आयरिस होम फ्रॅग्रन्सेसकडून विशेष भेटवस्तूंच्या कलेक्शनसोबत या व्हॅलेंटाइन डेला प्रेमाच्या सुगंधाची पखरण

हा प्रेमदिन खास बनवण्यासाठी या कलेक्शनमध्ये डिफ्युजर्सपासून सुगंधी मेणबत्त्यांपर्यंत विविध प्रकारचे सुगंध आणि उत्पादने आहेत

फेब्रुवारी २०२२: आयरिस होम फ्रॅग्रन्सेस या मैसुरूस्थित एनआरएसएसचा उपक्रम असलेल्या रिपल फ्रॅग्रन्सेसच्या ब्रँडने व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने आपल्या उत्पादनांची एक विशेष श्रेणी बाजारात आणली आहे. या नवीन कलेक्शनची रचना वातावरणात मंत्रमुग्ध करणाऱ्या सुगंधासह प्रेम आणि रोमान्सची धुंदी आणण्यासाठी केली गेली आहे. या कलेक्शनअंतर्गत उपलब्ध असलेली ही खास स्टाइल ग्राहकांचा मूड तर सुधारेलच पण त्याचबरोबर वातावरणात सुगंधाची पखरणही करेल. सुंदर किट्समध्ये उपलब्ध हे अत्यंत आकर्षक सुगंध आणि त्यांच्या देखण्या डिलिव्हरी यंत्रणाद्वारे तुमच्या प्रियजनांसाठी ही उत्तम भेटवस्तू ठरेल.

आयरिस होम फ्रॅग्रन्सेस उत्तम जीवनशैली आणि आरोग्य यांची संकल्पना वाढीस लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या रोमँटिक कलेक्शनची रचना प्रेमाच्या उत्सवाला एक वैयक्तिक टच देण्यासाठीही केली गेली आहे. या नवीन कलेक्शनबाबत बोलताना रिपल फ्रॅग्रन्सेसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मास्टर फ्रॅग्रन्स निर्माते श्री. किरण रंगा म्हणाले की,“दरवर्षी आम्ही आयरिसकडून विशेष निमित्ताने खास कलेक्शन्स देऊन आमच्या ग्राहकांचा अनुभव वाढीस लावण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला आमच्या कलेक्शनसोबत प्रेमाची शक्तिशाली भावना लोकांमध्ये पसरवायची आहे. आमचे व्हॅलेंटाइन डेचे कलेक्शन प्रेम आणि आनंद आणण्यासाठी आणि या उत्सवाचा भाग होण्यासाठी तयार केलेले आहे. आमच्या वचनबद्धतेच्या कसोटीवर खरे उतरणारे हे कलेक्शन परवडणाऱ्या दरात उत्तम दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

स्पेशल रोमान्स रेंजमध्ये रूम मिस्टर्स, सॅशे, एम्बॉस्ड हार्ट पिलर कँडल, एम्बॉस्ड रोझ पिलर कँडल आणि अरोमा पिलर कँडल्स अशा विविध गोष्टी अत्यंत सुंदर सुगंधासह फुलांच्याअ‍ॅक्सेसरीजसोबत येतात. त्यांच्या डिझाइनसोबत वातावरण सुगंधी होते आणि हवेत प्रेम व उबदारपणा पसरतो. पॉटप्युरीवर आधारित डेकोरेटिव्ह वॅक्स रिंग रेथ आणि व्हॅलेंटाइन फ्लॉवर रेथ रोझ, अ‍ॅप्पल सिनामन आणि लव्हेंडर सुगंधांत उपलब्ध आहेत. फुलांच्या पॉटप्युरीज, सुगंधी मेणबत्त्या आणि फ्रॅग्रन्स पाऊच असलेले खास भेटवस्तूंचे किट्स फ्रेंच लव्हेंडर आणि रोझ या प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

व्हॅलेंटाइन डे होम फ्रॅग्रन्स रेंज बंगळुरू आणि मैसुरूमध्ये आयरिस अरोमा बुटिक्समध्ये उपलब्ध आहेत. हे स्टोअर सकाळी ११.०० ते रात्री ९.०० पर्यंत सुरु असते. येथील कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असून स्टोअरमध्ये येणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी कोविडच्या सर्व निकषांचे पालन केले जाते. या कलेक्शनची किंमत ३०० रूपये- १००० रूपये या दरम्यान आहे. ग्राहक https://www.irishomefragrances.com/ येथेही विशेष सवलती मिळवू शकतात.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "आयरिस होम फ्रॅग्रन्सेसकडून विशेष भेटवस्तूंच्या कलेक्शनसोबत या व्हॅलेंटाइन डेला प्रेमाच्या सुगंधाची पखरण"

Leave a comment

Your email address will not be published.


*