बँक ऑफ बडोदातर्फे आर्थिक वर्ष 22च्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर
बँक ऑफ बडोदाच्या निव्वळ नफ्यात डिसेंबर 21 रोजी संपलेल्या 9 महिन्यांत गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत तीन पटींनी वाढ
तिमाहीतील निव्वळ नफा वार्षिक पातळीवर दुप्पट होऊन 2,197 कोटी रुपयांवर एकूण एनपीए गुणोत्तर डिसेंबर 20 मधील 8.48 टक्क्यांवरून 123 बीपीएसने कमी होऊन डिसेंबर 21मध्ये 7.25 टक्क्यांवर राहिला निव्वळ एनपीए गुणोत्तर डिसेंबर 20 मधील 2.39 टक्क्यांवरून डिसेंबर 21 मध्ये 2.25 टक्क्यांवर डोमेस्टिक कासामध्ये वार्षिक पातळीवर 12.86 टक्क्यांनी वाढ, कासा गुणोत्तर वार्षिक पातळीवर 308बीपीएसनी उंचावले ऑरगॅनिक रिटेल अडव्हान्स पोर्टफोलिओमध्ये वार्षिक पातळीवर 11.13 टक्क्यांची वाढ झाली नेट इंटरेस्ट मार्जिनमध्ये वार्षिक पातळीवर 36 बीपीएसची 3.13 टक्क्यांनी वाढ झाली तिमाहीतीस निव्वळ व्याज उत्पन्नात वार्षिक पातळीवर 14.38 टक्क्यांच्या वाढीची नोंद झाली तिमाहीतील शुल्क उत्पन्नात वार्षिक पातळीवर 15.50 टक्क्यांची वाढ होऊन 1,557 कोटी रुपये झाली इक्विटीवरील परताव्यात वार्षिक पातळीवर 525 रुपयांची लक्षणीय वाढ होऊन 14.37 टक्क्यांने वृद्धी झाली हेल्थी कॅपिटल बेस – सीआरएआर डिसेंबर 20 मधील 12.93 टक्क्यांवरून सुधारून डिसेंबर 21 मध्ये15.47 टक्क्यांने वृद्धी झाली |
महत्त्वाची वैशिष्ट्ये
- बँकेच्या डोमेस्टिक कासामध्ये वार्षिक पातळीवर 12.86 टक्क्यांची वाढ
- तिमाहीतील ऑपरेटिंग नफ्यात वार्षिक पातळीवर 7.85 टक्क्यांची वाढ
- तिमाहीत बँकेच्या निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ होऊन आर्थिक वर्ष 21 मधील तिसऱ्या तिमाहीतील 1061 कोटी रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष 22 मधील तिसऱ्या तिमाहीत 2197 कोटी रुपयांचा निव्वळ नफा. आर्थिक वर्ष21 मधील नऊ महिन्यांतील 1875 कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्यात आर्थिक वर्ष 22 मधील नऊ महिन्यांत5494 कोटी रुपयांची वाढ
- बँकेचे एकूण एनपीए अनुपात डिसेंबर 20 मधील 8.48 टक्क्यांवरून डिसेंबर 21 मध्ये 7.25 टक्क्यांवरलक्षणीय प्रमाणात उंचावले
- ग्लोबल नेट इंटरेस्ट मार्जिन (एनआयएम) डिसेंबर 20 मधील 2.77 टक्क्यांवरून डिसेंबर 21 मध्ये 3.13टक्क्यांवर वाढली
- बँकेच्या जागतिक कर्जामध्ये 5.17 टक्क्यांची क्रमाक्रमाने वाढ होऊन 7,71,994 कोटी रुपयांची वाढ झाली
- बँकेच्या देशांतर्गत कर्जामध्ये वाढ होऊन 6,54,315 कोटी रुपयांवर, तिमाही पातळीवर 4.96 टक्के वाढ, तर वार्षिक पातळीवरील वाढ 3.36 टक्के झाली
व्यावसायिक कामगिरी
- जागतिक ठेवी वार्षित पातळीवर 2.46 टक्क्यांनी वाढून 9,78,034 कोटी रुपयांची, डिसेंबर 21 मध्ये देशांतर्गत कर्जात 5 टक्क्यांची वाढ होऊन 8,76,555 कोटी रुपयांची वृद्धी झाली
- देशांतर्गत करंट खात्यातील ठेवी 65,260 कोटी रुपयांवर, वार्षिक पातळीवर 15.41 टक्क्यांच्या दमदार वाढीची नोंद झाली
- बँकेच्या देशांतर्गत बचत ठेवींमध्ये 12.36 टक्क्यांची वाढ होऊन 3,22,909 कोटी रुपयांची वाढ झाली व एकंदर देशांतर्गत कासामध्ये वार्षिक पातळीवर 12.86 टक्क्यांची वाढ झाली
