
Newberg Diagnostics donates blankets to Sion Hospital’s Pediatrics Department on the occasion of World Cancer Day

जागतिक कर्करोग दिना निमित्त सायन हॉस्पिटलच्या बालरोग विभागास न्यूबर्ग डायग्नोस्टिकतर्फे ब्लँकेट्स दान
मुंबई, 3 फेब्रुवारी 2022 (GPN) – जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने न्यूबर्ग डायग्नोस्टिक या भारतातील चौथ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या पॅथोलॉजी सेवा पुरवठादार कंपनीने सायन हॉस्पिटलमधील बालरोग विभागाला ब्लँकेट्सचे वाटप केले आहे. या रोगामुळे ग्रस्त असलेल्यांपर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक मदत करण्याच्या न्यूबर्गच्या बांधिलकीशी हा उपक्रम सुसंगत आहे.
न्यूबर्ग डायग्नोस्टिकचे समूह उपाध्यक्ष श्री. ए. गणेशन म्हणाले, ‘दरवर्षी भारतात अंदाजे 50,000 मुलांना कर्करोग होतो. या मुलांना तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्या लक्षात घेऊन न्यूबर्ग डायग्नोस्टिकने धैर्याने कर्करोगाचा सामना करणाऱ्या या मुलांना ब्लँकेट्सचे वाटप करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ही सर्व मुले लवकर बरी व्हावीत अशी आम्ही प्रार्थन करतो.’
लोकमान्य टिळक म्युन्सिपल जनरल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, सायनचे डीन डॉ. मोहन जोशी म्हणाले, ‘या अभिनव उपक्रमाबद्दल मी न्यूबर्गचे आभार मानतो. ब्लँकेट वाटपाचा हा उपक्रम आणि त्याचा कर्करोगाशी लढणाऱ्या मुलांवर झालेला सकारात्मक परिणाम अतिशय हृदयस्पर्शी होता. अशा साध्या गोष्टी खरंच परिणामकारक व अर्थपूर्ण ठरतात.’
न्यूबर्ग डायग्नोस्टिकचे प्रमुख पॅथोलॉजिस्ट आणि लॅबोरेटरीचे प्रमुख डॉ. राजेश बेंद्रे याप्रसंगी उपस्थित होते. यासंदर्भातील जागरूकता व पालकांना लक्षात घ्याव्या लागणाऱ्या लक्षणांविषयी ते म्हणाले, ‘लक्षणे कर्करोगानुसार वेगवेगळी असतात, मात्र, कर्करोग असलेल्या मुलांचा विकास, वजनातील वाढ कमी असते तसेच त्यांची भूक खूप कमी असते. अशी लक्षणे दिसून आल्यास तातडीने मुलांची तपासणी करणे आवश्यक असते.’
न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सने अशाच प्रकारचे उपक्रम एमएनजे कॅन्सर हॉस्पिटल हैद्राबाद, सएसपीजीआय हॉस्पिटल नॉयडा आणि सफदरजंग हॉस्पिटल, न्यू दिल्ली येथे राबवले आहेत.
=====================================
Be the first to comment on "जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने सायन हॉस्पिटलच्या बालरोग विभागास न्यूबर्ग डायग्नोस्टिकतर्फे ब्लँकेट्स दान"