डिजिटल पेमेंट्स करणे शक्य व्हावे यासाठी शुगरबॉक्सची अ‍ॅमेझॉन पे आणि सिंपल बरोबर भागीदारी

SugarBox Logo

·         ग्राहक आता शुगरबॉक्स नेटवर्कच्या माध्यमातून अ‍ॅमेझॉन पे आणि सिंपल वर

इ-वॉलेट्स अ‍ॅक्सेस करू शकणार

·         ऑफलाईन मध्ये डिजिटल पेमेंट्स सक्षम करून फिनटेक उद्योगात क्रांती करण्यासाठी शुगरबॉक्स तयार

·         २०२२ मध्ये होणार फिनटेक उद्योगात अधिकाधिक भागीदारी

मुंबई२4 फेब्रुवारी २०२२ (GPN): भविष्यातील इंटरनेटचा कणा उभारणारे हायपरलोकल एज क्लाऊड आधारित तंत्रज्ञान असलेल्या शुगरबॉक्स नेटवर्कने पेमेंट सुविधा अधिक सोयीची आणि सोपी करण्यासाठी डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या अॅमेझॉन पे बरोबर आणि प्रगतीशील डिजिटल इंडियाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत पेमेंट्स करणे शक्य व्हावे यासाठी आणि व्यापारी व ग्राहकांना व्यापार सुविधा देत सक्षम करणारा प्लॅटफॉर्म सिंपल बरोबर भागीदारी केली आहे. विविध भौगोलिक प्रदेशांत पेमेंट सुविधा पुरवून या भागीदारीतून वंचित आणि आजवर फारशी सेवा न मिळालेल्या भागातील ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे.

या भागीदारीतून २०२६ पर्यंत ४२५ दशलक्ष लोकांपर्यंत फिनटेक सुविधा पुरविण्याचे शुगरबॉक्सचे ध्येय आहे. पुढील अब्जावधी ग्राहकांना जोडून घेण्याच्या डिजिटल इंडिया ध्येयाशी सुसंगत शुगरबॉक्स नेटवर्कने त्यांचे तंत्रज्ञान खेडी,रेल्वेमेट्रो अशा ग्राहकांशी संबंधित विविध ठिकाणी बसविले आहे आणि विमानेरुग्णालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी बसविण्याच्या जवळ आहेत.

या धोरणात्मक सहयोगाचे उद्दिष्ट इ-वॉलेट ग्राहकांना अ‍ॅमेझॉन पे वर विनाअडथळा एका क्लिक मध्ये पेमेंट सेवेचा लाभ घेता येण्यावर आहे. त्यायोगे त्यांना डिजिटल पेमेंट परिसंस्था बळकट करायची आहे.

अ‍ॅमेझॉन पे चे संचालक श्री.विकास बन्सल या भागीदारीबद्दल बोलताना म्हणाले, “ग्राहक आता सुरक्षीत, विश्वासार्ह आणि सोयीची पेमेंट सुविधा पुरविणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या शोधात असतात. शुगरबॉक्स बरोबरच्या आमच्या भागीदारीतून “अ‍ॅमेझॉन पे बॅलन्स: मनी” (प्रीपेड पेमेंट साधन) ग्राहकांचा पेमेंट अनुभव विस्तारत ऑनलाईनविनाअडथळा व्यवहार करण्याची मुभा देते. हा उपक्रम म्हणजे आमच्या ग्राहकांचे दैनंदिन जीवन सुकर करण्याच्या आमच्या प्रयासाशी सुसंगत आहे आणि ग्राहकांना कुणालाहीकुठेही पेमेंट करण्यासाठी सक्षम करत अ‍ॅमेझॉन पे साठीची डिजिटल क्षमता अंगीकार करायला चालना देत आहे.”

आगामी वर्षांत डिजिटल पेमेंट्सचा अधिक विकास होण्याची आशा आहे. रोख रकमेवरील अवलंबित्व कमी होणेपैसे हस्तांतरित करण्याचा वेग आणि सुलभ व्यवहार यामुळे डिजिटल पेमेंट हा एक चांगला पर्याय बनत आहे. इ-वॉलेटचा प्रसार आणि अंगीकार वेगाने होत असला आणि मार्च २०२१ ला संपणाऱ्या वर्षात यात ३०.१९% वाढ दिसलेली असली तरी अजूनही मोठ्या संख्येने असलेल्या ग्राहकवर्गासाठी हा पर्याय उपलब्ध नाहीय. ही डिजिटल विषमता दूर करत अशा ग्राहकांना कनेक्टीव्हिटी पुरवून सक्षम करणे हे शुगरबॉक्सचे ध्येय आहे.