- बँकेच्या ऑरगॅनिक रिटेल कर्ज पोर्टफोलिओमध्ये 11.13 टक्के वाढ, वैयक्तिक कर्ज पोर्टफोलिओ 46.39टक्क्यांच्या वाढीसह आघाडीवर, वाहन कर्जात 20.54 टक्के वाढ, तर शैक्षणिक कर्जात 13.86 टक्के वार्षिक वाढ झाली
- शेती कर्ज पोर्टफोलिओ 9.58 टक्क्यांच्या वार्षिक वाढीसह 1,05,694 कोटी रुपयांची वाढ झाली
- ऑरगॅनिक एमएसएमई पोर्टफोलिओ वार्षिक पातळीवर 2.39 टक्क्यांनी वाढून 92,668 कोटी रुपयांची वाढ झाली
नफा
- नेट इंटरेस्ट इन्कम (एनआयआय) आर्थिक वर्ष 21 च्या तिसऱ्या तिमाहीतील 7477 कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष 22 च्या तिसऱ्या तिमाहीत 8552 कोटी रुपयांवर, 14.38 टक्क्यांची वार्षिक वाढ झाली
- आर्थिक वर्ष 22 च्या तिसऱ्या तिमाहीत बँकेच्या ऑपरेटिंग उत्पन्नात वार्षिक पातळीवर 6.57 टक्क्यांची वाढ होऊन 11,071 कोटी रुपयांवर. आर्थिक वर्ष 22 च्या नऊ महिन्यांतील ऑपरेटिंग उत्पन्नात 10.57 टक्क्यांची वाढ, आर्थिक वर्ष 21 च्या नऊमाहीतील 29,819 कोटी रुपयांवरून 32,972 कोटी रुपयांची झाली
- जमाराशि लागत डिसेंबर 20 मधील 3.85 टक्क्यांवरून कमी होऊन डिसेंबर 21 मध्ये 3.50 टक्के झाली
अॅडव्हान्सेसवरील उत्पन्नात क्रमाक्रमाने वाढ होऊन सप्टेंबर 21 मधील 6.55 टक्क्यांवरून डिसेंबर 21 मध्ये6.92 टक्क्याने झाली
- बँकेच्या कार्यकारी नफ्यात वार्षिक पातळीवर 7.85 टक्क्यांची वाढ होऊन 5483 कोटी रुपयांवर. आर्थिक वर्ष22 च्या 9 महिन्यादरम्यान ऑपरेटिंग नफ्यात वार्षिक पातळीवर 11.95 टक्क्यांची वाढ होऊन 16,754 कोटी रुपये नफा झाला
- आर्थिक वर्ष 21 च्या तिसऱ्या तिमाहीतील 1061 कोटी रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष 22 च्या तिसऱ्या तिमाहीत बँकेतर्फे 2197 कोटी रुपयांच्या स्टँडअलोन निव्वळ नफ्याची नोंद झाली. डिसेंबर 20 मध्ये नऊ महिन्यांत झालेल्या 1875 कोटी रुपयांच्या नफ्यात वाढ होऊन डिसेंबर 21 मध्ये 5494 कोटी रुपयांची वाढ झाली.
- जागतिक एनआयएम आर्थिक वर्ष 21 च्या तिसऱ्या तिमाहीतील 2.77 टक्क्यांवरून वाढून आर्थिक वर्ष 22 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये 3.13 टक्क्यांवर झाली
- रिटर्न ऑन असेट आर्थिक वर्ष 21 च्या तिसऱ्या तिमाहीतील 0.37 टक्क्यांवरून 37 बीपीएसने सुधारून आर्थिक वर्ष 22 च्या तिसऱ्या तिमाहीत 0.74 टक्क्याने वधारली
- एकत्रित एंटिटीचा आर्थिक वर्ष 21 च्या तिसऱ्या तिमाहीतील निव्वळ नफा 1196 कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष22 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये 2464 कोटी रुपयांवर
असेट गुणवत्ता
- बँकेचा एकूण एनपीए आर्थिक वर्ष 21 च्या तिसऱ्या तिमाहीमधील 63,182 कोटी रुपयांच्या पातळीवरून कमी होऊन आर्थिक वर्ष 22 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये 55,997 कोटी रुपयांवर आणि एकूण एनपीए अनुपात आर्थिक वर्ष 21 च्या तिसऱ्या तिमाहीतील 8.48 टक्क्यांवरून उंचावत आर्थिक वर्ष 22 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये 7.25टक्क्याने वाढला
