
वेंकटराम ममिल्लापल्ले कंट्री सीईओ व्यवस्थापकीय संचालक रेनॉल्ट इंडिया ऑपरेशन्स सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेसला कार सुपूर्द करताना (Venkatram Mamillapalle Country CEO Managing Director Renault India Operations handing over cars to CSC e-Governance Services)
देशभरातील 15 ते 60 वर्षे वयोगटातील ग्रामीण लोकांमध्ये आर्थिक आणि डिजिटल साक्षरतेला चालना देण्यासाठी त्यांनी सीएसआर (CSR) चा भाग म्हणून पाच रेनॉल्ट कार दान केल्या आहेत.
मुंबई,14 फेब्रुवारी 2022 (GPN):– रेनॉल्ट इंडियाने सीएससी ई-गवर्नेंस सर्विसेस (कॉमन सर्विस सेंटर्स) सोबत भागीदारी केली आहे, ज्याचा उद्देश सहा कोटी ग्रामीण नागरिकांना डिजिटल साक्षरता प्रदान करण्याच्या उद्देशाने भारत सरकारचा प्रमुख कार्यक्रम, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानला (PMGDISHA) पाठिंबा देणे हा आहे.रेनॉल्ट इंडियाने सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेसला संपूर्ण भारतातील ग्रामीण आणि निम-शहरी भागातील लोकांना कौशल्य देण्यासाठी आणि त्यांना व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यात मदत करण्यासाठी पाच कार सुपूर्द केल्या आहेत. भारतभरात एका वर्षात 600 हून अधिक ग्रामपंचायतींचा समावेश करण्याचा त्यांचा मानस आहे.

Venkatram Mamillapalle, Country CEO & Managing Director, Renault India Operations – File Photo GPN
रेनॉल्ट इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम ममिल्लापल्ले म्हणाले, “डिजिटल साक्षरता हा सशक्त समाज निर्माण करण्याच्या सरकारच्या संकल्पनेचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या या वाढीस हातभार लावण्यासाठी आम्ही सीएससी सोबत सहयोग करण्यास उत्सुक आहोत. डिजिटल इंडिया कार्यक्रमाचे महत्त्वाचे प्रवर्तक म्हणून रेनॉल्टच्या गाड्या ‘नॉलेज रिपॉजिटरी ऑन व्हील्स’ म्हणून काम करतील ज्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना माहिती, ज्ञान आणि आवश्यक कौशल्ये उपलब्ध करून त्यांना सक्षम करण्यात मदत होईल.” ते पुढे म्हणाले की, ग्रामीण एकात्मतेतील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे कारण ते ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या तसेच ग्रामीण आणि निमशहरी भागांना केवळ आर्थिक व्यवहार्यतेच्या दृष्टीनेच नव्हे तर कौशल्य आणि ज्ञान क्षमता निर्माण करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने आहे.”
Be the first to comment on "रेनॉल्ट इंडियाने ग्रामीण भागात डिजिटल सक्षमीकरणासाठी सीएससी(CSC) सोबत हातमिळवणी केली"