
Twitter – GPN
MUMBAI (GPN): व्हॅलेंटाइन डे आता जवळ आला आहे आणि चांगल्या प्रेमकथेसारखे दुसरे काहीही आपल्या हृदयाला ऊब देत नाही. डिजिटल काळात प्रेम फक्त एका ट्विटच्या अंतरावर आहे. ट्विटर हा इंटरनेटचा वादग्रस्त मुद्दा आहे हे पाहता यात काहीही आश्चर्य नाही आणि लोक ट्विटरवर आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टींबाबत चर्चा करून समविचारी व्यक्तींशी जोडले जाण्यासाठी येतात. अनेकदा ट्विटरवर लोकांना आपल्याशी नाते जोडणारे लोकही दिसतात. खरेतर लोक अशा गोष्टी ट्विटरवर सांगतात आणि #WeMetOnTwitterहा हॅशटॅग वापरून आपण ट्विटरवर कसे भेटलो याच्या कथाही सांगतात.
भारतात #WeMetOnTwitter बाबतचा संवाद वाढू लागला आहे. कारण त्याबाबत मागील वर्षी २०२० च्या तुलनेत ३७० टक्के अधिक ट्विट्स आलेल्या दिसतात. एवढेच नाही तर यावर्षी (२०२२) मध्ये एका महिन्यात (जानेवारी-फेब्रुवारीत) या संवादात २८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आपल्याला दिसून आले आहे.
ट्विट: https://twitter.com/TwitterIndia/status/1491996667725426706
व्यक्तीला प्रेम अत्यंत दुर्मिळ आणि अनपेक्षित ठिकाणी गवसते असे म्हटले जाते आणि अनेकदा फक्त एक ट्विट पुरेसे असते. ट्विटरवर तयार झालेल्या काही खास प्रेमकथा आपण पाहूया:
- दॅट्स ए कॅच! समीर अल्लाना (@HitmanCricket) या क्रिकेटप्रेमीला त्याचा जोडीदार मिळालाय सना शरीफ(@SanaShariffHai) एक दंतवैद्यक, #OnlyOnTwitter
ट्विट: https://twitter.com/HitmanCricket/status/1350832021673709568
2.प्रेम हे प्रेम आहे! आर्टिस्ट सिफला (@sifofftherocker) या सेवेवर @sadboihoursonly भेटले आणि आम्ही हे सांगू इच्छितो की, हे ट्विट पुरेसे नाही.
ट्विट: https://twitter.com/sadboihoursonly/status/1465183228721917955
3.स्वप्न अस्तित्त्वात आणा: कनुप्रिया (@kanupriya) आणि मोहित(@HaramiParindey) यांना खऱ्या अर्थाने प्रेम गवसले आहे आणि त्यांची प्रेमकथा आपल्या कानांना संगीतासारखी आहे.
ट्विट: https://twitter.com/HaramiParindey/status/1476952195178270728
4.बिग बॉस प्रेमी एकत्र: एकीकडे #TejRan हे या बिग बॉस सीझनमध्ये सर्वाधिक चर्चा झालेले जोडपे आणि ट्विट केलेले हॅशटॅग होते तर त्याचवेळी झैन (@ZAIN17_) आणि कथा (@daffahojaosare) ट्विटरवर भेटले आणि त्यांनी बिग बॉस हाऊसबाहेर त्यांनी प्रेमाची ज्योत चेतवली.
ट्विट: https://twitter.com/ZAIN17_/status/1490308273567764485
5.प्रेम संयमी आहे, प्रेम दयाळू आहे! आर्टिस्ट रोनिन(@priyanthan_)ची प्रेमकथा काळाच्या कसोटीवर खरी उतरली आणि ती डोळे विस्फारायला लावणारी आहे.
ट्विट: https://twitter.com/priyanthan_/status/963650066824220672
अंतिमतः प्रेमाचा सुगंध सगळीकडे पसरलेला असताना प्लॅटोनिक प्रेम संवाद आणि संपर्कालाही चालना देऊ शकते हे विसरून चालणार नाही. संवादाच्या शक्तीद्वारे ट्विटरने लोकांना जवळ आणले आहे आणि संवादाद्वारे समाजाला जोडले आहे. #WeMetOnTwitter सोबत आम्ही अशा कथा अर्थपूर्ण नात्यात परावर्तित होताना पाहू इच्छितो.
Be the first to comment on "#वीमेटऑनट्विटर: डिजिटल युगातील प्रेमकथा"