होम लोन मिळविण्यासाठी क्रेडिट स्कोअर महत्त्वाचा का असतो? : नीरज धवन – व्यवस्थापकीय संचालक, एक्सपीरियन इंडिया

Neeraj Dhawan, Managing Director, Experian India

मुंबई, 28 फेब्रुवारी 2022 (GPN):  क्रेडिट स्कोअर हा तीन अंकी क्रमांक असतो. कर्ज देण्यासाठी ग्राहकाला स्वीकारले जाण्याची शक्यता किती आहे, हे दर्शविणारा हा क्रमांक असतो. कर्जदाते कर्ज देण्यापूर्वी कर्जदाराची परतफेडीची क्षमता तपासून घेतात. हे करण्यासाठी कर्जदार क्रेडिट स्कोअर पाहतात. हा क्रेडिट स्कोअर एक्सपीरियनसारखे क्रेडिट ब्यूरो देतात. क्रेडिट स्कोअर 300 ते 900 या दरम्यान असतो. 900 म्हणजे सर्वाधिक क्रेडिट स्कोअर असतो. क्रेडिट स्कोअर जेवढा अधिक, तेवढी कर्जदात्याकडून लोनला मंजूर मिळण्याची शक्यता अधिक असते. ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर अधिक आहे, त्यांच्याकडून परतफेडीत कसूर होण्याची शक्यता कमी असते आणि म्हणूनच कर्जदाराची रक्कम गमावण्याची जोखीम कमी असते. परिणामी, कर्जदात्याकडून व्याजदर कमी लावला जाण्याची शक्यता असते. कालानुक्रमे या लोनची शिस्तबद्ध आणि वेळेवर परतफेड केल्याने क्रेडिट व्हिंटेज आणि स्कोअर उभारला जातो. त्यामुळे मोठ्या गरजांसाठी आणि मोठ्या रकमेचे लोन घेण्यासाठी ते सक्षम होतात. त्याचप्रमाणे क्रेडिट स्कोअर अधिक असेल तर त्यांच्या अधिक रकमेच्या कर्जासाठी मोठ्या बँका आणि वित्त संस्था अॅक्सेस करता येऊ शकतात.

परतफेडीची पार्श्वभूमी, क्रेडिटचा वापर, क्रेडिटचा कालावधी,क्रेडिटचा प्रकार, एकूण क्रेडिट अकाउंट्स इत्यादी घटक लक्षात घेत तुमचा क्रेडिट स्कोअर कॅल्क्युलेट करण्यात येतो. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासून घेणे हितावह असते. एक्सपीरियनच्या वेबसाइटवर तुम्ही मोफत क्रेडिट स्कोअर तपासू शकता.

सुलभपणे होम लोन मिळण्यासाठी आवश्यक असलेला चांगला क्रेडिट स्कोर राखण्याची प्रमुख पाच कारणे:

750 हून अधिक क्रेडिट स्कोर असेल तर तुम्हाला अनुकूल योजनेतून होम लोन घेता येईल. यामुळे तुम्हाला सर्व सर्वोत्तम बँकांच्या माध्यमातून लोन साठी अर्ज करता येईल. कर्जदार तुमच्या पतपात्रतेचे मूल्यमापन करून पाहतील. वाईट क्रेडिट/ परतफेडीची पार्श्वभूमी यामुळे स्कोर कमी होईल आणि कर्जदार चांगल्या होम लोन योजनांसाठी पात्र असणार नाही.

  1. लोन घेण्यासाठी पात्र करतो : क्रेडिट स्कोर750 किंवा त्याहून अधिक असेल तर तो चांगला क्रेडिट स्कोर समजला जातो. जास्त क्रेडिट स्कोर असलेल्या ग्राहकांना कर्जदार विशेष व्याजदराने लोन देण्याची शक्यता असते. यामुळे तुम्ही लोन घेण्यासाठी पात्र होताच, त्याचप्रमाणे सवलतीच्या दरातील व्याज दर तुम्हाला दिला जाण्याची शक्यता असते आणि प्रक्रिया शुल्कावरही सवलत मिळणे इत्यादी ऑफर तुम्हाला मिळतात.
  2. कमी व्याजदर : चांगल्या क्रेडिट स्कोअरमुळे कमी व्याज दराने लोन मिळण्यास मदत होते
  3. लोनच्या परतफेडीसाठी अधिक मदत मिळते : तुमचा क्रेडिट स्कोर जेवढा चांगला असेल तेवढे तुम्हाला जास्त रकमेचे लोन मिळते आणि त्याच्या परतफेडीसाठी अधिक मुदतही मिळते.
  4. अर्जाला लवकर मंजुरी मिळते : जास्त क्रेडिट स्कोअर असलेला अर्ज कर्जदात्याला प्राप्त झाल्यास त्या अर्जावर लवकर प्रक्रिया करणे कर्जदात्याला सुलभ होते. कारण परतफेडीच्या विश्वासार्हतेची पडताळणी आधीच झालेली असते.
  5. लोनचे प्रकियाशुल्क आणि इतर आकारांवर सवलत : चांगल्या क्रेडिट स्कोअरच्या आधारे लोन देण्यात कर्जदाराला स्वारस्य असते तेव्हा अर्जदाराचे पारडे जड असते आणि लोन पक्रिया शुल्क व इतर आकारांवर तो सवलत मागू शकतो.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "होम लोन मिळविण्यासाठी क्रेडिट स्कोअर महत्त्वाचा का असतो? : नीरज धवन – व्यवस्थापकीय संचालक, एक्सपीरियन इंडिया"

Leave a comment

Your email address will not be published.


*