सिंपलच्या सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नित्या शर्मा म्हणाल्या, “भारतात ‘बाय नाऊ पे लेटर’ ही संकल्पना राबविणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या सिंपलची स्थापना २०१५ मध्ये झाली आणि आमच्या प्रयत्नांना खूप चांगले यश मिळताना दिसत आहे. एकाच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असंख्य लाभ पुरवत आम्ही व्यापाऱ्यांना विविध प्रकारची उत्पादने आणि विविध भागांतील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम करत आहोत. गेल्या काही वर्षांत ग्राहक अपेक्षा पूर्ण करण्यासाठीव्यापाऱ्यांच्या बदलत्या गरजांच्या पूर्ततेसाठी आणि मजबूत बाजारपेठ परिस्थितीशी सुसंगत अशी सिंपलने आपल्या सध्याच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये नवीन शाखांची भर घातली. बऱ्याचदा स्थिर नेटवर्कचा अभाव हा विश्वासार्ह कनेक्टीव्हिटी मधील मोठा अडथळा असतो. आणि म्हणूनच विनाअडथळा व्यवहारांसाठी अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या दिशेने शुगरबॉक्सशी असलेला आमचा सहयोग ही महत्वपूर्ण गोष्ट आहे.”

ही पेमेंट्स कार्यान्वित करण्यासाठी ग्राहकांना त्यांची इ-वॉलेट्स शुगरबॉक्स बरोबर जोडायची आहेत. तसे केल्यावर त्यांची संबंधित पेमेंट्स विनाअडथळा पार पडतील याची खात्री राहील. शुगरबॉक्स नेटवर्क सध्या असलेली इंटरनेट पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि दुर्गम भागातप्रवासात किंवा जेव्हा नेटवर्क समस्या गडद असते तेव्हाही डिजिटल सुविधा सुधारण्याकडे भर देत आहे.

या भागीदारीच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल बोलताना शुगरबॉक्स नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक रोहित परांजपे म्हणाले, “डिजिटल पेमेंट्स एक नवीन युग घडवत आहेत. शहरी भागातल्या किंवा खेड्यातल्या ग्राहकांना डिजिटल पेमेंट्स साठी सक्षम करताना ती आकडेवारीच सध्याची डिजिटल विषमता लवकरच नाहीशी होईल असे सांगत आहे. अ‍ॅमेझॉन पे आणि सिंपल बरोबरची आमची भागीदारी हा ‘भारत’ आणि ‘इंडिया’ मधील ग्राहकांना सक्षम करण्याचा आणि त्यांच्यासाठी आमूलाग्र बदल घडविण्याचा उपक्रम आहे. परवडणाऱ्या किंमतीतसुलभ आणि विश्वासार्ह कनेक्टीव्हिटी सादर करण्याच्या साध्या सोप्या विचारधारेसह भविष्यातील इंटरनेटचा कणा उभारणे हे शुगरबॉक्सचे ध्येय आहे.”

गेल्या काही वर्षांत भारतामध्ये डिजिटल पेमेंट्समध्ये मोठी वाढ झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माहिती नुसार २०१६-१७ मधील १००४ कोटी रुपयांपासून पाच पट वाढ होत २०२०-२१ मध्ये ५,५५४ कोटी रुपये इतकी डिजिटल पेमेंट्समध्ये वाढ झाली आहे. हे उत्साहवर्धक चिन्ह असले तरी वेगाने विकास होण्यासाठी पेमेंट उद्योग सक्रीय आणि विश्वासार्ह नेटवर्कवर अवलंबून आहे आणि त्यामुळे अजूनही देशातील वंचित आणि सेवा न मिळालेल्या भागामध्ये त्याचा अभाव आहे.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "डिजिटल पेमेंट्स करणे शक्य व्हावे यासाठी शुगरबॉक्सची अ‍ॅमेझॉन पे आणि सिंपल बरोबर भागीदारी"

Leave a comment

Your email address will not be published.


*