियर नॅशनल – 2 ब्राँझ (2019-2021), रेसलिंग U23 नॅशनल – 1 सिल्व्हर2019), रेसलिंग स्टेट चँपियन – 6 गोल्ड (2017-2021), भारत केसरी पदवी विजेती (2018) आणि तिने टोक्यो ऑलिंपिक्ससाठी प्रयत्न केला होता. तिला भारतासाठी ऑलिंपिक सुवर्ण पदक जिंकायचे आहे व ती सध्या जागतिक रेसलिंग स्पर्धेसाठी तयारी करत आहे.
- संदीप चौहान– आंतरराष्ट्रीय तायक्वोंदो अथलीट आणि भारतीय टीमसाठी सहाय्यक प्रशिक्षक असलेल्या संदीपने भारताला अनेक स्पर्धांमध्ये विजय मिळवून दिलेले आहेत. त्याच्या काही उपलब्धी अशा आहेत: तायक्वोंदोमध्ये राष्ट्रीय पदक, प्रेसिडंट कप, ऑस्ट्रेलिया ओपन, ईआय हसन कप, एशियन ओपन चँपियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व आणि भारतामध्ये तायक्वोंदोसाठी लेव्हल 2 पूर्ण करणारा पहिला प्रशिक्षक
- सुचिता तरियाल– सुचिता तरियाल ज्युदोमधील दोन वेळेसची सुवर्ण पदक विजेती आहे. तिचे पहिले सुवर्ण पदक दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धा, 2019 मध्ये होते व दुसरे ब्रिटनमध्ये सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ ज्युदो स्पर्धेमध्ये होते. ज्युदो व वर्क आउटशिवाय तिला बाईक राईडस आवडतात. तिला ह्या शोचा भाग बनून ज्युदोबद्दल जागरूकता वाढवण्याची इच्छा आहे.
- योगेश क्षत्रिय– योगेशवर लहानपणापासून चिनी मार्शल आर्टस चित्रपटांचा प्रभाव आहे व त्यामध्ये त्याला रस आहे. त्याने कराटे क्लासेस व मार्शल आर्ट क्लासेसही करून बघितले, परंतु ते त्याला ठीक वाटले नाहीत. 2011 मध्ये योगेशने शेओलिन वॉरीयर माँक्समध्ये प्रवेश घेतला व पारंपारिक शेओलिन कुं फू शिकण्यास सुरुवात केली व तिथे तो 10 महिन्यांहून अधिक काळ राहिला व अंतिमत: त्याने जीवनभरासाठी ह्या पद्धतीचा अंगीकार केला. सध्या तो भारतामध्ये कुं फू कोच म्हणून काम करत आहे.
आधी कधीही न बघितलेल्या थरारक एक्शन रोमांचासाठी इंडीयाज अल्टीमेट वॉरियरसाठी सज्ज व्हा ज्याचे प्रिमियर 4 मार्च रोजी डिस्कव्हरी+ वर आणि नंतर टिव्हीवरील प्रसारण डिस्कव्हरी चॅनलवर 14 मार्च रोजी होणार आहे.
Be the first to comment on "होस्ट विद्युत जमवाल आणि स्पेशल गेस्ट अक्षय कुमार सह ‘इंडियाज अल्टीमेट वॉरियर’ ह्या आपल्या आगामी नॉन फिक्शन कार्यक्रमासह डिस्कव्हरी नेटवर्क ‘भारत के नये महायोद्धा की खोज’ साठी सज्ज"