- बँकेचे एकूण एनपीए गुणोत्तर आर्थिक वर्ष 22 च्या दुसऱ्या तिमाहीमधील 2.83 टक्क्यांवरून उंचावत आर्थिक वर्ष 22 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये 2.25 टक्क्यांवर पोहोचला
- आर्थिक वर्ष 22 च्या तिसऱ्या तिमाहीत बँकेचे प्रोव्हिजन कव्हरेज अनुपात TWOला सामिल करून 85.95टक्के, तर TWO वगळता 70.60 टक्के झाला
भांडवल पर्याप्तता
- बँकेचा CRAR डिसेंबर 20 मधील 12.93 टक्क्यांवरून उंचावत डिसेंबर 21 मध्ये 15.47 टक्क्यांवर. पहिल्याश्रेणीत 13.24 टक्के (CET-1, 11.30 टक्के, AT1, 1.94 टक्के) आणि डिसेंबर 21 मध्ये दुसरी श्रेणी 2.23टक्के झाला
- एकत्रित एंटिटीचा CRAR आणि CET–1 अनुक्रमे 15.97 टक्के आणि 11.91 टक्के राहिला
उत्पन्न आणि खर्च
विवरण (रुपये कोटीत) | आर्थिक वर्ष 21 तिसरी तिमाही | आर्थिक वर्ष 22 दुसरी तिमाही | आर्थिक वर्ष 22 तिसरी तिमाही | वार्षिक पातळी (टक्के) |
व्याज उत्पन्न | 17,497 | 16,692 | 17,963 | 2.66 |
व्याज खर्ज | 10,020 | 9,126 | 9,411 | -6.08 |
शुल्क उत्पन्न | 1,348 | 1,499 | 1,557 | 15.50 |
निव्वळ व्याज नफा (एनआयआय) | 7,477 | 7,566 | 8,552 | 14.38 |
परिचालन उत्पन्न | 10,388 | 11,145 | 11,071 | 6.57 |
परिचालन खर्च | 5,304 | 5,476 | 5,588 | 5.35 |
परिचालन नफा | 5,084 | 5,670 | 5,483 | 7.85 |
एकूण तरतूद (कर वगळता) आणि इतर आकस्मिकतेसाठी | 3,450 | 2,754 | 2,506 | -27.36 |
त्यापैकी बुडीत कर्जासाठी एनपीए | 2,080 | 2,600 | 4,283 | |
करपूर्व नफा | 1,634 | 2,916 | 2,976 | 82.13 |
करासाठीची तरतूद | 573 | 828 | 779 | 35.95 |
निव्वळ नफा | 1,061 | 2,088 | 2,197 |
व्यवसाय तपशील
अनुक्रमणिका (रुपये कोटीत) | डिसेंबर 31, 2020 | सप्टेंबर 30, 2021 | डिसेंबर 31, 2021 | वार्षिक पातळी(टक्के) |
घरेलू ठेवी | 8,34,811 | 8,64,603 | 8,76,555 | 5 |
घरेलू कासा | 3,43,937 | 3,75,766 | 3,88,169 | 12.86 |
वैश्विक ठेवी | 9,54,561 | 9,59,483 | 9,78,034 | 2.46 |
घरेलू कर्ज | 6,33,039 | 6,23,368 | 6,54,315 | 3.36 |
त्यापैकी रिटेल कर्ज पोर्टफोलिओ (ऑरगॅनिक) | 1,16,046 | 1,23,424 | 1,28,960 | 11.13 |
वैश्विक कर्ज | 7,45,420 | 7,34,033 | 7,71,994 | 3.56 |
NIM वैश्विक % | 2.77 | 2.85 | 3.13 | 36 bps |
ROA % | 0.37 | 0.73 | 0.74 | 37 bps |
अनुक्रमणिका | डिसेंबर 31, 2020 | सप्टेंबर 30, 2021 | डिसेंबर 31, 2021 |
सीआरएआर (टक्के) | 12.93 | 15.55 | 15.47 |
टायर- 1 (टक्के) | 10.57 | 13.21 | 13.24 |
CET-1 (टक्के) | 8.98 | 11.39 | 11.30 |
एकूण एनपीए (टक्के) | 8.48 | 8.11 | 7.25 |
निव्वळ एनपीए (टक्के) | 2.39 | 2.83 | 2.25 |
पीसीआर (दोन सह) (टक्के) | 85.46 | 83.42 | 85.95 |
अनुक्रमणिका | आर्थिक वर्ष 21 ची तिसरी तिमाही | आर्थिक वर्ष 22 ची दुसरी तिमाही | आर्थिक वर्ष 22 ची तिसरी तिमाही |
क्रेडिट लागत (टक्के) | 1.16 | 1.46 | 2.33 |
Be the first to comment on "बँक ऑफ बडोदातर्फे आर्थिक वर्ष 22च्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर"