
(L-R): Mr. Shailendra Singh, MD & CEO, BOB Financial Solutions Ltd, Ms. Rajni Hasija, CMD, IRCTC and Ms. Praveena Rai, COO, NPCI at the launch of the IRCTC BoB RuPay Contactless Credit Card.
मुंबई 21 फेब्रुवारी 2022 (GPN)- बीओबी फाइनेंशिअल सॉल्यूशंस लिमिटेड (बीएफएसएल),बँक ऑफ बडोदा (बॉब) ची पूर्ण मालकीची उपकंपनी आणि इंडियन रेल्वे कॅटरींग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी (IRCTC ) यांनी एकत्र येऊन आयआरसीटीसी बॉब रूपे कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. नियमित रेल्वे प्रवाशांना जास्तीत जास्त बचत करण्यासाठी हे कार्ड खास तयार करण्यात आले आहे. या कार्डच्या वापरकर्त्यांना किराणा मालापासून ते इंधनापर्यंतच्या इतर श्रेणींमध्ये खरेदीसाठी अनेक फायदे मिळतील. जेसीबी नेटवर्कद्वारे आंतरराष्ट्रीय व्यापारी आणि एटीएम मध्ये व्यवहार करण्यासाठी कार्डधारक हे कार्ड वापरू शकतात.
आयआरसीटीसी बॉब रूपे कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्डचे कार्डधारक 1एसी, 2एसी, 3एसी, सीसी किंवा ईसी बुकिंगवर आयआरसीटीसी वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे केलेल्या 40 रिवॉर्ड पॉइंट्स (प्रति रुपये 100 खर्च) मिळवू शकतील. हे कार्ड ग्राहकांना त्यांच्या सर्व रेल्वे तिकीट बुकिंगवर 1% व्यवहार शुल्क माफी देखील देते. कार्ड जारी केल्यापासून 45 दिवसांच्या आत रुपये 1,000 किंवा त्याहून अधिक किमतीची एकच खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 1,000 बोनस रिवॉर्ड पॉइंट मिळतील.
को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड किराणा माल आणि विभागीय दुकानांवर 4 रिवॉर्ड पॉइंट्स (प्रति रुपये 100 खर्च) आणि इतर श्रेणींमध्ये 2 रिवॉर्ड पॉइंट्स ऑफर करेल. हे कार्ड भारतातील सर्व पेट्रोल पंपांवर 1% इंधन अधिभार माफी देखील देईल.
लॉन्च बद्दल बोलताना, बीफएसएल( BFSL) चे एमडी आणि सीईओ श्री शैलेंद्र सिंग म्हणाले, “आम्ही एनपीसीआय (NPCI) सोबत भागीदारी करून को-ब्रँडेड क्रेडिट कार्डसाठी आयआरसीटीसी सोबत भागीदारी केल्याचा आम्हाला सन्मान वाटतो.हे कार्ड ग्राहकांना रेल्वे प्रवासासाठी तसेच खरेदीच्या इतर सर्व गरजांसाठी अखंडित पेमेंट सुविधा आणि फायदे देईल.आम्हाला अपेक्षा आहे की सह-ब्रँडेड कार्ड सखोल भौगोलिक क्षेत्रांमध्ये डिजिटल पेमेंट्सचा आणखी अवलंब करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल, ज्याला रेल्वे नेटवर्क आणि बॉब शाखांच्या उपस्थितीमुळे मदत होईल.”
———————————————-
Be the first to comment on "बॉब फाइनेंशिअल आणि आयआरसीटीसीने एकत्र येऊन को-ब्रांडेड रूपे कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड लॉन्च केले"